Home » सुरेखा कुडची यांनी जान्हवीवर व्यक्त केला रोष

सुरेखा कुडची यांनी जान्हवीवर व्यक्त केला रोष

by Jyotsna Kulkarni
0 comment
surekha kudachi
Share

बिग बॉस मराठी सुरु झाले तसे अगदी पहिल्या दिवसापासून कमालीचे चर्चेत आहे. सतत भांडणं, वाद यांमुळे हा शो सतत लाइमलाईट्मधे येत आहे. या पर्वामध्ये घरात सहभागी झालेले सर्वच सदस्य त्यांच्या खेळामुळे प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचमुळे यंदाच्या पर्वाने टीआरपीमध्ये देखील मोठी उडी घेतली आहे. या शोमध्ये निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांनी घरातील सर्वच सदस्यांशी भांडणं केली आहे.

जान्हवीला तर तिच्या भांडणांमुळे आणि घरातील जेष्ठ कलाकारांचा अपमान केल्यामुळे शिक्षा देखील झाली आहे. जान्हवी सध्या घरात असणाऱ्या जेलमध्ये राहत आहे. एक आठवडा तिला ही शिक्षा भोगावी लागणार आहे. सध्या ती जेलमध्ये राहत असली तरी तिच्या वागण्यात यत्किंचितही फरक पडलेला दिसत नाही. घरात न राहूनही ती सतत सदस्यांशी पंगा घेताना दिसत आहे. तिच्या याच वागण्यावर आता कलाकारांनी देखील संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. जेलमध्ये असूनही तिचे असे वागणे आता खटकायला लागले आहे. अशातच अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एक पोस्ट शेअर केली असून, जान्हवीवर संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “जान्हवीला ज्या कारणासाठी जेलमध्ये टाकलं आहे. यामुळे तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय का? फरक इतकाच आहे की, आधी वर्षा ताई आणि पंढरीनाथला बोलायची आता निक्कीला बोलतेय… बाकी, बोलणं तसंच, माज तोच बॉडी लँग्वेज तशीच… आणि इतकी मैत्री की, निक्की जेव्हा हिच्याशी बोलत नव्हती तेव्हा हिच आहे ना जिने तिच्या उशीवर बदाम (हार्ट) काढून त्यात लव्ह यू निक्की लिहिलं होतं.

मिस यू लिहिलं होतं… नंतर गळ्यात गळे घालून पप्प्या घेतल्या होत्या. निक्कीसाठी रडली होती. इतकी घनिष्ठ मैत्री अचानक इतका वाईटपणा… एखादीने माफी मागितली असती… चुकले म्हणाली असती… नाही का???? आजचा एपिसोड नीट पाहा त्यात ती घनश्यामला म्हणाली आहे की डोक्यावर पडला आहेस का लाथ घालू का कंबरेत ते ही पाय उचलून…काय म्हणावे आता…”

सुरेखा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या मताला पाठिंबा दिला आहे. “ती निर्लजम सदसुखम आहे”, “कुत्र्याचा शेपूट वाकडे ते वाकडेच असते. जेल मध्ये टाका नाही तर गटारात, लायकी तीच राहते.”, “ती फालतू आहे आणि फालतू च राहणार” आदी अनेक कमेंट्स करत सुरेखा यांना सर्वानी बरोबर म्हटले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.