अनेकदा आजारी पडल्यानंतर आपण नेहमी नारळ पाणी पिण्याला महत्व देतो. आजरी माणसाला भेटायला जातांना देखील नारळ पाणीच नेले जाते. याचे कारण म्हणजे हे नारळ पाणी अतिशय पौष्टिक, पचायला हलके आणि ताकद देणारे असते. महाग असले तरी त्याचे फायदे खूपच आहेत. बाराही महिने मिळणारे हे नारळपाणी आपल्या शरीरासाठी अमृतासमान आहे. नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवे. नारळाचे पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. या नारळ पाण्याचे फायदे पाहून आजकाल तर अनेक लोकांनी आपल्या दिवसाची सुरुवात चहा कॉफीने न करता नारळ पाणी पिऊन करण्यास सुरुवात केली आहे. याचे शरीराला अनेक चमत्कारिक देखील होतात. निरोगी राहायचे असेल तर तुमच्यासाठी नारळपाणी हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरास कोणते लाभ होतात जाणून घेऊया. (Marathi News)
त्वचेचे आजार
नारळाचे पाणी आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. नारळ पाणी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने त्वचेला सुरकत्या पडत नाहीत. नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी आणि ई असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. नारळाच्या पाण्यातील पोषक घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात, ज्यामुळे केस-त्वचेवर नैसर्गिक चमक येते. (Todays Marathi Headline)
कोलेस्ट्रॉल कमी करते
हृदयविकारांशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. एका संशोधनानुसार, नारळाच्या पाण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.
पचन चांगले होते
नारळाच्या पाण्यात फायबर मुबलक असतात, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत करते. यात एंजाइम असल्याने ते तुम्ही खात असलेले अन्न बारीक करण्यास मदत करतात. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात.
इलेक्ट्रोलाइट
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यासारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. हे शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी लाभदायक करु शकते. (Top Marathi HEadline )
डिटॉक्सिफिकेशन
नारळ पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील कार्य करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यकृत आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता देखील नारळ पाण्यामुळे वाढते. यामुळे शरीरात भरपूर एनर्जी राहते.
मधुमेहामध्ये फायदेशीर
नारळाच्या पाण्यामध्ये कॅलरीज्, नैसर्गिक साखर आणि कार्बेहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते; यामुळे मधुमेहग्रस्तांनाही नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. (Latest Marathi NEws)
पोटॅशिअमची कमतरता भरून निघते
अतिप्रमाणात मद्याचे सेवन करणाऱ्यांच्या शरीरामध्ये पोटॅशिअमची कमतरता निर्माण होते, ही कमतरता भरून काढण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
रक्तदाब नियंत्रण
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास देखील मदत होते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. उच्च पोटॅशियम सामग्रीमुळे ते सोडियमच्या प्रभावांना संतुलित करण्यास मदत करते. (Top Marathi Trending News)
वजन कमी करण्यास मदत
नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. त्यात ट्रान्स फॅट किंवा कोलेस्टेरॉल नसते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते. हे नैसर्गिक ऊर्जा बूस्टर म्हणून देखील कार्य करते, जे भूक कमी करते आणि अनियमित खाण्याच्या सवयी टाळण्यास मदत करू शकते.
=========
हे देखील वाचा :
Health Care : शरीरातील रक्त वाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन करता? लक्षात ठेवा या गोष्टी
Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत
=========
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
नारळाच्या पाण्यात अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे शरीराला संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यास मदत करते. (Top Stories)
रोगांपासून बचाव
कॅलरीज् आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते, यामुळे रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यास कित्येक रोगांपासून मुक्तता मिळू शकते.
नारळ पाण्याचे कितीही फायदे असले आणि नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते मर्यादित प्रमाणातच घेतले पाहिजे. दिवसातून एक किंवा दोन ग्लास नारळ पाणी पिणे पुरेसे आहे. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने काही लोकांमध्ये इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. (Social Updates)
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics