Home » बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित आश्रम 3 सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित आश्रम 3 सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

by Team Gajawaja
0 comment
Ashram 3
Share

बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर बहुप्रतिक्षित वेब सीरिज आश्रम 3 (Ashram 3) ची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. सीरिजच्या दोन सीझनला मिळालेल्या उत्कृष्ठ प्रतिसादानंतर आता निर्माते तिचा तिसरा सीझन रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. याच क्रमाने शोच्या निर्मात्यांनी शुक्रवारी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे.

या सीरिजच्या ट्रेलरसह (Trailer) निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी मोठी माहिती देखील शेअर केली आहे. सीरिजच्या दमदार ट्रेलर रिलीज करत निर्मात्यांनी आश्रमच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा काशीपूरच्या बाबांचे राज्य परत आले आहे.

या सीरिजचा ट्रेलर पाहता, असे म्हणता येईल की, प्रकाश झा यांनी ‘आश्रम 3’ मध्ये बाबांच्या काळ्या हेतूंचा एक नवा आणि धोकादायक आभास आणला आहे. ट्रेलर पाहून या सीरिजची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Ashram 3 Official Trailer | Release Date Announced | Bobby Deol MX Player  Web series Part 3 - YouTube

====

हे देखील वाचा: अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले त्याचे मत, म्हणाला…

====

सीरिजच्या या नव्या सीझनमध्ये अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा निर्मल बाबा बन आश्रमात कोर्टात बसताना दिसणार आहे. त्याचवेळी या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील आपल्या बोल्ड आणि आवडीच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावताना दिसणार आहे.

प्रकाश झा निर्मित आणि दिग्दर्शित ही सीरिज जगभरात OTT प्लॅटफॉर्म MX Player वर अगदी मोफत पाहता येईल. ट्रेलर रिलीजबद्दल माहिती देताना, अभिनेता बॉबी देओलने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

====

हे देखील वाचा: शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला राम राम…

====

आश्रम 3 मध्ये अभिनेता बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांच्याशिवाय आदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, सचिन श्रॉफ, अध्यान सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशद राणा, तन्मय रंजन, प्रीती सूद, राजीव सिद्धार्थ आणि जया सील घोष आदी दिसणार आहेत. ‘आश्रम 3’ चे सर्व भाग 3 जून 2022 पासून MX Player वर स्ट्रीम केले जातील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.