Home » ब्युटी पार्लरच्या या चुकांमुळे बिघडू शकते तुमचे आरोग्य

ब्युटी पार्लरच्या या चुकांमुळे बिघडू शकते तुमचे आरोग्य

ब्युटी पार्लरच्या चुकांमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशातच तुम्ही काय काळजी घ्याल याबद्दल जाणून घेऊया अधिक....

by Team Gajawaja
0 comment
Curly Hair Craze
Share

Beauty Treatment Tips : बहुतांश महिलांना श्रृंगार करणे फार आवडते. काहींना तर वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट घेणे आवडते. पार्लरला जाणे चुकीचे नाही. पण कधीकधी पार्लरच्या चुकांमुळे तुम्हाला गंभीर नुकसान सहन करावे लागू शकते. खरंतर ब्युटी पार्लरमुळे तुमच्या आरोग्याचे काहीवेळेस नुकसान होऊ शकते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….

ब्युटी पार्लर सिंड्रोम म्हणजे काय?
ब्युटी पार्लर सिंड्रोम एक वैद्यकीय व्याख्या आहे. याचा पहिल्यांचा उल्लेख सन 1993 मध्ये अमेरिकेतील मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये करण्यात आला होता. या शब्दाचा वापर पाच महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासानंतर करण्यात आला होता. अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांना हेअर शॅम्पू केल्यानंतर स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. याच कारणास्तव न्युरोलॉजितल सिस्टिम पाहायला मिळाली होती. या महिलांना आपला तोल जाणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.

नस दाबली जाण्याचा धोका
नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार, हैदराबाद येथील महिलेला हेअर सलूनदरम्यान, सिंकमध्ये चुकीच्या पद्धतीने डोक ठेवल्याने नस दाबली गेली होती. यामुळे महिला ब्युटी पार्लर सिंड्रोमची शिकार झाली होती. याशिवाय महिलेला स्ट्रोकचा देखील सामना करावा लागला होता.

इन्फेक्शनचा धोका
पार्लरमध्ये वॅक्स, हेअर वॉश सारख्या गोष्टींसाठी काही प्रकारच्या कापडांचा वापर केला जातो. दुसऱ्या बाजूला फेशिअलदरम्यान, वापर केल्या जाणाऱ्या पाण्यामुळे देखील तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकत. यामुळे त्वचेवर रॅशेज येणे, खाज येणे किंवा पिंपल्स येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. (Beauty Treatment Tips)

मसाजदरम्यानही होऊ शकते चूक
काहीवेळेस पार्लरमध्ये जाऊन मसाज करताना योग्य पद्धतीने न केल्यास नस दबली जाऊ शकते. अशातच ब्लड सर्कुलेशनवर देखील परिणाम होऊ शकतो. याशिवाय काही गंभीर समस्यांचा धोका वाढला जाऊ शकतो. यामुळे पार्लरमध्ये जात असाल तर वरील काही गोष्टींकडे लक्ष द्या.


आणखी वाचा :
वयाच्या चाळीशीनंतरही सुंदर आणि स्टायलिश दिसायचेय? फॉलो करा या गोष्टी
हिवाळ्यात शरीराचे तापमान गरम राहण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
उपाशीपोटी आवळा खाण्याचे हे आहेत आश्चर्यचकीत करणारे फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.