ओसामा बिन लादेन हे नाव समोर आलं की, अमेरिकेतील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण ताजी होते. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या ओसामा बिन लादेनने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. (Osama Bin Lager)
या हल्ल्यामुळे फक्त अमेरिकेतच नाही तर जगात दहशत पसरली. जागतिक शक्तीचे केंद्र मानल्या जाणा-या अमेरिकेवर केलेला हा हल्लाच पुढे ओसामा बिन लादेनच्या मृत्युला कारणीभूत ठरला. २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या सैन्याने अबोटाबाद, पाकिस्तान येथील त्याच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात ओसामा आणि त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला.
अमेरिकेचा ओसामावर एवढा राग होता की, त्यांनी त्याचा मृतदेहही कोणाला दिला नाही, तर त्या मृतदेहाला खोल समुद्रात टाकून दिले. या घटनेला आता १३ वर्ष झाली आहेत. तरी या ओसामा बिन लादेनचे नाव काही पुसून टाकता आले नाही. कारण ब्रिटनमध्ये या ओसामा बिन लादेनच्या नावानं चक्क बिअर काढण्यात आली.
ही बिअर त्या ब्रिटनच्या लोकांना एवढी आवडली की, त्यांनी बिअर पिण्याचाच नवा रेकॉर्ड केला. शिवाय बिअरच्या ऑर्डरही मोठ्याप्रमाणात आल्या. या ऑर्डर घेणे मग कंपनीला थांबवावे लागले. त्य़ासाठी तयार झालेली वेबसाइटही बंद करण्यात आली. (Osama Bin Lager)
दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या नावाने आलेल्या बिअरने अवघ्या ब्रिटनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. १३ वर्षांपूर्वी मारला गेलेला अल कायदाचा माजी प्रमुख बिन लादेन याचे नाव युनायटेड किंगडममधील एका बिअरला देण्यात आले, आणि ओसामा पुन्हा जिवंत झाल्याची चित्र ब्रिटनमध्ये तयार झाले. या बिअरच्या बाटलीवर लादेनचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. लिकर कंपनी मिचेल ब्रूइंगने ही बिअर तयार केली आहे. या कंपनीने ‘ओसामा बिन लागर‘ या बिअर ब्रँडची घोषणा सोशल मिडियावर केली.
तसेच बिअरची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. ती छायाचित्रे येताच ब्रिटनच्या नागरिकांनी बिअर विकत घेण्यासाठी एकच गर्दी केली. या बिअरची मागणी इतकी वाढली की, या बिअरचे उत्पादन करणा-या कंपनीला आपली वेबसाइट आणि फोन नंबरही बंद करावे लागले. या बिअर बनवणा-या कंपनीने आतापर्यंत अनेक जागतिक नेत्यांच्या नावाने मद्य बनवले आहे.
उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्या नावावर असलेले किम जोंग अले आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नावावर असलेले पुतीन पोर्टर यांचा यात समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव जाणून तशाच पद्धतीनं मद्य बनवण्यावर त्यांचा जोर असतो. (Osama Bin Lager)
मद्य कंपनीचे मालक ल्यूक मिशेल यांनी जेव्हा ओसामा बिन लादेनच्या नावावर बिअर बनवण्याचे ठरवले तेव्हा त्याच्या पत्नीबरोबर संपर्क केला. त्यांची परवानगी घेऊनच ओसामाचे नाव बिअरला देण्यात आले. मात्र ओसामाच्या पत्नीने या बिअरसाठी हजारो संदेश आणि सूचना केल्या आहेत.
जगातील अनेक हुकूमशहांच्या नावाने मद्य तयार केले आहे. मात्र ओसामाच्या नावाने बिअर तयार करतांना जेवढ्या सूचना आल्या, तेवढ्या अन्य कोणाकडूनही आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थातच एवढ्या सूचना आल्यावर तयार झालेल्या या बिअरला रेकॉर्डतोड मागणी आली. एवढी की कंपनीची वेबसाईटही बंद पडली आणि नंतर सगळ्या ऑर्डर थांबवाव्या लागल्या.
============
हे देखील वाचा : तिस-या महायुद्धाची तारीख सांगणारे भारतीय ज्योतिषी
============
बिलिंगहे, लिंकनशायर येथील वाईन फर्म आणि बार, ल्यूक आणि त्याची पत्नी कॅथरीन मिशेल चालवते. लादेनच्या नावावर असलेल्या बिअरला मिळालेल्या प्रतिसादामुळे हे जोडपे आनंदी आहे. सोशल मीडियावर बिअरची अनेक छायाचित्रे पोस्ट केल्यावर पहिल्या ४८ तास त्यांचा फोन न थांबवा वाजत होता. सतत ऑर्डर येत होत्या. (Osama Bin Lager)
हे जोडपं ज्या हुकुमशहांच्या नावानं बिअर किंवा मद्य निर्माण करते, त्यातून झालेला फायदा ते एका संस्थेला देतात. आत्ताही ओसामा बिन लागर बिअरच्या प्रत्येक बॅरलसाठी, $ १० धर्मादाय दान देण्यात आले आहेत. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना मदत करणारी ही धर्मदाय संस्था आहे. यातून ओसामाच्या कृत्याला त्याच्याच नावातून मदत केल्याचा या दांम्पत्याचा दावा आहे.
सई बने