१९५० च्या दशकात कर्नाटकच्या जंगलात एक राक्षस राहत होता, ज्याच्या नावाने लोक थरथर कापायचे. हा राक्षस माणूस किंवा भूत नव्हता, तर एक स्लॉथ अस्वल होता, ज्याने मैसूर आणि आसपासच्या भागात थैमान घातलं होतं. या अस्वलाने अनेकांचे जीव घेतले आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. म्हणून लोक त्याला राक्षस आणि शैतान म्हणू लागले होते. त्याच्याबद्दल अनेक कथा पसरल्या होत्या. त्यातली एक म्हणजे या अस्वलाच्या मानेवर cain चं निशाण होतं. cain हा आदाम आणि हव्वाचा मुलगा होता. बायबलनुसार, cain ला त्याच्या भावाला मारण्याच्या गुन्ह्याबद्दल देवाने शाप दिला आणि तेव्हापासून त्याच्यावर शापाचं हे चिन्ह चिकटलं. हेच चिन्ह त्या असवलाच्या मानेवर होतं. कोण होता हा अस्वल? आणि त्याचा अंत कसा झाला? चला जाणून घेऊ. (Bears Story)
या गोष्टीची सुरुवात होते कर्नाटकच्या अरसीकेरे तालुक्यातून, जिथे १९५० च्या दशकात एका सुनसान जंगलातून त्याकाळातील भारतातील प्रसिद्ध शिकारी केनेथ एंडरसन शिमोगा येथे जात चालला होता. एंडरसन ब्रिटिश इंडियाच्या काळापासून भारतात राहत होता आणि दक्षिण भारतात जिथे जिथे नरभक्षक प्राण्यांचे हल्ले व्हायचे, तिथे त्याला शिकारीसाठी बोलावलं जायचं. शिमोगाला जाताना त्या रात्री त्याची गाडी अचानक जंगलात बंद पडली. आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि अंधार पडू लागला होता. तेव्हा त्याला अंधारातून कंदील घेऊन जाणारा एक माणूस दिसला तो त्याच्या गाडीजवळ आला. त्याचं नाव होतं आलम बक्स. तो एका छोट्या झोपडीत आपल्या कुटुंबासह राहायचा आणि तिथल्या धार्मिक स्मारकाची देखभाल करायचा. आलमने एंडरसनला गाडी दुरुस्त करण्यास मदत केली आणि जवळ असणाऱ्या आपल्या झोपडीत नेऊन चहा पाजला. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. यानंतर, जेव्हा जेव्हा अँडरसन त्या भागातून जायचा, तेव्हा तो आलमला भेटण्यासाठी थांबायचा.
पुढे दीड वर्षांनंतर बेंगलुरूच्या एका पबमध्ये एंडरसनला त्याच्या मित्राकडून अरसीकेरे परिसरातल्या एका हल्लेखोर नरभक्षक अस्वलाबद्दल समजलं. ज्याने अनेक लोकांचा जीव घेतला होता. त्यावेळी एंडरसनने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आता योगा योग म्हणा किंवा काहीही, पण काही दिवसांनंतर एंडरसनला आलमकडून एक पत्र आलं होतं, जे ऊर्दूत लिहिलेलं होतं. एंडरसनला उर्दू येत नव्हती पण त्याला पत्रातील एक शब्द काळाला. तो शब्द होता अस्वल.. (Bears Story)
मित्राने सांगितलेली अस्वलाची गोष्ट एंडरसनला माहिती होती, म्हणून एंडरसनला कळून चुकलं की, आलम संकटात आहे. तो लगेचच आपली विनचेस्टर रायफल एका बॅगेत कपडे आणि टॉर्च घेऊन आलमच्या घरी पोहचला. तिथे त्याला कळालं की आलमच्या २० वर्षीय मुलावर एका आठवड्यापूर्वी अस्वलाने हल्ला केला होता. जेव्हा तो रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडला तेव्हा झोपडी पासून काही अंतरावरच अस्वलाने आलमच्या मुलावर हल्ला केला. मुलाला भालूने आपल्या नखांनी फाडलं आणि त्याच्या मानेवर सुद्धा हल्ला केला होता. कसा तरी आलमचा मुलगा या जखमी अवस्थेत घरी पोहोचला. पण जखमा इतक्या खोल होत्या की झोपडीच्या दरवाज्यात पोहचताच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने एंडरसनला हदरवलं. त्याने ठरवलं की या अस्वलाला शोधून संपवायचं. त्याचं रात्री तो जंगलात निघाला. आणि अंजीरच्या झाडांजवळ थांबला. त्या रात्री त्याने अस्वलाची खूप वाट पहिली पण अस्वल काही त्याला दिसला नाही.. असं दोन तीन दिवस त्याने अस्वलाच शोध घेतला. पण शेवटी