Home » रितेशने प्रॅन्क करत केली अंकिताची केली कानउघडणी

रितेशने प्रॅन्क करत केली अंकिताची केली कानउघडणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bigg Boss Marathi
Share

बिग बॉस प्रत्येक दिवसागणिक रंगतदार आणि रंजक होत आहे. नुकताच पाचव्या आठवडा संपला. त्यानिमित्ताने भाऊचा धक्का देखील झाला. सगळ्यांचेच लक्ष या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याकडे लागले होते. कारणं बरीच होती. मागच्या आठवड्यात जान्हवीला जेल झाली होती. तिच्याबद्दल रितेश काय बोलणार काय निर्णय घेणार?, मागील आठवड्यामध्ये जोड्यांमध्ये वावरणाऱ्या सदस्यांना या आठवड्यात देखील असेच राहावे लागेल का?

पाचव्या आठवड्यासाठी वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर हे स्ट्रॉंग सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली होती. मात्र वोटिंग लाईन्स या आठवड्यात बंद ठेवण्यात आल्या होत्या, मग घरातून बाहेर कोण पडणार? या आठवड्यात सूत्रसंचालक असलेला रितेश कोणाची शाळा घेणार? आदी अनेक प्रश्न घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनी देखील पडले होते.

अशातच कलर्स मराठी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात अंकिता घरातून बाहेर पडणार असे सांगण्यात आले. मात्र वोटिंग लाईन्स बंद असल्याने असे कसे झाले? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. मात्र रितेश देशमुखने वोटिंग लाईन्स बंद असल्याचे सदस्यांना सांगितले नव्हते. अंकिताची फिरकी घेण्यासाठी रितेशने तिच्याबरोबर एलिमिनेशनचा एक प्रँक केला. रितेशने अंकिता घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आणि सर्वांना अश्रू अनावर झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

धनंजय पवार, सुरज, अभिजीत हे सदस्य प्रचंड भावुक झाले. अंकिताने सगळ्यांचा निरोप घेतला आणि जेव्हा ती घरातून बाहेर पाडण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ आली. जेव्हा हा दरवाजा उघडला तेव्हा अंकिता सेफ असल्याचे समजले. तिला सुरक्षित पाहून डीपी जोरात ओरडून आनंद व्यक्त करू लागले. या दरवाज्या बाहेर एका आरशाच्या खाली लिहिले होते की, “इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा चांगले खेळा. अपेक्षा आहेत…या आठवड्यात तुम्ही सेफ आहात.” हे वाचून सगळ्यांनाच आनंद झाला.

======

हे देखील वाचा : ‘भाऊच्या धक्क्यावर’ विशाखा सुभेदाराने व्यक्त केला रोष

======

अंकिता सेफ झाल्यानंतर रितेशने तिला सांगितले, “अंकिता त्या आरशात नीट बघा. तिथे काय लिहिले आहे नीट वाचा. कारण, हाच आहे भाऊचा धक्का! सांगायचे झाले, तर या आठवड्यात तुम्ही चारही सदस्य सुरक्षित होतात कारण, व्होटिंग लाइन्सच बंद होत्या. पण, तुम्हाला या नॉमिनेशनचं गांभीर्य समजावे म्हणून मी हा सगळा गेम केला. या आठवड्यात एक जण सेफ झाला त्यामुळे पुढच्या आठवड्यात असेच होईल असे नाही. सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्या. येणारा आठवडा अधिक कठीण असणार आहे. कारण, ‘बिग बॉस’ने आता येत्या आठवड्यात खूप कठीण प्लॅन्स बनवले आहेत. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा”

आता रितेशने केलेल्या सूचक वक्तव्यावरून नक्की या नवीन आठवड्यात काय काय कठीण टास्क असणार आहे आणि कोण कोण सेफ राहील?, कोणात वादाची ठिणगी पडेल? हे सर्व पहाणे नक्कीच मजेशीर असणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.