Home » कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना आयलँन्डवर पार्टी करण्यासाठी मागावी लागली होती माफी

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना आयलँन्डवर पार्टी करण्यासाठी मागावी लागली होती माफी

आगा खान स्कँन्डलमध्ये फसल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. खरंतर ही गोष्ट २०१६ मधील आहे.

by Team Gajawaja
0 comment
Canada PM
Share

कॅनडा आणि भारताचे सध्या संबंध बिघडले गेले आहेत. यामागे काही कारणे सुद्धा आहेत. या सर्वामध्ये जस्टिन ट्रुडो म्हणजेच कॅनडाचे पंतप्रधान आता आक्रमकतेची भुमिका घेत आहेत. ट्रुडो हे जगभरात मीडियात नेहमीच चर्चेत येत असतात. मात्र आज आपण त्यांच्या अशा एका कारनाम्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला आगा खान स्कँन्डल असे म्हटले जाते. या स्कँन्डलमध्ये फसल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. (Canada PM)

खरंतर ही गोष्ट २०१६ मधील आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपल्या परिवाराला घेऊन बहामास मधील एका खासगी आयलँन्डवर सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. तर कॅनडातील एका महिला खासदार ओ रेगन सुद्धा आपल्या नवऱ्यासोबत तेथे आली होती. या व्यतिरिक्त ट्रुडो यांच्या लिब्रल पार्टीच्या अध्यक्षा अन्ना गेनी सु्द्धा आपल्या नवऱ्यासोबत आल्या होत्या.ट्रुडो जसे परतले तेव्हा काही प्रश्न उपस्थितीत केले जाऊ लागले. विरोधकांनी आरोप लावण्यास सुरुवात केली की, पीएम ट्रुडो यांनी या प्रवासात प्रसिद्ध व्यावसायिक आगा खान यांच्याकडून खासगी लाभ घेतला आहे. तपासात हे आरोप सत्य निघाले. स्वत:ला आपण चुकलो आहोत हे पाहता ट्रुडो यांनी असे म्हटले की, फंड देणारे आगा खान यांच्यासोबत त्यांचे पारिवारिक संबंध आहेत. परंतु कॅनडाच्या नैतिकता आयुक्त मैरी डॉसन यांनी याला नैतिकतेचे उल्लंघन असल्याचे मानले.

ट्रुडो यांच्या खासगी आयलँन्डवरील ट्रिपसाठी सर्वाधिक वादग्रस्त गोष्ट अशी हो की, त्यांच्यासाठी प्रायव्हेट हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. हे हेलिकॉप्टर प्रसिद्ध व्यावसायिक आगा खान यांचे होते. फसल्यानंतर ट्रुडो यांनी आपली चुक मान्य केली आणि यापासून बचाव करण्यासाठी असे म्हटले की, ते त्यांचे फॅमिली फ्रेंन्ड आहेत. त्यांनी असे आश्वासन दिले की, पुढे ते असे करणार नाहीत.

खरंतर भ्रष्टाचार बद्दल कॅनडात कठोर कायदे आहेत येथील कायद्यानुसार सरकार मधील कोणताही मंत्री, संसदीय सचिव अथवा त्यांच्या परिवारातील एखाद्या सदस्याने आपल्या खासगी कार्यक्रमासाठी कमर्शियल चार्टर्ड किंवा खासगी विमानाने प्रवास करायचा असेल अथवा करणे भाग असेल तरीही त्याला आधी नैतिकता आयुक्तांकडून मंजूरी घ्यावी लागेल. (Canada PM)

१३ डिसेंबर १०३६ मध्ये जिनेवा, स्विर्त्झलँन्ड मध्ये जन्मलेले आगा खान शिया इस्लामच्या इस्माइली शाखेचे आध्यात्मिक नेते आहेत. हे एक यशस्वी व्यावसायिक सुद्धा आहेत. आगा खान जवळजवळ दीड कोटी इस्माइली मुस्लिमांचे नेतृत्व करात. एका अनुमानानुसार कॅनडात १ लाख इस्माइली राहतात. फोर्ब्स पत्रिका आगा खान यांना जगातील सर्वाधिक श्रीमंत राजघराण्यांपैकी एक मानते. त्यांची एकूण संपत्ती ८०० मिलियन अमेरिकन डॉलर आहे.


हेही वाचा- इंडिया-मिडल ईस्ट युरोप कॉरिडोरमुळे भारताला असा होणार फायदा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.