निराश होऊन तो बेंगळुरूला परतला. बेंगलुरूत परतून दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ झाला असताना एंडरसनला वन विभागाच्या अधिकाऱ्याचं पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं की दोन लाकूडतोड्यांवर एका अस्वलाने हल्ला केला. एक जण मरण पावला, तर दुसरा जखमी झाला. त्या अधिकाऱ्याने केलेलं जखमांचं वर्णन आलमच्या मुलाच्या जखमांसारखंच होतं. हा हल्ला आलमच्या घरापासून फक्त २० मैल अंतरावर झाला होता. एंडरसनला कळालं की हा तोच अस्वल आहे. (Bears Story)
तो पुन्हा शिकारीसाठी निघाला यावेळी त्यांनी मैसूर वन विभागाच्या क्वार्टरमध्ये राहायचं ठरवलं, त्या अस्वलाचा शोध पुन्हा सुरू झाला. आशातच आणखी एक घटना घडली. एक छोटा मुलगा जंगलाजवळ खेळत होता आणि त्याचा मोठा भाऊ बकऱ्यांना गवत चरण्यासाठी घेऊन गेला होता. अचानक त्या लहान मुलालाआपल्या भावाची किंकाळी ऐकू आली, त्याने भावला शोधलं पण तो सापडला नाही. तो रडत विभागाच्या क्वार्टरजवळ पोहचला. एंडरसनला त्याने सगळं सांगितलं. आणि एंडरसन त्याच्यासोबत भावाला शोधायला निघाले. रात्र झाली होती, म्हणून त्याने त्या लहान मुलाला परत पाठवलं आणि एकट्याने शोध सुरू ठेवला.
थोड्या वेळाने त्याला व्हीवहळण्याचा आवाज आला. तो आवाजाचा अंदाज घेत एका झाडाखाली पोहचला. तिथे त्या लहान मुलाचा भाऊ जखमी अवस्थेत पडला होता. अस्वलाने त्याला फरपटत जंगलात नेलं होतं. त्याच्या चेहऱ्याचं मांस निघालं होतं, हाड मोडली होती आणि पोट फाटलं होतं.
==============
हे देखील वाचा : Ramnavmi : जाणून घ्या रामायणातील प्रचलित नसलेल्या महत्वाच्या घटना
==============
एंडरसनला माहिती होतं या मुलाला वाचवणं कठीण आहे, पण तरीदगडावर आपटले. आता एंडरसनला सुद्धा चालता येतं नव्हतं. आणि जखमी मुलगा सुद्धा हळू हळू आपले श्वास सोडत होता. एंडरसनने त्या मुलाला तिथेही त्याने त्याला पाठीवर उचललं आणि मदतीच्या शोधात निघाला. पण चालताना एंडरसनचा पाय सटकला आणि ते दोघ सोडलं नाही. रायफल जवळ ठेवून त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहिली. पहाटे त्या मुलाचे श्वास थांबले. दुपार झाली तेव्हा एक वन अधिकारी तिथे आला त्याने एंडरसनला रुग्णालयात नेलं. आणि त्या मुलाचा मृत देह त्याच्या कुटुंबाकडे पाठवला. (Bears Story)
रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की एंडरसनला दोन आठवडे चालता येणार नाही आणि त्यानंतरही चालण्यासाठी त्याला आधार घ्यावा लागेल. पण रुग्णालयात असतानाच एंडरसनच्या मनात अस्वलाल मारण्याचा विचार पक्का झाला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एंडरसन पुन्हा असवलाच्या मागावर लागले. एका रात्री, ११ च्या सुमारास त्यांना आवाज ऐकू आला. त्यांनी टॉर्च आवाजाच्या दिशेने फिरवली. आणि त्यांना एक भला मोठा अस्वल जवळ येताना दिसला, एंडरसनने आपली रायफल उचलली आणि निशाणा साधला. हा तोच अस्वल होता ज्याने अनेकांचे जीव घेतले होते. ज्याच्या त्रासामुळे अरसीकेरेचे गावकरी वैतागले होते. एंडरसनने पुढचा मागचा विचार न करता जवळ येणाऱ्या असवलाच्या डोक्यात गोळी घातली. अस्वल जमिनीवर कोसळला. अखेर मैसूरच्या राक्षसाचा त्या अस्वलाच अंत झाला. (Bears Story)
या अस्वलाने डझनभर लोकांचा जीव घेतला आणि २४ जणांना जखमी केलं होतं. एंडरसन आपल्या पुस्तकात लिहितात, “अस्वल सहसा हानी पोहोचवत नाहीत, पण हा अस्वल प्रचंड हत्यारा बनला होता. त्याचा अंत आवश्यक होता.” या घटनेनंतरही एंडरसनने अनेक हल्लेखोर प्राण्यांचा शिकार केला, पण मैसूरचा हा अस्वल त्यांना कायम लक्षात राहिला.