Bollywood : हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे हृतिकला वेगळी ओखळ मिळाली. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनीच त्याला सिनेसृष्टीत आणले होते. पण राकेश यांना हृतिकला सिनेसृष्टीत लाँच करणे सोपे नव्हते. सिनेमा तयार करण्यासाठी राकेश रोशन यांना घरातील फर्निचरही विकावे लागले होते. तरीही राकेश रोशन यांनी हार मानली नाही. मुलाचा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या एका आठवड्यानंतर राकेश रोशन यांच्यावर एका गँगस्टरने गोळीबार केला होता. याबद्दलचा खुलासा खुद्द हृतिकने एका मुलाखतीत केला होता. वडिलांसाठी त्याला त्यावेळी फार भीती वाटली होती.
हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा वर्ष 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली. दोघांनीही पहिल्यांदाच सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. यानंतर दोघांना वेगळी ओखळ मिळाली.
राकेश रोशन यांच्यावर गोळीबार
हृतिकने एका मुलाखतीत सांगितले की, वर्ष 1999 मध्ये जेव्हा वडिलांनी मला लाँच करण्याचा प्रयत्न केला असता त्यासाठी सिनेमासाठी खूप पैसे लागणार होते. वडील दिवाळखोर झाले होते. त्यांनी घरातील फर्निचरही विक्री केले. परिवार त्यावेळी जमिनीवर झोपत होता. पण ऐवढ्या स्ट्रगलचा फार फायदा झाला आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हिट झाला. पण राकेश रोशन यांच्यावर सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या एका आठवड्यानंतर गोळीबार करण्यात आला. (Bollywood)
या कारणास्तव करण्यात आला होता गोळीबार
हृतिकने म्हटले की, गँगस्टर अली बाबा बुदेशच्या दोन साथीदारांनी राकेश रोशन यांच्यावर त्यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार केला. एक त्यांच्या हाताला आणि दुसरी छातीला लागली गेली. पण सुदैवाने राकेश रोशन यामधून बचावले गेले. खरंतर, गँगस्टर लोकांनी कहो ना प्यार है सिनेमाला झालेल्या नफ्यातील काही हिस्सा मागितला होता. पण यासाठी राकेश रोशन यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
काही आठवडे रुग्णालयात राहिल्यानंतर राकेश रोशन घरी परतले गेले. वर्ष 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत ‘कोई मिल गया’ सिनेमा तयार केला. हा सिनेमाही सुपरहिट ठरला.