भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात देशातील काही सेनानी असे ही होते की, त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परदेशात जावे लागले आणि आपल्या मायभूमीत पुन्हा परतण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर सुद्धा त्यांनी देशासाठी सेवा करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. जगभरात देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताची बाजू मांडली आणि देशाचे नाव मोठे केले. मादाम भीकाजी रुस्तम कामा (Bhikaji Cama) यांचे सुद्धा यामध्ये नाव सर्वात पुढे आहे. मादाम कामा यांनी विदेशात पहिल्यांदाच भारताचा झेंडा फडकवला होता. मात्र तो झेंडा आजच्या काळात किंवा गांधीच्या काळातील झेंड्यापेक्षा फार वेगळा होता.
दुष्काळ आणि प्लेगमध्ये जनसेवा
भीकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ मध्ये मुंबईतील एका पासरी परिवारात झाला होता. त्यांच्या आयुष्याची बहुतांश वर्ष ही समाज सेवा आणि जनकल्याण करण्यामध्येच गेली. वर्ष १८६९ मध्ये मुंबईतील प्रेसिंडेंसी मध्ये दुष्काळ आणि त्यानंतर आलेल्या प्लेगचा फैलाव झाला. याच दरम्यान भीकाजी यांनी लोकांची खुप मदत केली. ऐवढेच नव्हे तर त्यांना सुद्धा प्लेग झाला होता आणि त्यांना उपचारासाठी परिवाराने लंडन येथे पाठवले.

मायदेशी परतण्याची अट
लंडनमध्ये भीकाजी कामा यांचे देशप्रेम आणि देशासाठीच्या हालचालींमध्ये कुठेही कमतरता आली नाही. त्या होमरुल सोसाइटीच्या सदस्या झाल्या. याचा परिणाम असा झाला की, इंग्रजांना त्यांच्या हालचालींवर आपत्ती वाटू लागली आणि सरकारने लंडन येथूनच मादाम कामा भारतात परततील यासाठी अट ठेवली की, त्या मायदेशी परतल्यानंतर राष्ट्रवादी हालचालींमध्ये हिस्सा घेणार नाहीत. मात्र मादाम कामा यांना ही अट मंजूर नव्हती. इंग्रजांची ही अट त्यांनी मान्य केलीच नाही आणि निराश होण्याऐवजी त्यानी आपल्या देशापासून दूर राहून सुद्धा देशाची सेवा करण्याचा निर्यण घेतला.
युरोपात भारतासाठी प्रचार
मादाम कामा (Bhikaji Cama) १९०५ मध्ये पॅरिसमध्ये निघून गेल्या. तेथे त्यांनी पॅरिस सोसायटीची सहस्थापना केली. त्यांनी भारतासाठी क्रांतीकारी लेखांचा प्रचार केला जो नेदरलँन्ड आणि स्विर्त्झलँन्ड पर्यंत पोहचवला. त्यामध्ये इंग्रजांनी बंदी घातलेले वंदेमातरण गाण्याचा सुद्धा समावेश होता. त्यांच्या साप्ताहिक लेखात फ्रेंच पॉडिचेरी वसाहतीच्या माध्यमातून भारतात तस्करीच्या माध्यमातून पोहचले जात होते.
जगासमोर मांडली भारताची बाजू
मादाम कामा यांची चर्चित उपलब्धि २२ ऑगस्ट १९०७ ची मानली जाते. जेव्हा त्यांनी जर्मनी केस्टुटगार्ड मध्ये आयोजित सेकेंड सोशलिस्ट काँग्रेसमध्ये जगासमोर भारतात आलेला दुष्काळ आणि दुष्प्रभावांना समोर ठेवले आणि मानवाधिकाराच्या आपल्या अपीलमध्ये इंग्रजांच्या सरकारकडे भारतासाठी समानता आणि आत्मशासनाची मागणी केली.
हे देखील वाचा- कोण होते महाराजा हरिसिंग ज्यांना जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन करायचे होते…
पहिल्यांदाच विदेशात भारताचा झेंडा फडकवला
या काँग्रेसमध्ये मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला. तर परदेशात हा झेंडा फडकवणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. मादाम कामा यांचा झेंडा कोलकाताच्या झेंड्यासारखाच थोडाफार होता. मात्र त्यांनी तो स्वत: डिझाइन केला होता. त्यानंतर या झेंड्याच्या आधारावर भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यात आला होता.