Home » Beer : बिअरप्रेमींसाठी खुशखबर! २०० रुपयांची बिअर आता फक्त ५० रुपयांमध्ये

Beer : बिअरप्रेमींसाठी खुशखबर! २०० रुपयांची बिअर आता फक्त ५० रुपयांमध्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Beer
Share

जगात दारू पिणाऱ्या लोकांची लोकांची संख्या असंख्य आहे. दारू पिणे म्हणजे प्रेस्टिजची बाब बनली आहे. जगात लोकं विविध प्रकारची, ब्रँडची, किंमतीची दारू पितात. मात्र असे असले तरी दारू पिणाऱ्या लोकांना जर कोणी ‘तुम्हाला काय प्यायला जास्त आवडते?’ असा प्रश्न विचारला तर बहुतकरून सगळ्यांचेच उत्तर बिअर असे असेल. लोकांना बिअर प्यायला फार आवडते. अनेक घरांमध्ये बिअर पिणे हा तर प्रत्येक विकेंडचा अलिखित नियमच असतो. जर तुम्ही देखील बिअरप्रेमी असाल तर ही बातमी नक्कीच तुमचा दिवस आणि विकेंड सुखद करणारी ठरणार आहे. (Beer)

उन्हाळा म्हटल्यावर चिल्ड बिअर पिणे म्हणजे ‘उन्हाळ्याचे शास्त्र असते’. अनेक लोकं आनंदासाठी बिअर पितात तर काही लोकं या बियरचे आरोग्यदायी फायदे जाणून बियर पितात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर बिअरची विक्री कमालीची वाढते. या ऋतूमध्ये बिअरला मागणी देखील खूप असते. त्यामुळे कदाचित आपल्या आवडीची बिअर मिळणे अवघड होऊन जाते. शिवाय मागणी वाढल्यामुळे बिअरच्या किमती देखील भरपूर वाढतात. कधी कधी वाढलेल्या किमतीमुळे मनाला मुरड घालावी लागते. मात्र आता असे अजिबातच होणार नाही. उन्हाळा असला तरी तुमची आवडती बिअर तुम्हाला आणि तुमच्या खिशाला भरपूर आनंद देणारी ठरणार आहे.(Marathi News)

त्याचे झाले असे आहे की, ब्रिटनचे अनेक प्रसिद्ध आणि बिअर ब्रँड्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. या ब्रॅंड्सला भारतात मोठी मागणी असते. मात्र अर्थात ते ब्रिटनचे असल्यामुळे त्याची किंमत नक्कीच जास्त असते. त्यामुळे अनेकदा लोकं ह्या ब्रॅण्ड्सची बिअर पिणे टाळतात. पण ज्यांना ब्रिटनच्या ब्रॅंड्सची बिअर आवडते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटनची बिअर भारतात आता स्वस्त झाली असून, ती कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने ७५ % कमी केला आहे. (Marathi Latest News)

Beer

या कराराअंतर्गत, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या बिअरवरील कर १५० टक्क्यांवरून थेट ७५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे २०० रुपयांना मिळणारी बिअर आता ५० ते ७० रुपयांदरम्यान मिळू शकेल असा अंदाज व्यक्त होत आहे. याचा थेट फायदा बिअरप्रेमींना मिळणार आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी हा करार झाला. (Marathi Trending News)

बिअरवर मर्यादित आयात शुल्क लाभ देण्यात आले असले, तरी वाइनला मात्र यातून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वाइनच्या किंमतीत कोणतीही कपात होणार नाही.बिअरवरच आयात करात कपात करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की भारतात बिअर आता स्वस्त मिळेल. वाईन मात्र आहे त्याच किमतीत मिळणार आहे. (Top Stories)

======

हे देखील वाचा : Syed Ahmed Maroof : हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त !

=======

मुक्त व्यापार कराराअंतर्गत फक्त बिअरच नव्हे तर स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली आहे. स्कॉच व्हिस्कीवरील १५० टक्के असलेला हा कर ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय भारतातून ब्रिटनमध्ये जाणारे कपडे, चमड्याची उत्पादनं यावरील आयात शुल्कात कपात केली आहे. मुक्त व्यापाराच्या या करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार आहे.(Marathi Top Trending News)

बिअरच्या बाजारपेठेचा भारतात दिवसेंदिवस विस्तार होत आहे. २०२४ साली भारतीय बिअर बाजार साधारण ५० हजार कोटी रुपयांचा होता. यात दरवर्षी साधारण ८ ते १० टक्क्यांनी वाढ होत आहे. वाढत्या बाजाराला शहरातील बदलती जीवनशैली आणि युवाकांचे वाढते प्रमाण या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. (Social NEws)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.