Home » दीपिका पादुकोणपूर्वी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये केलं परीक्षण

दीपिका पादुकोणपूर्वी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये केलं परीक्षण

by Team Gajawaja
0 comment
Cannes Film Festival
Share

‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाल्याचा अभिमान प्रत्येक कलाकाराला वाटतो. कारण सर्वात जुना आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ असल्याचं सांगितलं जात. यंदाच्या ७५व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकांच्या नावाची घोषणा झाली असून यामध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रीचाही समावेश आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दीपिका पादुकोण आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून दीपिका सामील होणार आहे. त्यामुळे सध्या दीपिका पादुकोणची चांगलीच चर्चा सुरू आहे. दीपिकाच्या पूर्वी बॉलिवूडमधील काही कलाकारांनाही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून बोलावलं होत. दीपिकापूर्वी जे कलाकार ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाले होते त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. (Cannes Film Festival)

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya Rai Bachchan

बॉलिवूडमधील सुंदरी आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपट ‘देवदास’च्या विशेष स्क्रिनिंगसाठी शेखर कपूर यांच्यासोबत २००२मध्ये ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता. मग २००३मध्ये तिला परीक्षक म्हणून बोलावण्यातं आलं होत. (Cannes Film Festival)

विद्या बालन

Vidya Balan

विद्या बालन बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे, जिनं चित्रपटसृष्टीत एक वेगळीच छाप पाडली आहे. ती एक अशी अभिनेत्री आहे, जिच्याकडे स्वतःच्या जोरावर चित्रपट हिट करण्याची क्षमता आहे. विद्या बालन २०१३मध्ये ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. (Cannes Film Festival)

शेखर कपूर

Shekhar Kapur

अनिल कपूर यांचा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांना २०१० साली ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून बोलावण्यात आलं होत. (Cannes Film Festival)

शर्मिला टागोर

Sharmila Tagore

भारताची ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांना २००९मध्ये परीक्षक म्हणून बोलावण्यात आलं होत.(Cannes Film Festival)

मीरा नायर

mira nair

बॉलिवूड अभिनेत्रींव्यतिरिक्त चित्रपट निर्मात्या मीरा नायरही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या भाग राहिल्या आहेत. त्या १९९०मध्ये ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाल्या होत्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.