Home » सौंदर्य-आलिशान लाइफस्टाइल असूनही ‘या’ कारणांमुळे ट्रोल होतात हे स्टार किड्स

सौंदर्य-आलिशान लाइफस्टाइल असूनही ‘या’ कारणांमुळे ट्रोल होतात हे स्टार किड्स

by Team Gajawaja
0 comment
Bollywood Star Kids
Share

बॉलिबूड मधील स्टार किड्स हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहतात. न्यासा देवगण असो किंवा सुहाना खान ते सारा अली खान सारखे स्टार किड्सचे सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॅन फोलोइंग आहे. मात्र काही वेळेस त्यांना ट्रोलचा ही सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये नेपोटिज्मच्या कारणास्तव त्यांना टीकांचा सामना करावा लागत आहे. अशातच नुकत्याच अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही ख्रिसमस पार्टीच्या कारणास्तव ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या व्यतिरिक्त काही स्टार किड्सला आपल्या आलिशान लाइफस्टाइल मुळे ही खुप काही ऐकून घ्यावे लागते. तर जाणून घेऊयात असे कोण स्टार किड्स आहेत जे वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. (Bollywood Star Kids)

-न्यासा देवगण
काजोल याची मुलगी न्यासा देवगण हिने ख्रिसमच्या वेळी खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत पार्टी केली. या पार्टीत न्यासाचा लूक पाहण्यासारखा होता. मात्र ट्रोलर्सने पार्टीतील व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यासाच्या रंगावरुन वाईट कमेंट्स केल्याच. पण तिने घातलेल्या कपड्यांवरुन ही तिच्यावर टीका केली. या व्यतिरिक्त काही लोकांनी ती नशेत असल्याचा आरोप लावला. असे पहिल्यांदाच होत नाही आहे की, जेव्हा न्यासाला सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलेले आहे.

-सुहाना खान
शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना नेहमीच लाइम लाइटमध्ये राहते. सुहाने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरीही तिच्या आगामी सिनेमाची तिचे चाहते वाट पाहत आहेत. सुहाना हिला आपल्या वर्णावरुन नेहमीच ट्रोल केले गेले आहे. काही वेळेस अपशब्दांचा ही वापर केला गेलाय. सुहाने यावरुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर ही दिले होते.

-अनन्या पांडे
चंकी पाडे आणि भावना यांची मुलगी अनन्या पांडे हिने २०१९ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ती स्टुडेंट्स ऑफ द इयर-२, गहराईया आणि लाइगर सह ५ सिनेमांमध्ये दिसून आली आहे. पुढील वर्षात तिचे आणखी दोन सिनेमे येणार आहेत. अनन्याला नेहमीच तिच्या अॅक्टिंग, लाइफ स्टाइल आणि आयक्यु वरुन ट्रोल केले जाते. तिला सुद्धा सुरुवातीला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही सहन करावे लागले होते. एका मुलाखतीत अनन्याने असे म्हटले होते की, तिला ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीचा सल्ला सुद्धा दिला गेला होता.(Bollywood Star Kids)

हे देखील वाचा- आलियाआधी रणबीर कपूर होता या बड्या अभिनेत्रींच्या प्रेमात

-जान्हवी-खुशी कपूर
श्री देवी आणि बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी-खुशी कपूर यांना आपल्या स्टाइलिश लूकमुळे नेहमीच ओळखले जाते. नेहमीच त्यांच्या लूक्सची तुलना चाहते त्यांची महरुम मां हिच्याशी करतात. दोघी बहिणी आपल्या आउटफिट्स आणि बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहेत. पण काही वेळेस त्यांना ही ट्रोल केले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.