Home » Aishwarya Rai : ऐश्वर्याने पुन्हा सिद्ध केले खरी ‘कान्स क्वीन’ तीच

Aishwarya Rai : ऐश्वर्याने पुन्हा सिद्ध केले खरी ‘कान्स क्वीन’ तीच

by Jyotsna Kulkarni
0 comment
Aishwarya Rai
Share

कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या मनोरंजनविश्वात कमालीची चर्चा आहे. जगभरातील सर्वच प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार या फेस्टिवलला हजेरी लावताना दिसत आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर विविध लूकमध्ये येत सर्वच जगप्रसिद्ध कलाकारांनी कमालीचे लाइमलाईट मिळवले. या अतिशय मानाच्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी सर्वच कलाकारांना मिळते असे नाही. मात्र यात असे मोजकेच कलाकार असतील जे दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत प्रसिद्धीच्याझोतात येतात. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. (Aishwarya Rai-Bachchan)

ऐश्वर्या राय-बच्चन दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावते आणि आपल्या मादक अदांनी, आकर्षक लूकने चर्चेत येते. यंदा देखील ऐश्वर्याने अतिशय सुंदर लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली आणि संपूर्ण जगातील मीडियाच्या नजरा आणि कॅमेरे तिच्यावर येऊन स्थिरावले. यंदाचा कान्स फिल्म फेस्टिवल खूपच खास ठरला, कारण आलिया भट्ट, कियारा अडवाणी आदी दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रींनी पहिल्यांदाच कान्समध्ये एन्ट्री केली. या देखील खूपच चर्चेत आल्या, मात्र ऐश्वर्याच्या अदा आणि बातच निराळी ठरली. (Marathi NEws)

यंदाचा ऐश्वर्या रायचा लूक पाहून सगळ्यांनाच तिच्या २००२ सालच्या पहिल्याच कान्सच्या लूकची आठवण झाली असेल. कान्स सुरु झाल्यापासूनच सर्व तिच्या येण्याची वाट पाहत होते. दरवर्षी ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसणारी ऐश्वर्या यावर्षी अगदी ‘भारतीय नारी’च्या लूकमध्ये कान्समध्ये पोहोचली. यंदाचा तिचा लूक दोन गोष्टींसाठी खूपच गाजला. ऐश्वर्याने या रेड कार्पेटसाठी पांढरी साडी नेसली होती. (Celebrity News)

Aishwarya Rai

दरम्यान ऐश्वर्याने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती. यासोबतच तिने गळ्यात मोठा महाराणी हारही आणि हेव्ही कानातले घटले होते. तिच्या लुकपेक्षा सर्वाधिक चर्चेत आले ते म्हणजे ऐश्वर्याने भांगेत लावलेले कुंकू. एकीकडे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले तर दुसरीकडे ऐश्वर्याचा अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना तिचा हा लूक सर्वांचेच तोंड बंद करणारा ठरला. या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. या लूकमध्ये ती एखाद्या महाराणीसारखी दिसतेय. ऐश्वर्या रायने Cannes 2025 मध्ये साडीतील जलवा दाखवला. (Bollywood Life )

याआधी काही वर्ष ऐश्वर्याला कान्स आउटफिटवरुन तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र यंदा तिने तिच्या लूकने सर्वच ट्रोलर्सची बोलती बंद केली. यावेळी ऐश्वर्या राय बच्चननं कानमध्ये मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेल्या कडवा आयव्हरी हँडलूम बनारसी साडी नेसली होती. हस्तिदंती बनारसी साडी, हस्तनिर्मित टिशू दुपट्टा आणि ५०० कॅरेटपेक्षा जास्त माणिक आणि न कापलेल्या हिऱ्यांनी बनलेला हार घालत तिने तिच्या रिच लूक पूर्ण केला. ऐश्वर्याची साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली होती. (Latest Entertainment News )

पहिल्या दिवशी तिने पांढरी साडी आणि गडद लाल रंगाचे सिंदूर घालून पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून गाजलेल्या ऐश्वर्याचा दुसरा दिवसाचा लूक देखील चर्चेत आला. तिने दुसऱ्या दिवशी, गोरी मेम बनत पुन्हा लाइमलाईट मिळवले. ऐश्वर्या कान्सच्या दुसऱ्या दिवशी पूर्णपणे नवीन आणि मॉडर्न अवतारात दिसली. तिने काळ्या रंगाचा सिक्विन गाऊन घातला होता, ज्यावर सिल्व्हर-बेज रंगाचा ओव्हरसाईज केप होता. (Latest Marathi News )

Aishwarya Rai

यावेळी ऐश्वर्याने तिची हेअरस्टाईल बदलली. तिच्या नेहमीच्या सरळ केसांऐवजी, तिने सॉफ्ट साईड वेव्ह्ज निवडले, ज्यामुळे ती अधिक खास दिसली. लाल लिपस्टिक आणि मोठ्या कानातल्यांनी लूक पूर्ण केला. तिने हात जोडून रेड कार्पेटवर नमस्कार केला. तिच्या गाऊनवर चांदी, सोने, कोळसा आणि काळ्या रंगांचे भरतकाम करण्यात आले होते. ते सूक्ष्म काचेच्या क्रिस्टल्सने सजवले होते जे वेगवेगळ्या कोनातून प्रकाशात चमकत होते. गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला हा ड्रेस खूप आकर्षक होता. (Top Stories)

==========

हे देखील वाचा :  Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त

==========

ऐश्वर्याने काळ्या रंगाचा सिक्वीन स्ट्रॅपलेस गाऊनसह सिल्व्हर बनारसी ब्रोकेड केप घातली होती. या सिल्व्हर बनारसी ब्रोकेड केपवर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मां कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्तवकर्मणि ॥ हा भगवद्गीतेतील श्लोक लिहिला होता. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमचे कर्तव्य करा, फळांची इच्छा करू नका. केवळ परिणामांच्या इच्छेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा हेतू ठेवू नका आणि काम न करण्यात तुम्हाला कोणतीही आसक्ती असू नये. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.