Home » बावरिया गँगची दहशत इतकी होती लोकं रात्रीचे झोपत नव्हते

बावरिया गँगची दहशत इतकी होती लोकं रात्रीचे झोपत नव्हते

by Team Gajawaja
0 comment
Bawaria Gang
Share

रात्री तुम्ही शांत झोपला आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या घराचा दरवाजा कुऱ्हाडी ने तोडल्याचा आवाज येतो. तुम्ही धावत बघायला जाता आणि बघता तर तुमच्या घरात ४,५ माणसं फक्त लंगोट मध्ये उभे आहेत त्यांच्या संपूर्ण अंगाला तेल लावलेल दिसतय. तुमच्यावर त्यांनी बंदूक रोखली आहे म्हणजे तुम्ही आरडा ओरडा सुद्धा करू शकत नाही. ते तुमच्या घरातलं मौल्यवान सामान आणि पैसे चोरी करून घेऊन जातात. तूमचं नशीब चांगलं असेल तर ते तुम्हाला मारत नाहीत. अगदी अशाच प्रकारे लूटमार आणि हत्या करत एका गँगने १९९५ ते २००६ पर्यंत तमिळनाडू आणि इतर राजांमध्ये दहशत निर्माण केली होती. या गँगमुळे लोक अक्षरश: अनेक रात्र जागून काढायचे. या गँगच नाव होत बावरीया गँग. कोण होती ही बावरिया? ज्यांनी संपूर्ण भारतात इतकी दहशत निर्माण केली होती? आणि त्यांना अटक कशी करण्यात आली ?  जाणून घेऊया. (Bawaria Gang)

 बावरिया गँग ही खरतर गँग नाहीये हा एक समाज आहे. १९ व्या शतकात जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. तेव्हा सुद्धा या समाजातले काही लोक अशा प्रकारेच हत्या आणि लूटमार करत होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी काही राजांची मदत घेतली. तेव्हा त्यांना कळालं की या लोकांनी लाखों लोकांची हत्या केली आहे. मदत घेऊन सुद्धा ब्रिटिश त्यांना पकडू शकले नाही. कारण हे लोक भटक्या जमातीतले होते. ज्यांच वास्तव्य एका ठिकाणी कधीच नसतं. १८५७ च्या उठावा दरम्यान भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. हा उठाव जेव्हा थोडा शांत झाला तेव्हा ब्रिटिशांनी एक कायदा तयार केला. Criminal Tribes Act या कायद्या अंतर्गत ब्रिटिशांनी अनेक भटक्या जमातीच्या लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीघेऊन जन्माला आल्याचे जाहीर केल आणि हजारो लोकांना जेल मध्ये टाकलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळे पर्यंत ते त्यांना अटक करतच राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन भारत सरकार हा कायदा रद्द करून या पीडित लोकांची मदत केली त्यानंतर ते लोक शांतपणे जगू लागले पण काही लोकं त्याला अपवाद होते. ते लोकं म्हणजे हेच बावरिया समाजातील लोकं. मधल्या काळात बऱ्याच प्रमाणात अशी लूटमार आणि हत्येच्या घटना झाल्या पण त्या कोणी केला याचा तपास लागला नाही. (Bawaria Gang)

७ जून १९९५ च्या रात्री वेल्लोर जिल्ह्यात एम. मोहन कुमार नावाच्या माणसाच्या घरावर एका टोळीने हल्ला केला होता. यात त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुलं  गंभीर जखमी झाले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. काही वर्ष या टोळीचा शोध सुरू होता. पण आरोपी  न सापडल्याने ही केस Close करण्यात आली. मग २००० ते २००५ पर्यंत तमिळनाडू राज्यात वेगवेगळ्या भागात एका टोळीने अनेक घरात चोरी करून घरमालकाची गोळ्या घालून किंवा लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याच्या घटना समोर आल्या. या सर्व घटना एकसारख्या होत्या त्यामुळे त्या एकाच टोळीने केल्या आहेत असा संशय पोलिसांना होताच. पण पोलिस त्यांना शोधायच्या आता त्या टोळीने एका आमदाराच्या घरालाच आपलं शिकार बनवलं. (Bawaria Gang)

८ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हे लोकं आमदाराच्या घरात घुसले. त्यातील एक जण बंदुक घेऊन बाहेर उभा होता आणि इतर लोकं कुऱ्हाडीने समोरचा दरवाजा तोडून घरातल्या सदस्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. नक्की झालं काय बघायला खोलीतून बाहेर आलेल्या आमदाराची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही टोळी रोख रक्कम, दागिने आणि मोबाइल घेऊन पसार झाली. घराबाहेर बंदूक घेऊन उभ्या असलेल्या इसमाने आरडाओरडा ऐकून बाहेर आलेल्या शेजाऱ्यांवर गोळीबार केला. नंतर ही टोळी तिथून पळून गेली. ह्या बातमीने तमिळनाडू मध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केलं. जर सरकारमध्ये असणारेच लोकं सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाच्या सुरक्षेच काय असे प्रश्न उठले. (Bawaria Gang)

आणि मग या स्टोरी मध्ये एंट्री झाली एका हीरोची. त्यांच नाव आईपीएस सांगाराम जांगिड़. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगाराम जांगिड़ यांच्या Under एक Investigative Team स्थापन केली. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली अशा सर्व राज्यात या पथकाने तपास केला. आणि या राज्यांमध्ये सुद्धा लूटमारीच्या घटनांचा पॅटर्न सेम आढळला. पण या टीमच्या हाती काहीच लागलं नाही कारण या राज्यांमध्ये आरोपी ला अटक केल्या नंतर आरोपींच्या हातांचे ठसे घेतलेच नव्हते. सांगाराम जांगिड़ यांनी संपूर्ण भारतातल्या जुन्या क्रिमिनल रेकॉर्डसचा तपास केला. ज्यामध्ये आग्रा येथील मध्यवर्ती कारागृहात नोंदविण्यात आलेल्या अंगठ्याच्या ठशाशी गुन्ह्याच्या ठिकाणाहून उचलण्यात आलेल्या एका ठशाशी मॅच झाला. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील चंदनपुरा गावातील बावरिया गुन्हेगार अशोक ऊर्फ लक्ष्मण याचा हा ठसा होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. आणि मग हळू हळू बावरिया गँगच्या गुन्ह्यांमागील गूढ उलगडत गेलं. बावरिया जमातीचे लोकं चोरी करण्या आधी आपल्या कुलदेवी समोर एक बकरी घेऊन जायचे. (Bawaria Gang)

======

हे देखील वाचा : कोयता गँग आटोक्यात का येत नाही?

======

जर ती बकरी कुलदेवी जवळ गेली तर देवीचा आशीर्वाद समजून त्या बकरीचा बळी चढवून गुन्ह्यासाठी तयार वह्याचे. पण जर बकरी देवीपासून लांब गेली तर ते त्या रात्री गुन्हा करत नसतं. कारण तो दिवस त्यांच्यासाठी सेफ नाहीये अशी तयांची मान्यता होती. बावरिया अशोकमुळे पोलिसांना राजस्थानमध्ये राहणाऱ्या बावरिया जमातींची माहिती मिळाली, आणि त्यामुळेच या टोळीचा मोहरक्या धरमसिंग बावरिया याला सुद्धा अटक करण्यात आली. त्यासोबत  आणखी काही जणांना अटक केली त्यातल्या काहींना फाशीची शिक्षा झाली तर काहींना जन्मठेप. आणि हे फक्त आयपीएस सांगाराम जांगिड यांच्यामुळे साध्य झालं. बावरिया गँग संपूर्ण भारतात ट्रक ने प्रवास करायची हायवे ला लागून असलेल्या बंगल्याना त्यांनी सुरवातीला शिकार बनवलं. आपला ट्रक घरापासून एक किलोमीटर अंतरावर उभा करायचे. गुन्हा करून झाला की ते त्या ट्रकने दूर निघून जात असत त्यामुळे त्यांच्यावर कोणालाच कधीच संशय यायचा नाही. आजही भारतात अशा प्रकारच्या घटना घडतात. पण त्या गुन्हेगारांसाठी आजही अनेक आईपीएस सांगाराम जांगिड़ सारखे हीरोस पोलिसदलात कार्यरत आहेत. (Bawaria Gang)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.