Beauty Tips : चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनची समस्या निर्माण झाल्यास त्वचेचा लुक बिघडला जातो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतांशजण महागडे प्रोडक्ट्स वापरतात. सुरूवातीला महागड्या प्रोडक्ट्समुळे उत्तम रिझल्ट्सही मिळतात. पण काही काळानंतर पुन्हा त्वचा बिघडल्यासारखी दिसते. पिगमेंटेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. मधात अल्फा हाइड्रॉक्स अॅसिड आणि हायड्रोजन पॅरोक्साइड असते. याच्या मदतीने तुम्ही हायपिग्मेंटेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता.
मुल्तानी माती आणि मध
हायपिग्मेंटेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही मुल्तानी मात आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत दोन चमचे मुल्तानी मातीसह मध मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्याला लावा. या पेस्टमध्ये तुम्ही गुलाब पाणी देखील मिक्स करू शकता. पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुल्तानी माती आणि मधाचा पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेमध्ये फरक दिसेल.
मध आणि कच्च दूध
हायपिग्मेंटेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही दूध आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी दूध आणि मध समप्रमाणात घ्यावे. यानंतर कॉटनच्या मदतीने पेस्ट चेहऱ्याला लावा. दोन ते तीन मिनिटानंर पेस्ट स्वच्छ पाण्याने धुवा. (Beauty Tips)
केळ आणि मधाचा वापर
हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर तुम्ही केळ आणि मधाची पॅक तयार करू शकता. यासाठी केळ स्मॅश करून त्यामध्ये मध मिक्स करा.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)