Home » Bashar Al-Assad : बेशुमार संपत्तीसाठी अस्मा यांचा घटस्फोटाचा अर्ज

Bashar Al-Assad : बेशुमार संपत्तीसाठी अस्मा यांचा घटस्फोटाचा अर्ज

by Team Gajawaja
0 comment
Bashar Al-Assad
Share

तब्बल 24 वर्ष सिरिया देशावर राज्य केलेल्या बशर अल असाद यांना अवघ्या 24 तासात आपला देश सोडावा लागला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलांनीही रशियाचा आसरा घेतला. बशर यांनी सिरिया सोडला तरी त्यांच्यामागे अनेक गुढ प्रश्न आहेत. मुळात बशर यांच्याकडे अगणित पैसे आणि सोने होते. ही सर्व संपत्ती बशर यांनी कुठे ठेवली याची चर्चा सुरु झाली. सुरुवातीला बशर कुटुंबियांची ही सर्व संपत्ती सिरीयाच्याच बॅंकांमध्ये असल्याची बातमी आली. मात्र नंतर बशर कुटुंबियांनी सिरियात उठाव सुरु झाल्यापासून अनेक विमानांच्या फे-या रशियात केल्याचे उघड झाले आणि रशियाच्या मास्कोमध्ये बशर कुटुंबियांचा खजिना सुरक्षित असल्याचे उघड झाले. या सर्वात बशर यांनाही एका रात्री आपला देश सोडावा लागेल याची कल्पना नव्हती. (Bashar Al-Assad)

मात्र त्यांना रशियानं आपल्या देशात आसरा देण्याचा नावावर नजरकैदेत ठेवले. बशर आणि त्यांच्या कुटुंबियांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नाही. या सर्वात जास्त त्रास झाला तो बशर अल-असद यांची पत्नी अस्मा हिला. अस्मा ही एक बॅंकर म्हणून प्रसिद्ध आहे. बशर यांनी ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या मार्फत जी संपत्ती मिळवली, त्याचे सर्व नियोजन अस्मा यांच्याकडेच होते. मुळात अस्मा यांच्यामुळेच बशर अल-असद एवढे क्रूर झाले असे सिरियात आता सांगितले जात आहे. सिरिया सोडल्यापासून आपल्याला व्हिलन केल्याचे अस्मा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आता एक नवा डाव टाकला आहे. तो म्हणजे, बशर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा. रशियाच्या बॅंकामध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीबाबत सध्या रशियाचे अधिकारी या बशर कुटुंबियांना काहीही माहिती देत नाहीत. (International News)

त्यामुळे अस्मा यांनी घटस्फोट घेतला तर त्यांना न्यायानं यातील अर्धी संपत्ती मिळणार आहे. म्हणूनच अस्मा यांनी नजरकैदेत असतांना थेट रशियाच्या न्यायालयात आपला घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि एकच खळबळ उडवून दिली. बशर दांम्पत्याला ओळखत असलेल्या सिरियामध्ये मात्र अस्मा यांचा हा नवा डाव असल्याचे सांगत अस्मा पैशांच्याशिवाय दुसरा विचार करु शकत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद सध्या रशियाच्या मॉस्कोमध्ये आहेत. रशियामध्ये या बशर कुटुंबियांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र या अशा जगण्याचा अवघ्या आठवड्यात त्यांच्या पत्नी, अस्मा यांना कंटाळा आला असून त्यांनी चक्क बशर अल-असदपासून घटस्फोट हवा असल्याची याचिका रशियन कोर्टात दाखल केली आहे. (Bashar Al-Assad)

त्यांच्या या याचिकेनं एकच खळबळ उडाली. कारण अस्मा यांनी घटस्फोट घेत रशिया सोडण्याची परवानगी मागितली आहे. त्यांच्यासोबत त्यांची तीनही मुले असून अस्मा आपल्या मुलांसह लंडनला स्थायीक होण्याच्या विचारत आहेत. तिथेच त्यांचे आईवडिलही राहत आहेत. मात्र अस्मा असद यांच्या या याचिकेकडे संशयानं पाहिलं जात आहे. मुळात बशर अल-असद आणि अस्मा यांच्या विवाहाला 24 वर्ष झाली आहेत. बशर यांचे आपल्या पत्नीवर प्रेम आहे, त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे त्याची कबुली दिली आहे. (International News)

