“नावं मोठ लक्षण खोटं” अशातली गत असलेल्या ब्रिटन मधील शाही परिवराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.त्यांच्याबद्दलचे विविध खुलासे हे सर्वांना हैराण करणारे आहेत. याआधी प्रिंन्स हॅरीने आपल्या पुस्तकातून काही खुलासे केले. तर मेगन आणि प्रिंन्स हॅरी यांच्या नेटफ्लिक्सवरील सीरिजने त्यात आणखी भर पाडली. अशातच आता ब्रिटन मधील शाही परिवारात रुटीन चेकअप म्हणून फर्टिलिटी चाचणी केली जायची असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. (Britain Royal Family)
ब्रिटेनच्या शाही परिवाराबद्दल लिहिलेल्या पुस्तकातून होत असलेले खुलासे आणि दाव्यांमुळेच ते आता चर्चेत आहेत. शाही परिवाराचे निकटवर्तीय राहिलेले टॉम क्विन यांनी एक पुस्तक लिहिले आहे. ‘गिल्डेड युथ: एन इंटिमेट हिस्टी ऑफ ग्रोइंग अप द रॉयल फॅमिली’.
ब्रिटेन मधील शाही परिवाराची माजी सदस्या प्रिंसेस डायना यांचा विवाह प्रिंन्स चार्ल्स यांच्यासोबत झाला होता. मात्र लग्नापूर्वी १९८१ मध्ये डायनाला फर्टिलिटी चाचणीला सामोरे जावे लागले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यावेळी डायनाला या चाचणी बद्दल सांगितलेच नाही. केवळ प्रिंसेस डायनाच नव्हे तर त्यांची सून प्रिंसेस केट मिडलटन हिच्यासोबत सुद्धा २०११ मध्ये असेच करण्यात आले. प्रिंस विल्यियम यांच्यासोबत विवाह होण्यापूर्वी तिची ही फर्टिलिटी चाचणी केली गेली.
पुस्तकात टॉम क्विन यांनी खुलासा केला आङे की, डायनाला तेव्हा सुद्धा माहिती नव्हते की तिची फर्टिलिटी चाचणी केली जाणार आहे. तिला असे वाटले की, जनरल मेडिकल चेकअपसाठी तिला रुग्णालयात नेले आहे. लेखकाने दावा केला आहे की, तेव्हा त्यांची भेट प्रिंसेस डायनासोबत झाली होती.
डायनाने असे म्हटले होते की, मला असे वाटले सासरच्या मंडळींकडून केले जाणारे प्री-मॅरिटयल चेकअप आहे. रुटीन चेकअप सारखेच. त्यावेळी मी नादान होती आणि मला काहीच कळले नाही, नंतर खरं कळले की, खरंतर ती फर्टिलिटी चाचणी होती.
पुस्तकानुसार २०११ मध्ये प्रिंसेस डायनाचा मुलगा विल्यिम यांनी जेव्हा केट मिडलटन सोबत लग्न करण्याची घोषणा केली तेव्हा लग्नापूर्वी केटची सुद्धा फर्टिलिटी चाचणी केली होती. दरम्यान, केटने सुद्धा याबद्दल काहीही सांगितलेले नाही.(Britain Royal Family)
एक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील असलेली केट प्रिंन्स विल्यिमपेक्षा ६ महिन्यांनी मोठी आहे. केटची आई फ्लाइट अटेंडेंट होती, तर वडिल फ्लाइट डिस्पॅचर होते. त्यानंतर त्यांनी पार्ट्यांमध्ये सप्लाय बिझनेस सुरु केला आणि श्रीमंत झाले. २००२ मध्ये सेंट एड्रुजच्या चॅरिटी फॅशन शो मध्ये केटने एका सुंदर ड्रेसमध्ये कॅटवॉक केले होते. तेव्हा प्रिंन्स विल्यिमला ती आवडली.
२००३ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. २०१० मध्ये विल्यियमने केटला प्रपोज केले. २९ एप्रिल २०२११ रोजी लंडनच्या वेस्टमिंस्टर एबे मेंविलियम आणि केट यांचा विवाह झाला आणि केट मिडलटन आज तीन मुलांची आई आहे.
लज्जास्पद कारण
आपल्या पुस्तकात टॉम क्विन यांनी फर्टिलिटी चाचणी मागील जे कारण सांगितले आहे ते शाही परिवाराच्या लज्जास्पद आहे. त्यांच्या मते ब्रिटेनच्या शाही परिवारात ही परंपरा आहे की, जर शाही परिवारातील एखाद्या मुलाला किंवा प्रिंसला अन्य शाही परिवारातील मुलीव्यतिरिक्त अन्य किंवा दुसऱ्या सामान्य मुलीसोबत लग्न करायचे असेल तर तिला लग्नापूर्वी फर्टिलिटी चाचणीला सामोरे जावे लागेल.(Britain Royal Family)
हे देखील वाचा- ब्रिटीश राजघराण्यालाही अर्थव्यवस्थेची झळ
म्हणजेच फर्टिलिटी चाचणी केवळ यासाठी की मुलगी कोणत्याही शाही परिवारातील नाही. लेखकाच्या मते, ब्रिटिश शाही परिवाराला वंश वाढवण्याची चिंता असते आणि त्यामुळेच शाही परिवाराला हे जाणून घ्यायचे असायचे की, भविष्यात मुलगी ही आई होईल की नाही. लेखकाने अशी शक्यता व्यक्त केली आहे की, जर चाचणीत केट अयशस्वी झाली असती तर तिचा विवाह प्रिंस विल्यिम यांच्यासोबत झालाच नसता.