कोरोनाच्या महासंकटानंतर पुरुषांमध्ये कॉस्मेटिक ट्रिटमेंट करण्याचा ट्रेंन्ड अधिक वाढला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बार्बी मुळे याचा ट्रेंन्ड अधिक जोर धरू लागला आहे. त्या सिनेमात असे दाखवले गेले आहे की, एक पुरुष हा मेल डॉल सारखा दिसण्यासाठी कॉस्मेटिक ट्रिटमेंट बद्दल बोलतो. फॉर्च्युन मॅगजीनच्या रिपोर्ट्सनुसार, आता पुरुष मंडळी सुद्धा आपण चिरतरुण दिसावे म्हणून केवळ एक्सरसाइज आणि डाएटच नव्हे तर कॉस्मेटिक ट्रिटमेंट सुद्धा घेत आहेत. तर पुरुषांसाठी केली जाणारी ट्रिटमेंट म्हणजे ब्रोटॉक्स. अशातच जाणून घेऊयात ब्रोटॉक्स नक्की काय आणि ती बोटॉक्स ट्रिटमेंट पेक्षा किती वेगळी आहे त्याच बद्दल अधिक. (Brotox treatment)
ब्रोटॉक्स म्हणजे काय?
काही वर्षांपूर्वी ब्रोटॉक्स ट्रिटमेंट घेण्याचा ट्रेंन्ड वृद्धांमध्ये होता. मात्र हा ट्रेंन्ड नव्या पिढीत सामान्य झाला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जनच्या रिपोर्ट्सनुसार, २००० ते २०१८ दरम्यान पुरुषांमध्ये कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा ग्राफ २९ टक्क्यांनी वाढला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याचा रेकॉर्डही वाढला गेला आहे.
ब्रोटॉक्स काय आहे हे आता समजून घेऊयात. सर्वसामान्यपणे केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक ट्रिटमेंटला बोटॉक्स असे म्हटले जाते. खासकरुन पुरुष मंडळी जी ट्रिटमेंट करतात त्या बोटॉक्स ट्रिटमेंटलाच ब्रोटॉक्स असे नाव दिले गेले आहे.ही इंजेक्शनच्या माध्यमातून केली जाणारी ट्रिटमेंट आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होऊ शकतात. सुरकुत्या आलेल्या ठिकाणी इंजेक्शन दिले जाते.
बोटॉक्समध्ये वापरले जाणारे न्युटोटॉक्सिन त्वचेत पोहचून मसल्स रिलॅक्स करतात. हे एजिंगचा परिणाम हळूहळू कमी करतात. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास बोटॉक्स ट्रिटमेंटच्या माध्यमातून शरिरातील नसा काही काळासाठी पॅरालाइज केल्या जातात. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. मात्र तरुण दिसण्यासाठी कायमस्वरुपी अशी कोणतीच ट्रिटमेंट नाही. याचा परिणाम तीन ते बारा महिन्यांपर्यंत राहतो. या ट्रिटमेंटमुळे काही परिणाम होतात असे ही काहीजण मानतात. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखत राहणे किंवा सूज येणे अशी समस्या ही होऊ शकते.
एका रिपोर्ट्सनुसार, २००० ते २०२० पर्यंत गल्या २० वर्षांत पुरुषांमध्ये हिप्स आणि गालाची ट्रिटमेंट अधिक केली जाते असे समोर आले आहे. दोन दशकात ६४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये लिप ऑगमेंटेशन आणि लेजर स्किन ट्रिटमेंट सर्वाधिक केली जाते.
विशेतज्ञ असे म्हणतात की, शरिर आकर्षक दिसण्यासाठी या बद्दल जेन-Z लोक फार सीरियस आहेत. यांच्यासाठी फिजिकल एपीयरेंस अधिक महत्त्वाचे आहे. मेट्रोच्या रिपोर्टमध्ये स्किन टेक्निच्या फाउंडर शैली वूड्स अशा म्हणतात की, गेल्या काही काळात पुरुषांमध्ये ब्रोटॉक्स ट्रिटमेंट करण्याचा ट्रेंन्ड अधिक वाढला गेला आहे. ऐवढेच नव्हे तर सोशल मीडियात सुद्धा ते आपला याबद्दलचा अनुभव शेअर करतात.(Brotox treatment)
अन्य एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, ब्रोटॉक्स करण्यामागे अन्य काही कारणे आहेत. कोविड नंतर लोक सेल्फ ग्रुमिंगकडे अधिक लक्ष दे आहेत. व्हिडिओ कॉल्सचा ट्रेंन्ड वाढत चालला आहे. पुरुष मंडळी सुद्धा सुंदर दिसण्यासाठी विविध ट्रिटमेंट आवर्जुन करतात.