अस्मा यांच्या प्रेमापोटीच बशर यांनी सिरियासारख्या मुस्लिम बहुल देशात त्यांना हिजाब घालण्याची सक्ती केली नाही. अस्मा या लंडनमध्ये शिकलेल्या असून त्यांची राहणीही पाश्चात्य देशांसारखीच आहे. सिरियामध्येही त्यांनी आपली आधुनिक जीवनशैली सोडली नाही. याला बशर यांचा त्यांना असलेला भक्कम पाठिंबा मानला जातो. या सर्वात आणखी एक कारण पुढे केले जाते ते म्हणजे बशर कुटुंबियांची बेशुमार संपत्ती. 270 किलो सोने, 2 अब्ज डॉलर्स आणि मॉस्कोमधील 18 अलिशान अपार्टमेंट बशर कुटुबियांकडे आहेत. सध्या एवढीच त्यांची संपत्ती उघड होत असली तरी बशर कुटुंबाकडे यापेक्षाही अधिक किंमतीचे हिरे, माणिक असून देशविदेशात त्यांची घरे आहेत. बशर अल-असद यांनी ही सर्व संपत्ती सिरियातील जनतेवर अन्याय करीत कमवली होती. ड्रग्ज उत्पादनात हा देश पुढे होता. (Bashar Al-Assad)

अनेक घातक क्षेपणास्त्रांची निर्मिती करुन ती विकण्यात सिरिया पुढे होता. यातून बशर यांनी गोळा केलेल्या संपत्तीचे नियोजन अस्मा यांच्या हातात होते. सिरियात अस्मा यांना खलनायिका म्हणण्यात येत असे. त्यांच्या चेह-यामागे एक क्रूर महिला लपल्याचे सिरियात सांगितले जाते. आपल्या विरोधकांना बशर नेहमी अस्माच्या सल्ल्यानुसारच ठार करत असत, असेही सांगितले जाते. याच अस्मा यांच्याकडे बशर कुटुंबियांच्या संपत्तीचे नियोजन होते. आता सिरियाची सत्ता गेल्यावर ही सर्व संपत्ती वाचवण्याचे आव्हान अस्मा यांच्यासमोर आहे. त्यामुळेच आता त्यांनी थेट बशर अल-असद यांच्याशी घटस्फोट घेण्याचा डाव टाकल्याची चर्चा आहे. सध्या रशियाने असद यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांचा भाऊ माहेरला आश्रय नाकारला असून असद यांची कोंडी केली आहे.  (International News)

बशर यांना अन्य कुठलाही देश आश्रय देण्यास तयार नसला तरी अस्मा यांच्याकडे सीरिया आणि ब्रिटन या दोन्हीही देशांचे नागरिकत्व आहे. त्यामुळेच त्या ब्रिटनला गेल्या तर रशियातील काही संपत्ती घेऊन जाऊ शकतात असा हिशोब बशर कुटुंबाचा आहे. त्यात अस्मा यांनी घटस्फोट घेतला तर न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान अर्धी संपत्ती अस्मा यांच्या नावावर होऊ शकते. अस्मा यांच्या आजारपणाचा त्या फायदा घेऊ शकतात. अस्मा अल-असाद यांना या वर्षी मे महिन्यात ल्युकेमिया झाल्याचे निदान झाले आहे. स्तनाच्या कर्करोगातून त्या नुकत्याच ब-या झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या तीनही मुलांना सोबत घेऊन त्या ब्रिटनच्या आश्रयाला जाऊ शकतात आणि त्यांच्या भरण पोषणासाठी आणखी संपत्ती आपल्या नावावर करु शकतात. (Bashar Al-Assad)

=======

हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर

=======

असे असले तरी रशियानं याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. ब्रिटननेही अस्मा यांना आपल्या देशात सहज प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. उलट त्यांच्या आई वडिलांची ब्रिटनमधील काही संपत्ती जप्त करुन अस्मा यांना दणका दिला आहे. सिरियामध्ये जेव्हा नवीन सरकार येईल, तेव्हा बशर अल-असद यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. त्यांना देहदंडाची शिक्षा होईल, अशी शक्यता आहे. बशर यांच्यासोबत अस्माही सहआरोपी असतील. असे झाल्यास सिरियातील नवीन सरकार रशियावर बशर यांना आपल्याकडे सोपवावे म्हणून विनंती वा दबाव आणण्याची शक्यता आहे. या सर्वांची कल्पना असल्यामुळे अस्मा आपला बचाव करीत आहेत, अशीच चर्चा त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जानंतर सुरु झाली आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.