Home » 28 वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमातील सीनमुळे नाना पाटेकर आणि संजय लीला भंन्साळींमध्ये झाला होता वाद

28 वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमातील सीनमुळे नाना पाटेकर आणि संजय लीला भंन्साळींमध्ये झाला होता वाद

by Team Gajawaja
0 comment
Share

Bollywood : नाना पाटेकर यांनी आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक उत्तम सिनेमांमध्ये काम केले आहे. यादरम्यान नाना पाटेकरांनी काही दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केलेय. वर्ष 1996 मध्ये नाना पाटेकर यांनी संजय लीला भंन्साळी यांच्यासोबत खामोशी: द म्युझिकल मध्ये काम केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी भंन्साळीसोबतच्या काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. यावेळी दोघांमध्ये काही मतभेद होते. याबद्दलचाच किस्सा सविस्तर जाणून घेऊया…

नाना पाटेकर यांनी म्हटले की, ‘खामोशी: द म्यूजिकल’ च्या सेटवर भंन्साळी आणि त्यांच्यामध्ये काही क्रिएटिव्ह मतभेद होते. सिनेमातील एका सीनमुळे दोघांमध्ये वाद झाले होते. द लल्लनटॉप यांना दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी म्हटले की, या सिनेमादरम्यान, एकदा नव्हे अनेकदा वाद झाले होते. खरंतर, सिनेमातील एक सीनचा उल्लेख करत संपूर्ण प्रकरण सांगितले. (Bollywood)

या सीनवरुन झाला होता वाद
‘खामोशी: द म्यूजिकल’ बद्दल सांगताना म्हटले की, यामधील एक सीनमध्ये पत्नीकडे पाठ करुन पत्ते खेळायचे होते. यावेळी पत्नीला हृदयविकाराचा झटका येते. यावरुनच संजय लीला भंन्साळी आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये वाद झाला होता. संजय लीला भंन्साळी यांनी म्हटले होते की, जेव्हा तुमच्या पत्नीसोबत अशी घटना घडेल तेव्हा जाणवले पाहिजे तुमच्यासोबत काहीतरी झालेय आणि मागे वळून पहावे. पण नाना पाटेकर यांनी म्हटले होते की, जोवर त्यांना मागे वळून पाहण्याचे कारण मिळत नाही तोवर मागे पाहणार नाहीत.


आणखी वाचा :

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.