प्रमोद महाजन
स्वतंत्र भारताच्या राजकारणात एवढी महत्त्वाची भूमिका त्याअगोदर दुसऱ्या कोणत्याही मराठी नेत्याला बजावता आली नाही. एका राष्ट्रीय नियतकालिकाने प्रमोद महाजन यांची पंतप्रधानपदाच्या दहा संभाव्य उमेदवारांत निवड करावी एवढे राजकीय माहात्म्य अल्पवयात त्यांच्या वाट्याला आले. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यासोबत ते सहजगत्या वावरायचे.
त्यांचा तसा वावर राजीव गांधीपासून शरद पवारांपर्यंत, चंद्रशेखरांपासून लालूप्रसादांपर्यंत आणि टाटांपासून अंबानीपर्यंत सर्व राष्ट्रीय दिग्गजांमध्ये होता. ही कमाई केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या व समयसूचक नेतृत्वगुणाच्या बळावर त्यांना मिळवता आली होती. पण राजकीय क्षेत्रात ते मोठ्या पदावर असतील अशी भविष्यवाणी आधीच एका ज्योतिष्याने करून ठेवली होती.
प्रमोद महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आधीच एका ज्योतिष्यांनी त्यांच्या प्रगतीचे भाकित वर्तवले होते. १९७६ चा आरंभकाळ. नाशिक रोड केंद्रीय कारागृहातली तिसऱ्या क्रमांकाची खाट, पंचवीस-तीस खाट तिथे टाकलेल्या होत्या. उत्तरेच्या टोकावरल्या एका कॉटवर पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते बसलेले. तीन वाजून गेल्यानंतरची वेळ. शास्त्रीबुवांच्या कॉटभोवती दहा स्थानबद्ध गोळा झाले आहेत. त्यातल्या प्रमोद महाजनच्या उजव्या हाताचा तळवा शास्त्रीबुवा बघत होते. एरव्ही प्रमोद महाजन यांचा यावर विश्वास नव्हता. शास्त्रीयबुवांनी सांगितले होते की महाजन यांचे शिक्षण पदवीपुरते असेल पण महाजन यांना राजकारणात भविष्य आहे. हे महाजन यांना खरं वाटलं नव्हतं पण भविष्यात ते प्रत्यक्षात बघायला मिळालं. सत्तेची मोठी पदे येतील एवढी उंची तुम्ही गाठणार आहात असं भाकीतसुद्धा शास्त्रीबुवा यांनी वर्तवलेलं होतं. त्यावर गंमतीमध्ये महाजन यांनी विचारलं, “एवढे सांगितले तर हेही सांगा, मी या देशाचा पंतप्रधान कधी होईन?” मात्र प्रमोद महाजन यांच्या या प्रश्नात दुर्दम्य आत्मविश्वास होता. तो त्यावेळी सर्वांनी ओळखला.
ते मला सांगता यायचे नाही, पण तुमचे त्या क्षेत्रातले योग उच्चीचे आहेत असं त्यावेळी शास्त्रीजींनी सांगितलं आणि ते भविष्यात खरं झालेलंसुद्धा आपण अनुभवलेलं आहे. हा किस्सा अनेकांना माहिती नाही, मात्र यानंतर सुरू झालेला प्रमोद महाजन यांचा प्रवास देशाच्या संरक्षण मंत्रालयापर्यंत पोचला. आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि साध्या स्वभावाने त्यांनी ही मजल मारली होती.
क फॅक्टस टीम