Home » बिटकॉइन म्हणजे काय ?

बिटकॉइन म्हणजे काय ?

by Team Gajawaja
0 comment
Bitcoin
Share

महाराष्ट्रात नवीन सरकार कोणाचे येईल, यासाठी मतदान झाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी या मतांची मोजणी होऊन, नवीन सरकार कोणाचे असेल हे स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. त्याच भाषेचा काय नात्याचाही धुरळा करण्यात आला. करोडोंची रक्कम, सोनं, चांदी, दारु आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. आता मतदान झाल्यावर एक टप्पा पार पडला असला तरी यातूनच एक नवा वादाचा मुद्दा पुढे आला आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची बिटकॉइन संदर्भातील ऑडीओ क्लिप जाहीर झाली. त्यातून सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइनमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बिटकॉइन हा शब्द वारंवार येऊ लागला आहे. त्यातूनच या ऑडीओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख झाला, त्यांच्यावर ईडीनं धाड घालून हे बिटकॉइन प्रकरण निवडणुकीपुरते मर्यादित आहे, या चर्चांना विराम दिला आहे. जवळपास सहा हजार करोडहून अधिक रक्कम या बिटकॉइन मार्फत रक्कम महाराष्ट्राच्या राजकारणात वापरली गेल्याचा आरोप होत आहे. या आरोपांच्या फेरी एकीकडे चालू असतांना बिटकॉइन म्हणजे नेमकं काय याची माहिती जाणून घेतले जात आहे. बिटकॉइन म्हणजे क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. 2009 मध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या एका व्यावसायिकानं ही बिटकॉइनची संकल्पना आणली. (Bitcoin)

तेव्हापासून बिटकॉइन जगातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे. बिटकॉइनचा वापर सट्टेबाज, गुंतवणूकदार करु लागले. विशेष म्हणजे, ज्यांना पैशांचा हिशोब सार्वजनिक करायचा नाही, सरकारपासून तो लपवून ठेवायचा आहे, त्यांच्यासाठीचा एक सुकर मार्ग म्हणून बिटकॉइन एक सर्वोत्तम पर्याय ठरले. अर्थातच या मुख्य मुद्द्यामुळे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे आणि त्याचा वापर करणे म्हणजे, अस्थिरता, फसवणूक आणि चोरी यांसह अनेक जोखमांनाही समजावून घ्यावे लागते. या बिटकॉइनची घोषणा केली तेव्हा सातोशी नाकामोटो यासंदर्भातील फायदे आणि तोटे प्रामुख्यानं स्पष्ट केले होते. बिटकॉइन हे डिजिटल चलन आहे. हे चलन कोणत्याही एक व्यक्ती, गट किंवा संस्थेच्या नियंत्रणाबाहेर पैसे आणि पेमेंटचे स्वरूप म्हणून वापरले जाऊ शकते. त्यामुळेच बिटकॉइन गुंतवणूकदारांमध्ये अधिक प्रसिद्ध झाले. हे बिटकॉइनचे पैसे क्रिप्टोग्राफीद्वारे दिले जातात. बिटकॉइनमधील व्यवहार डिजिटल संदेशांद्वारे पार पडतात. त्यामुळे तेथे काही फसवणूक झाली, तर त्याच्या मुळाशी पोहचणे अवघड ठरते. (Social News)

बिटकॉइनमधील संभाव्य फसवणूक बघूनच बिटकॉइनला केंद्रीय बँकेने मान्यता दिलेली नाही. मग बिटकॉइनचा वापर कोण आणि कसा करतो, हा प्रश्न येतो. तर या बिटकॉइनमध्ये वापर करण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. त्यातून बिटकॉइन ब्लॉकचेन नावाच्या वितरित डिजिटल रेकॉर्डवर तयार केले जातात. बिटकॉइन तयार करण्यासाठी कॉम्प्युटरच्या माध्यमातून जटिल गणिती कोडी सोडवावी लागतात. या प्रक्रियेला खाणकाम म्हणजेच माइनिंग म्हणतात. म्हणूनच या मायनिंग करणा-याना मायनर या नावानं ओळखलं जातं. तर बिटकॉइनच्या सर्वात लहान युनिटला ‘सतोशी’ म्हटले जाते. बिटकॉइन्सचे एकूण प्रमाण 21 दशलक्षांपेक्षा जास्त नसते.
ही रक्कम पाहून अंदाज आला असेल की ज्यांच्याकडे करोडो रुपये नुसते पडून आहेत, तिच मंडळी या बिटकॉइन प्रकरणाकडे वळतात. बिटकॉइनमध्ये जेवढे श्रीमतं तेवढे मायनर खरेदी करता येतात. सामान्यत: सुमारे $10,000 मध्ये नवीन मायनर खरेदी करता येतात. परंतु हेच मायनर म्हणजे, खाण कामगार त्यांच्या सिस्टम अपग्रेड करताना वापरलेल्या खाण कामगारांची देखील विक्री करु शकतात. पूलमध्ये सामील होऊन बिटकॉइन रिवॉर्ड मिळवण्याची शक्यता वाढवू शकतात, परंतु रिवॉर्ड्स शेअर केल्यामुळे लक्षणीय घटतात. (Bitcoin)

======

हे देखील वाचा : बिडेन यांचा घातक निर्णय !

====

पूल निवडताना, ते बक्षिसे कशी देतात, कोणतेही शुल्क काय असू शकते हे शोधणे आणि काही खाण तलाव शोधणे महत्त्वाचे ठरते. अर्थातच ही सर्व प्रक्रीय थोडी क्लिष्ठ असते. त्यासाठी काही मार्गदर्शक शोधावे लागतात. बिटकॉइन वापरण्यासाठी, तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी वॉलेट असणे आवश्यक असते. कोणताही व्यवहार करत असताना यात त्याची एटंरी होते. ही क्लिष्ठ पद्धती असली तरी काळा पैसा लपवण्यासाठी ती सुलभ ठरली त्यामुळे बिटकॉइनची लोकप्रियता वाढली. त्यामध्ये गुंतवणूकदार आणि सट्टेबाजांची संख्या मोठी आहे. 2017 पर्यंत बिटकॉइनची किंमत $1,000 पार केली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये जवळपास $69,000 चा उच्चांक गाठल्यानंतर, 2022 मध्ये बिटकॉइनची किंमत $47,454 वर घसरली. आता 2024 मध्ये या बिटकॉइनची किंमत $50000 पेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
याच बिटकॉइनच्या करोडो रुपयांचा व्यवहार आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही महिन्यात गाजत राहणार आहे. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.