कोणतेही काम करताना तुमची कधी चिडचिड झालीय का अथवा थोडेसे काम केले तरीही टेंन्शन येते का? असे तुमच्यासोबत होत असल्यास सावध व्हा. कारण हे बर्नआउट सिंड्रोमचे लक्षण आहे. काही वेळेस व्यक्तीला माहिती देखील नसते ते या सिंड्रोमचे शिकार झाले आहेत. ज्या कामामुळे आनंद मिळत होता, त्यामुळे डोकेदुखी होत असल्यास काय करावे? हा प्रश्न बहुतांश लोकांना पडतो. यामुळे आपल्या डेली रूटीनमध्ये काही बदल केला पाहिजे. स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. काही वेळेस सुट्टीवरून परतल्यानंतर काम करताना सुद्धा ताण येऊ लागतो. जाणून घेऊयात बर्नआउट सिंड्रोम म्हणजे नक्की काय आणि यामागील कारणे काय आहेत. (Burnout syndromes)
बर्नआउट सिंड्रोम म्हणजे काय?
बर्नआउट सिंड्रोम ही एकप्रकारची तणावाची स्थिती आहे. दीर्घकाळ तुम्ही घर किंवा ऑफिस मध्ये एखाद्या समस्येचा सामना करत असल्यास तेव्हा तुम्ही बर्नआउट सिंड्रोमचे शिकार होता.
एकसमान दैंनदिन रूटीन फॉलो करणे, कामाबद्दल उत्सुकता नसणे, सुट्टी असली तरीही काम करणे देखील तुम्हाला बर्नआउटचे शिकार बनवतो. डब्लूएचओच्या मते बर्नआउट सिंड्रोम क्रॉनिक वर्कप्लेस स्ट्रेसच्या कारणास्तव होतो. जेव्हा तुम्ही कामाबद्दल अधिक ताण घेता तेव्हा याची लक्षणे सुरू होतात.
बर्नआउट सिंड्रोमची लक्षणे
-उगाचच काम अंगावर ओढून घेणे
-शरीरात उर्जा नसणे
-राग आणि चिडचिड होणे
-काहीही करण्याचे मन न होणे
-नोकरी न आवडणे
-झोपेत समस्या येणे
-पॅनिक अटॅक येणे
-ऑफिसला गेल्यानंतर टेंन्शन येणे
-झोप झाल्यानंतरही थकवा जाणवणे (Burnout syndromes)
असे रहा दूर
-आपल्या डेस्कवर मोटिव्हेशनल कोट्स लावा
-ऑफिसला जाण्यापूर्वी मेडिटेशन करा
-ऑफिसचे काम तेथेच पूर्ण करणे
-सुट्टीच्या दिवशी फक्त फिरण्याकडेच लक्ष द्या
-कामामध्ये ब्रेक घेत राहणे
-रिकाम्यावेळी असे काम करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल
-असे कोणतेही काम करू नका ज्याचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होईल. ऑफिसमधील काम घरी आणू नका. याचा परिणाम तुमच्या नात्यांवर होईल.