Home » रशियातील बार्बी गर्ल

रशियातील बार्बी गर्ल

by Team Gajawaja
0 comment
barbie girl
Share

रशियामध्ये सध्या मोठा वादंग सुरु आहे. रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. नवलनी यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे नाव त्यामागे घेण्यात येत आहे. नवलनी यांच्या मृत्युनंतर अनेक देशांनीही रशियाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यातच गेली दोनवर्ष सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामध्येही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत. मात्र या सर्वांबरोबर सध्या रशियात एका बार्बी गर्लची (barbie girl) चर्चा रंगली आहे. 32 वर्षाच्या या तरुणीच्या प्रेमात चक्क 71 वर्षाचे व्लादिमीर पुतिन पडल्याची चर्चा होत आहे. रशियन सरकारचे सोशल मिडीया हाताळणारी ही तरुणी एका संसद सदस्याची मुलगी आहे. एकाटेरिना कात्या मिझुलिना असं या तरुणीचं नाव असून तीला बार्बी या नावानं ओळखण्यात येते. पुतिन यांचे हे प्रेमप्रकरण पहिल्यांदा त्यांचे कट्टर विरोधक, विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांनीच उघड केले होते. त्याच नवलनी यांचा आता मृत्यू झाला आहे. एकाटेरिना ही अत्यंत सुंदर असून ती अनेक भाषांची अभ्यासकही आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे कट्टर विरोधक असलेले विरोधी पक्षनेते ॲलेक्स नवलनी यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. नवलनी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरुन रशियामध्ये मोठा वादंग सुरु आहे. नवलनी यांची पत्नी आणि आई आता पुतिन यांच्या विरोधात आंदोलन उभे करत आहेत. मात्र व्लादिमीर पुतिन यांच्या नव्या मैत्रिणीची बातमी याचवेळी पुढे आली. व्लादिमीर पुतिन हे 71 वर्षाचे असून त्यांची ही नवी मैत्रिण 32 वर्षाची आहे. बार्बीसारखी (barbie girl) दिसणारी एकटेरिना कात्या मिझुलिना ही एका संसद सदस्यांची मुलगी आहे. पुतिन आणि एकटेरिना यांच्या मैत्रीची बातमी प्रथम युक्रेनच्या मिडियामध्ये देण्यात आली. एकटेरिना ही रशियन अनुवादक म्हणून काम करते, तिने रशियातर्फे चीनचाही दौरा केला होता, अशी माहिती आहे.

वास्तविक पुतिन यांच्या प्रेमकथा नेहमीच चर्चेचा विषय असतो. याआधीही पुतिन आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अलिना काबाएवा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. पुतिन यांनी अलिनासोबत विवाह केल्याचीही बातमी आली. तसेच पुतिन यांच्या अलिशान महलात अलिनाचे फोटोही प्रसिद्ध झाले. अलिनाला दोन जुळी मुलं असल्याची माहिती मिळाली. मात्र जेवढ्या लवकर या प्रेमप्रकरणाची बातमी पुढे आली, तेवढ्याच लवकर त्याला विराम मिळाला. कारण पुतिन यांच्या सुरक्षारक्षकाबरोबर अलिनाचे प्रेमसंबंध उघड झाले. सध्या अलिना सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या मुलांसह अन्य देशात आश्रयासाठी गेल्याचाही माहिती आहे. अलिनाच्या आधी पुतीन माजी फ्लाइट अटेंडंट ल्युडमिला पुतीन यांच्याही प्रेमात पडले होते. ल्युडमिलाबरोबर त्यांचे लग्न 1983 मध्ये झाले. 2014 पर्यंत हे लग्न टिकले. ल्युडमिला यांच्यापासूनही पुतिन यांना दोन मुली असल्याची माहिती आहे. पुतिन आणि स्वेतलाना क्रिव्होनोगिख यांच्याही मैत्रिची चर्चा होती. लक्षाधीश असलेली स्वेतलाना ही सेंट पीटर्सबर्गमधील स्ट्रिपटीज क्लबची मालक होती. तिला पुतिन यांच्यापासून 20 वर्षांची लुईझा नावाची मुलगी असल्याची माहिती आहे.

===========

हे देखील पहा : अमेरिकेत दिला अनोख्या पद्धतीने मृत्यूदंड

===========

आता हेच पुतिन पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची बातमी रशियामध्ये चर्चेत आली आहे. रशियाच्या सेफ इंटरनेट लीगच्या प्रमुख असलेल्या एकटेरिना कात्या मिझुलिना (barbie girl) आणि पुतिन यांच्या प्रेमाची पहिली बातमी युक्रेनमधील मिडियानं दिली. एकाटेरिना रशियाची सिनेटर एलेना मिझुलिना यांची मुलगी आहे. एकाटेरिनाची आई एलेना ही पुतिन यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. जी पुतिनपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. एकतेरिनाने 2004 मध्ये लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून पदवी प्राप्त केली आहे. तिच्याकडे कला, इतिहास आणि इंडोनेशियन भाषेतील पदवी आहे. रशियन सेन्सॉरशिपची ती प्रमुख आहे. ती गुगल आणि विकिपीडियाच्या विरोधात मोहिमेची वकिली करते.

रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या निधनाने रशियात खळबळ उडाली असतांना ब्लादिमीर पुतिन यांच्या नव्या प्रेमप्रकरणाची माहिती पुढे आली. त्यामुळे नवलनी यांच्या मृत्यूच्या बातम्या मागे पडली असून पुतीन यांच्या नव्या मैत्रिणीची माहिती जाणण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.