एलॉन मस्क हे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. कारण त्यांना लुई विटॉनचे मोएट हेनेसीचे सीईओ आणि प्रेसिडेंट बर्नाड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी मागे टाकले आहे. आता बर्नाड अरनॉल्ट हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एलॉन मस्क यांचे स्टार सध्या त्यांची साथ देत नाही आहेत. तर यंदाच्या वर्षातच इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर सुद्धा सातत्याने खाली पडत आहेत.
एलॉन मस्क हे टेस्लाचे सीईओ आणि सर्वाधिक मोठे शेअर होल्डर आहेत. त्यांची हिस्सेदारी जवळजवळ १४ टक्के आहे. त्यांनी सोशल मीडिया नेटवर्क ट्विटर हे ४४ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते. तेव्हापासूनच त्यांचा कंपनीला नफा फार कमी होऊ लागला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १७८ बिलियन डॉलर आहे. तर बर्नाड अरनॉल्ट यांची १९९ बिलियन डॉलरचे मालक आहेत. म्हणजेच ते एलॉन मस्क यांच्या तुलनेत अधिक श्रीमंत आहेत.

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट?
एलॉन मस्क यांचे अधिक लक्ष टेस्ला ऐवजी ट्विटरवर अधिक राहिले. महिन्याभराच्या करारानंतर ट्विटरची डील फायनल झाली होती. टेस्लाचे शेअर सुद्धा खाली पडले आणि त्याचे कारण ट्विटरचा करार असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले, काही कायदेशीर लढाईनंतर एलॉन मस्क यांनी ४४ अरब डॉलरमध्ये डील केली. ट्विटरवर मालकी हक्क मिळवल्यानंतर ट्विटरच्या नियमात बदल केले आणि नोकरीवरुन ही बहुतांश जणांची हकालपट्टी केली. याचा परिणाम सुद्धा त्यांचा बिझनेस पोर्टफोलिवर झाला आणि शेअर्स खाली उतरले.
हे देखील वाचा- एलन मस्क यांनी आपल्या आत्महत्येबद्दल का सांगितले, ‘हे’ आहे मोठे कारण
कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?
बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) एक फ्रांसीसी व्यवसायिक आणि LVMH मोएट हेनेसीचे अध्यक्ष आणि लुई विटॉन ग्रुपचे सीईओ आहेत. या ग्रुपमध्ये ७० पेक्षा अधिक वेगवेगळे प्रोडक्ट्सच्या कंपन्या येतात. डोम पेरिग्नन, लुई विटॉन, मार्क जॅकब्स आणि फेंटी ब्युटी सारख्या कंपन्या याच ग्रुपचा हिस्सा आहेत.
त्यांना ४ मुलं असून ते हा व्यवसाय विविध हिस्सांमध्ये सांभाळत आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट हे व्यावसायिक परिवारातील आहेत. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात इंजिनिअरिंगपासून केली होती. त्यानंतर त्यांनी ऐवढे मोठे साम्राज्य उभारले. वर्ष १९७१ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या मॅन्युफॅक्चरिंग फर्म फेरेट-सविनेल मध्ये सहभागी झाले. मालकी हक्क सांभाळल्याच्या ठीक ७ वर्षानंतर त्यांनी कंपनीचे नाव फेरिनेल इंक असे ठेवले. तसेच आपला व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी रियल इस्टेटमध्ये ही उतरले. वर्ष १९७९ मध्ये ते अरनॉल्ट कंपनीचे प्रेसिडेंट झाले. सध्या त्यांनी एलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या स्थानावर पोहचले आहेत.