Home » सावत्र मुलांनीच केला होता अभिनेत्रीच्या हत्येचा कट

सावत्र मुलांनीच केला होता अभिनेत्रीच्या हत्येचा कट

by Team Gajawaja
0 comment
Bollywood
Share

‘मिलो ना तुम तो हम घबराएं, मिलो तो आंख चुराएं’ हे गाणं आजही ५० वर्षानंतर युट्युबवर २२ मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. १९७० मध्ये दिग्दर्शक चेतन आनंद यांचा सिनेमा ‘हीर रांझा’ मधील हे सुपरहिट गाणे होते. पिवळा कुर्ता, चकचकित हाराने भरलेला गळ आणि मोठ्या केसांवर सफेद रंगाचा गजरा घातलेली अभिनेत्री प्रिया राजवंश हिच्या अदा आजही चेहऱ्यावर हास्य आणतात. (Bollywood)

लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं सदाबहार झाले. ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंश हिने आपल्या २२ वर्षाच्या करियरमध्ये केवळ ७ सिनेमे केले. प्रिया हिचे आयुष्य हिर रांझाच्या कथेसारखेच होते. प्रिया राजवंश हिने सर्व सिनेमे आपल्या नवऱ्यासोबतच केले होते. शिमला मध्ये जन्मलेली प्रिया राजवंशने इंग्लंमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते.

बालपणापासूनच अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न पाहिलेल्या प्रियाला बॉलिवूड मधील हिरोईन व्हायचे होते. त्यासाठी तिने आपले फोटो सुद्धा पाठवले होते. ६० च्या दशकात फिल्म इंडस्ट्री नव्या कथांवर आधारित सिनेमे बनवत होती. प्रियाचे फोटो प्रसिद्ध डायरेक्टर चेतन आनंद यांना मिळाले. चेतन आनंद यांना तिचे फोटो ऐवढे आवडले होती की त्यांनी तिला काम देण्याचा निर्णय घेतला होता. चेतन आनंद यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीनंतर तिचे आयुष्यच बदलले गेले.

प्रिया मुंबईत आली आणि चेतन आनंद यांना भेटली. ६० च्या दशकातील मधला काळ चालू होता आणि चेतन आनंद यांनी प्रिया हिला आपल्या सिनेमात कास्ट केले. धर्मेंद्र आणि बलराज साहनी यांनी सिनेमात मुख्य भुमिका साकारली होती. तर प्रिया राजवंश ही हिरोईन होती. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा खुप सुपरहिट झाला. सिनेमातील गाणी सुद्धा सुपरहिट्स झाली. प्रियाचे करियर वेगाने यश मिळवत होते. याच दरम्यान चेतन आनंद आपल्या बायको आणि मुलांपासून दूर झाले होते.

शुटिंग दरम्यान त्यांची प्रियाशी मैत्री अधिक वाढली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न केले आणि एकत्रित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रिया राजवंशने आपला नवरा चेतन यांच्यासोबत ७ सिनेमांत काम केले. पण दुसऱ्या कोणत्याही दिग्दर्शकांसोबत तिने काम करण्यास नकार दिला होता. चेतन यांना पहिल्या पत्नीपासून २ मुलं होती. दोन्ही मुलं प्रियाचा राग करायचे. ६ जुलै १९९७ मध्ये चेतन आनंद यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. निधनानंतर जेव्हा वसीयतचा खुलासा झाला तेव्हा असे कळले की, आपली अर्धी प्रॉपर्टी प्रिया राजवंश हिच्या नावे करण्यात आली आहे. (Bollywood)

हेही वाचा- अमृताने जेव्हा सैफला करिनासोबत पाहिले तेव्हा…

याच गोष्टीवरुन चेतन आनंद यांची मुलं विवेक आणि केतन आनंद नाराज झाले. दोन्ही मुलांनी प्रियाच्या हत्येचा कट रचला. यामध्ये २ नोकरांच्या मदतीने २७ मार्च २००० रोजी तिची हत्या केली. हत्येच्या ठिक २ वर्षानंतर पोलिसांनी याचा खुलासा केला आणि आरोपींना अटक केली. बदल्याची भावना मनात असल्याने प्रिया राजवंश यांना आपले आयुष्य अशाप्रकारे गमवावे लागले. प्रिया राजवंश हिच्या प्रेमानेच तिचा जीव घेतला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.