Home » Canada declares National emergency : भारतामधील कृषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडामध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित!

Canada declares National emergency : भारतामधील कृषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडामध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित!

by Team Gajawaja
0 comment
Canada declares National emergency
Share

कॅनडा हा एक पाश्चिमात्य, शांतताप्रिय असलेला देश, आज एका वेगळ्याच कारणासाठी जगभर चर्चेत आहे. जगभरातले विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेखालोखाल कॅनडाला पसंती देतात. तसेच, एक स्थलांतरित होण्यासाठीसुद्धा अनेकजण कॅनडालाच प्रथम पसंती देतात. सगळ्यांना सामावून घेणारा, उदारमतवादी समाज असलेला, चांगले जीवनमान असलेला कॅनडा… एक विकसित देश म्हणून सगळ्यांना परिचित आहे. पण केवळ अंतर्गत कलह आणि सध्या सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे कॅनडामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. 

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मते, तर सध्या सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे कॅनडाच्या उदारमतवादी आणि पुढारलेल्या प्रतिमेला छेद गेला आहे. कॅनडात एका संपामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Canada declares National emergency)

कॅनडामध्ये सक्तीच्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात राजधानी ओटावात “पार्लमेंट हिल” या कॅनडाच्या संसदेजवळ ट्रक चालक विरोध प्रदर्शन करत आहेत. ज्या ट्रकचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल आणि जे अमेरिकेतून कॅनडात परततील, त्यांना  नियमांनुसार क्वारंटाईन व्हावे लागेल.  

Canada eager for India trade talks despite tepid response - Asia Pacific |  Business in Vancouver

ट्रक चालकांच्या मते फेडरल सरकारने सक्तीचं कोविड लसीकरण थांबवावं… आणि हा निर्णय मागे घ्यावा… असं त्यांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी ‘ट्रक चालक आंदोलकांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही’ असं विधान केलं आहे. यावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा त्यांनी १४ फेब्रुवारी २०२२ ला केली. यानुसार आता संपूर्ण कॅनडात आणीबाणी लागू झाली आहे.  (Canada declares National emergency)

१९८८ ला आणीबाणी कायदा कॅनडामध्ये अस्तित्वात आला. पण त्याचा वापर कधीच झाला  नाही. तशी वेळही आली नाही. यावेळेस परिस्थिति मात्र वेगळी आहे. अठराव्या दिवशीसुद्धा ट्रक चालकांचं आंदोलन चालू असल्यामुळे ट्रूडो सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा कायदा देशभर लागू केला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Canada declares National emergency)

ट्रूडो म्हणतात “आम्ही कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीर आणि धोकादायक गोष्टी खपवून घेत नाही आणि घेणारसुद्धा नाही…”. विरोधी पक्षांनी मात्र या ट्रूडो यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 

आणीबाणीचा कायदा देशभर ३० दिवसांसाठी लागू असेल. यानुसार कॅनडा सरकारकडे विशेष अधिकार येणार आहेत. ज्या व्यक्तींनी किंवा संस्थानी “फ्रीडम कॉनव्हॉय २०२२” साठी देणगी दिली आहे किंवा त्यांच्याशी निगडीत लोकानी या आंदोलनासाठी पैसे उभे केले आहेत, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, तसंच त्यांची बँक खाती गोठवली जातील आणि क्राउडफंडिंग विरोधातसुद्धा सरकार पावलं उचलण्याची शक्यता आहे.  (Canada declares National emergency)

====

हे ही वाचा: भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या सॅल्युट करण्याच्या आहेत वेगवेगळ्या पद्धती; ही आहेत त्याची कारणे

====

ट्रक चालकांच्या या संपामुळे कॅनडातल्या ट्रक वाहतुकीवरसुद्धा परिणाम झाला आहे. कॅनडातल्या चार विभागांना याचा फटका बसला आहे. हे चार विभाग म्हणजे ओंटरिओ, ब्रिटिश कोलंबिया, मानिटोबा आणि अलबरटा. 

Truckers lineup their trucks on Metcalfe Street as they honk their horns in Ottawa, Canada.

कॅनडातल्या विरोधी पक्षांनी, तज्ज्ञांनी तसंच काही संस्थानीसुद्धा हा कायदा लागू करणे हे लोकशाहीविरुद्ध आहे असं म्हटलं आहे. याचा अर्थ सरकार देश चालवण्यात असफल ठरलं आहे असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. या सगळ्या गोष्टींबरोबरच एक मुद्दा नमूद करायचा म्हणजे कॅनडाच्या संसदेने या कायद्याला  मान्यता देणं बाकी आहे. अन्यथा हा आणीबाणी कायदा रद्दबातल ठरवला जाईल. 

आणीबाणी कायदा १९८८ नुसार चार प्रकारच्या आणीबाणी यात सांगितल्या आहेत. 

एक आहे पब्लिक वेलफेअर म्हणजे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर घोषित झालेली आणीबाणी. 

दुसरी आहे कॅनडा या देशाला जर काही धोका उत्पन्न होत असेल, मग त्यात हेरगिरी सारखी घटना घडत असेल किंवा कुठल्या परकीय विघातक शक्तिमुळे काही धोका उत्पन्न होत असेल, तर त्यावेळी पब्लिक ऑर्डर आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. 

तिसरी आहे आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणजे कॅनडाविरुद्ध जर कुठल्या देशाने किंवा देशानी सैन्यबळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर अशाप्रकारची आणीबाणी लादली जाऊ शकते. 

चौथी आहे, युद्धाबद्दलची आणीबाणी, म्हणजे कॅनडावर किंवा त्याच्या मित्रराष्ट्रांवर युद्धाचा प्रसंग ओढवला, तर ही आणीबाणी लागू केली जाऊ शकते.  

या दुसऱ्या प्रकारच्या आणीबाणीकडे जर आपण बघितलं, तर आपल्याला लक्षात येईल की, कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस ॲक्टनुसार विरोध प्रदर्शन किंवा मोर्चे, एकत्र जमून केलेला विरोध यामध्ये कुठल्याही प्रकारचा संरक्षणत्मक धोका कॅनडा या देशाला उत्पन्न होत नाही, असे कलम आहे. त्यामुळे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ट्रक चालकांच्या या आंदोलनामुळे असा कुठला धोका इथे उत्पन्न होऊ शकतो? अर्थात या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून यावर भाष्य करण उचित ठरेल. (Canada declares National emergency)

====

हे ही वाचा: भारतामधील या ७ विचित्र कायद्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

====

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, कॅनडात आत्तापर्यंत असा कुठलाही प्रसंग १९८८ नंतर घडला नव्हता की, ज्यासाठी थेट आणीबाणी लागू करावी लागेल. विरोध प्रदर्शन हिंसक होऊ नये यासाठी खबरदारी घेणं हे उचित आहे, पण त्यासाठी आणीबाणी कायदा लागू करणं कितपत योग्य आहे, असा सवाल इथे उत्पन्न होत आहे (Canada declares National emergency)

ट्रक चालक या आणीबाणी वर काय भूमिका घेतात यावर कॅनडा सरकारचं लक्ष असेल, तर ट्रक चालकांच्या भूमिकेवर सरकार पुढचे पाऊल उचलेल, येणाऱ्या दिवसात हे चित्र अजून स्पष्ट होईल!

-निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.