मोदी सरकारच्या २.० चा अर्थसंकल्प नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला संसदेत जाहीर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये टॅक्सपेअर्स आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सीतारमण यांनी नव्या टॅक्स व्यवस्थेअंतर्गत टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल केले आहेत. त्याचसोबत महिला, रेल्वे, शेतकरी आणि बांधकामाला प्रोत्साहन देण्याची ही घोषणा केली आहेत. अशातच अर्थसंकल्पातील काही मोठ्या घोषणांचा तुम्हाला काय फायदा होणार? कोणत्या आहेत त्या घोषणा याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Budget 2023)
-टॅक्सपेअर्सला मोठा दिलासा
अर्थसंकल्पात सर्वात मोठा दिलासा हा टॅक्सपेअर्सला दिला गेला आहे. सरकारने आपल्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा केली. त्यात नवी कर व्यवस्था डिफॉल्ट टॅक्स व्यवस्था बनवण्यात येणार आहे. नव्या टॅक्स व्यवस्थेत वर्षित उत्पन्न ७ लाखांपर्यंत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
-महिलांसाठी स्पेशल बचत योजना
सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी स्पेशल योजना आणली आहे. त्याला महिला सन्मान बचत योजना असे नाव दिले गेले आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांसाठी त्या अंतर्गत ७.५ टक्के व्याज देणार आहे.
-३८,८०० शिक्षकांची होणार भर्ती
पुढील ३ वर्षात देशातील ७४० एकलव्य शाळांमध्ये ३८,८०० शिक्षकांसह सहाय्यक कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. या शाळांमध्ये ३.५ लाख आदिवासी विद्यार्थ्यी शिक्षण घेात. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या आवासीय विद्यालयांची मदत करते.
-सिगरेटच्या किंमतीत वाढ, मोबाईल-EV स्वस्त
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना लिथियम-लोहाच्या बॅटरीच्या उत्पादनासाठी कस्टम ड्युटीत सुट दिली आहे. या व्यतिरिक्त टेक्सटाइल वगळता बेसिक कस्टम ड्युटीचा दर २१ वरुन १३ टक्के केला जाणार आहे. तर सोनं, चांदीवरील कस्टम ड्युटीत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात इम्पोर्टेड ज्वेलरीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. तसेच सिगरेटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मोबाईल, खेळणी स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन ही स्वत होणार.
-गरिबांना मिळणार हक्काचे घर
आरक्षित वर्गातील लोकांसाठी मोठी घोषणा केली गेली. त्यात प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पीएम आवास योजनेचा खर्च वाढवून ७९००० कोटी रुपये केला आहे. पीएम आवासचा खर्च ६७ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.(Budget 2023)
-जेष्ठ नागरिकांना मोठी भेट
सरकारने वरिष्ठ नागरिक बचत योजनेत अधिकाधिक जमा करण्याची मर्यादा वाढवून ३० लाख केली आहे. तर पोस्ट ऑफिसच्या मासिक इनकम स्किमच्या सिंगल अकाउंटसाठी ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी १५ लाख रुपये करण्यात आली आहे.
-पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य होणार
अर्थमंत्री सीतारमण यांनी शासकीय एजेंसींना सर्व डिजिटल सिस्टिमसाठी पॅन कार्डचा कॉमन आयडेंटिफायरच्या रुपात वापर करण्याच्या प्रस्ताव दिला आहे. यामुळे केवायसीची प्रक्रिया सोप्पी होईलच पण आयकर विभाग आणि अन्य शासकीय एजेंसींसाठी पॅन कार्ड धारकांना कागदपत्रांची पुर्तता करणे ही सोप्पे होणार असल्याची अपेक्षा आहे.
-कृषि क्षेत्रासाठी मोठी घोषणा
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात असे म्हटले की, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एग्री स्टार्टअप्स स्थापन केले जातील. त्यासाठी तरुणांना प्रोत्साहित केले जाईळ. यासाठी कृषि निधी ही तयार करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना इनोवेशन आणि खिशाला परवडणारे मार्ग शोधण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा घेता येणार आहे.
तसेच पशु पालन, डेयरी आणि मत्स्य पालनाकडे ही लक्ष देत शेतीसाठीचे बजेट २० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी असे म्हटले की, आत्मनिर्भर क्लिन प्लांट प्रोग्राममुळे रोग मक्त, गुणवत्ता असणारे प्लांटिंग मटेरियल मिळतील. त्यासाठी २२०० कोटी रुपये खर्च केले जातील. (Budget 2023)
हे देखील वाचा- अर्थसंकल्पाबद्दल सर्व माहिती एकाच क्लिकवर, येथे वाचता येईल पेपरलेस बजेट
-विवाद से विश्वास योजनेचा दुसरा टप्पा
व्यावसायिक वादांवर तोडगा काढण्यासाठी ‘विवाद से विश्वास’ कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. वादांवर एकत्रित तोडगा आमि व्यक्तींची ओळख वेरिफाय करण्यासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. या योजनेत कर, व्याज, दंड आणि शुल्कासंबंधित वादांवर तोडगा काढण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. तसे १०० टक्के आणि वादाचा दंड किंवा व्याजाच्या शुल्काचे २५ टक्के पेमेंट व्यावसायिक युनिट विवादावर तोडगा काढू शकते.
-इंफ्रास्ट्र्क्चरवर १० लाख खर्च करणार सरकार
वर्ष २०२३-२४ च्या आर्थिकसंकल्पात इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च ३३ टक्क्यांनी वाढवून १० लाख रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे.