ब्रिटेनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची वर्णी लागली आहे. दिवाळीनिमित्त त्यांच्या पंतप्रधान पदीच्या बातमीने आता सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. नुकतेच त्यांना कंजरवेटिव्ह पार्टीचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. पेनी मार्डोंटच्या कंजरवेटिव पार्टीच्या नेतेपदाच्या शर्यतीतून नाव मागे घेतल्यानंतर सुनिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांना पक्षातील ३५७ पैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचे समर्थन मिळाले. तर जिंकण्यासाठी १०० खासदारांचे समर्थन असणे आवश्यक होते. तर जाणून घेऊयात ऋषी सुनक यांच्याबद्दलच्या काही खास गोष्ट.(Britain PM Rishi Sunak)
-ऋषी सुनक ब्रिटेनच्या २१० वर्षाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले आहेत. ते जॉनसन बोरिस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
-ब्रिटेनमध्ये पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरुन प्रथमच एक हिंदू नेतृत्व करणार आहे. सुनक यांची पत्नी अक्षता ही भारतीय नागरिक असून आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मुर्ती यांची मुलगी आहे.
-सुनक यांचा जन्म साउथॅम्पटन येथे झाला होता. ते साउथॅम्पटनच्या मंदिरात नेहमी जायचे. त्यांच्या मुलींची नावे अनुष्का आणि कृष्णा आहे.
-ऋषी सुनक यांचे सासरे नारायण मुर्ती यांनी आपले जावई ब्रिटेनचे पंतप्रधान झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. नारायण मुर्तीनी असे म्हटले की, त्यांना सुनक यांच्यावर गर्व आहे आणि त्यांना असेच यश प्राप्त होवो. मुर्ती यांनी पुढे असे म्हटले की, आमचा पूर्ण विश्वास आहे की, देशातील लोकांसाठी ते उत्तम कामगिरी करतील.
-ऋषी सुनक हे पंतप्रधान होणार असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आङेत.
-ऋषी सुनक यांनी २०१५ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी पहिली निवडणूक जिंकली होती. त्याच्या सात वर्षानंतर आता ते पंतप्रधान होणार आहेत.
-सुनक यांची पत्नी अक्षता हिचा जन्म कर्नाटकातील हुबळीतील आहे. (Britain PM Rishi Sunak)
-सुनक यांनी २०२० मध्ये दिवाळीत डाउनिंग स्ट्रीटवर दीवा लावला होता. त्यावेळी ते चांसलर होते. याच वर्षात ऑगस्टमध्ये त्यांनी हर्टफोर्डशायरमधअये इस्कॉनच्या भक्तिवेदांत मनोरचा दौरा केला होता. त्यांनी गौ पूजा सुद्धा केली होती.
हे देखील वाचा- उधारीच्या रु. १० हजार भांडवलावर सुरु झाली इन्फोसिस; या व्यक्तीने दिले होते पैसे
ऋषी सुनक यांनी ब्रिटेनच्या पंतप्रधान पदाची शपथ ही भगवत् गीतेवर हात ठेवून घेतली. तसेच त्यांनी ब्रिटेनच्या वर्णभेदाला शह दिला आहे. यापूर्वी सुद्धा जेव्हा ते अर्थमंत्री होते तेव्हा ही त्यांनी भगवत् गीतेवर हात ठेवून मंत्रीपदाची शपथ घेतली होती.