Home » Career : १०वी नंतर ‘हे’ डिप्लोमा कोर्सेस करून घडवा तुमचे उत्तम करियर

Career : १०वी नंतर ‘हे’ डिप्लोमा कोर्सेस करून घडवा तुमचे उत्तम करियर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Career
Share

आज १० वी चा निकाल लागला तोच आता सगळीकडे पुढच्या ऍडमिशनची लगबग सुरु झाली. कोणी आधीच ठरवले असेल पुढे काय करायचे ते तर कोणी आजचा त्यांचा निकाल पाहून त्यांना कुठे ऍडमिशन घ्यायची ते ठरवतील. अनेकांना आता तेच कॉमन आर्टस्, कॉमर्स, सायन्स करायचे नसेल. सगळे मुलं तेच करतात म्हणून आपण काहीतरी दुसरे करावे अशी अनेकांची इच्छा असेल. मात्र दुसरे करावे तरी काय? जे काही करणार त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू पाहिजे, चांगला जॉब आणि चांगला पगार देखील मिळाला पाहिजे. असे एक ना अनेक प्रश्न आणि शंका विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या देखील मनात उभ्या राहत असतील. (Career)

१० वी ला आपल्या देशात मोठे महत्व आहे. याच १० वी नंतर आपल्याला आपले करियर आणि आपल्या करियरची योग्य दिशा ठरवता येते. यासाठी १० वी चा निकाल लागल्यानंतर आपण आपल्याला योग्य वाटेल, आवडेल आणि इच्छा असेल अशा क्षेत्रात करियर निवडणे आवश्यक असते. यासाठी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून थोडी मदत करणार आहोत. जर तुम्हाला १० वी नंतर चांगले कोर्स किंवा डिप्लोमा करायचे असतील तर आजच्या घडीला कोणते असे चांगले कोर्स आणि डिप्लोमा आहेत ते आम्ही सांगणार आहोत. (Marathi News)

१० वी नंतर तुम्ही पुढील कोर्स करून काही वर्षातच चांगला पगार घेऊ शकता.

> डिप्लोमा इन फॅशन डिझाईन (Diploma in Fashion Design)
१०वी नंतर लगेच १-२ वर्षाचा फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा करता येतो. यात तुम्हाला प्रामुख्याने डिझाइन स्किल्स, पॅटर्न बनवणे, ड्रॅपिंग आवश्यक असतात. हा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनर, पॅटर्न मेकर, क्लॉथ टेक्नॉलॉजी मध्ये करियर करू शकतात.

> डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट (Diploma in Hotel Management)
डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा पर्याय देखील १०वी नंतर उत्तम करियर म्हणून तुम्ही निवडू शकता. साधारण १ ते २ वर्षांचा हा कोर्स करून तुम्ही हॉस्पिटॅलिटी, ग्राहक सेवा, व्यवस्थापन आदी गोष्टी शिकू शकतात. त्यानंतर तुम्हाला हॉटेल ऑपरेशन्स, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, इव्हेंट मॅनेजमेंट आदी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळू शकते. (Marathi Top News)

Career

> डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग \ डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्स (Diploma in Digital Marketing)
सध्या घडीला अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध असणाऱ्या या कोर्सला कमालीची डिमांड आहे. १० वी नंतर तुम्ही लगेच हा कोर्स करून उत्तम पगाराची नोकरी मिळवू शकतात. यात तुम्हाला मार्केटिंग फंडामेंटल्स, डिजिटल अॅनालिटिक्स, सोशल मीडिया आदी शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट, कंटेंट मार्केटिंग स्पेशलिस्ट, एसइओ स्पेशलिस्ट क्षेत्रात काम करू शकता. (Marathi Latest News)

> डिप्लोमा इन ॲनिमेशन\ॲनिमेशन प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Diploma in Animation)
आजच्या काळात हा कोर्स देखील खूपच चर्चेत आणि डिमांड असलेला कोर्स आहे. १० वी झाल्यांनतर लगेच तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. यात तुम्हाला ॲनिमेशन सॉफ्टवेअर, व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टोरीटेलिंग शिकवले जाते. कोर्स झाल्यानंतर 2D ॲनिमेटर, 3D ॲनिमेटर, मोशन ग्राफिक्स आर्टिस्ट म्हणून काम करता येते. किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करता येतो. (Social News)

> डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Diploma in Information Technology)
तुम्हालाही १० वी नंतर आयटी क्षेत्रात काम करायचे असेल तर हा कोर्स बेस्ट पर्याय आहे. यात तुम्हाला प्रोग्रामिंग, नेटवर्किंग, ट्रबलशूटिंग हे स्किल्स लागतात. कोर्स केल्यानंतर वेब डेव्हलपर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट आदी फिल्ड मध्ये जॉब मिळतात.

> डिप्लोमा इन फाइन आर्ट्स
अॅनिमेशन, डिझायनिंग, प्रोग्रामिंग, ग्राफिक्स, व्हिज्युअलायझेशन अशा क्षेत्रात तुम्हाला तुमचे करिअर करायचे असेल तर १० वी नंतर विद्यार्थी फाईन आर्ट मध्ये डिप्लोमा करू शकता. हा ५ वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.

Career

> इंजिनीअरिंगचा डिप्लोमा
करण्याचे स्वप्न असेल तर दहावी उत्तीर्ण झाल्यावर ते स्वप्न साकार होऊ शकते. दहावी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा देणार्‍या अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. हे केल्यानंतर, तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तरावरील नोकऱ्या सहज मिळू शकतात.

> डिप्लोमा इन स्टेनोग्राफी
देशात अनेक संस्था आहेत ज्या स्टेनोग्राफीमध्ये डिप्लोमा देतात. हे केल्यावर बँका, शिक्षण, न्यायालये तसेच इतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात.प्रत्येक सरकारी खात्यात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये अशा नोकऱ्या येत राहतात ज्यासाठी स्टेनोग्राफरची भरती आवश्यक असते

> डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन
कॉमर्स क्षेत्रात इंटरेस्ट असेल आणि व्यवसाय करायचा असेल, तर १० वी नंतर व्यवसाय प्रशासन डिप्लोमा करता येतो. यामध्ये व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी शिकवल्या जातात. हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर कंपनीत सहज नौकरी मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकता.

=======

हे देखील वाचा : Career : १० वी नंतर काय करायचे…?

========

पुढील काही विविध क्षेत्रातील डिप्लोमा करून देखील तुम्ही चांगले करियर घडवू शकता.
* डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
* डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
* डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग
* डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग
* डिप्लोमा बायोमेडिकल इंजिनिअरिंग
* डिप्लोमा पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिप्लोमा
* डिप्लोमा इन मायनिंग इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग
* डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग
* डिप्लोमा इन गारमेंट टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन मरीन इंजिनीअरिंग
* डिप्लोमा इन प्रोडक्शन
* डिप्लोमा डिप्लोमा प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी
* डिप्लोमा बायोटेक्नॉलॉजी
* डिप्लोमा इन ब्युटी कल्चर
* डिप्लोमा इन आर्किटेक्चर
* डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल
* डिप्लोमा इन इंजिनिअरिंग
* डिप्लोमा इन फॅशन डिझाईन
* डिप्लोमा इन अपेरल डिझाईन
* डिप्लोमा सायबर सिक्युरिटी
* डिप्लोमा मेडिकल लॅब
* डिप्लोमा लायब्ररी
* डिप्लोमा इन आर्किटेक्चर


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.