महाराष्ट्रातील एका व्यक्तीने बांबूची शेती करत लाखो रुपये कमावले. या तरुणाने आयटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर बांबूच्या शेती करण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सुद्धा या तरुणाचे कौतुक केले. प्रशांत दाते असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्याबद्दल एका वनाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. (Bamboo Farming Business)
जगभरात बांबूच्या जवळजवळ १४८ प्रजाती आहेत. यापैकी दाते याने ९८ प्रजाती निवडल्या. रिपोर्ट्सनुसार, त्याचे असे म्हणणे आहे की, एकाच ठिकाणी बांबूचे विविध प्रजाती दिसून येणार नाहीत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने सुद्धा या प्रजातिंसाठी मान्यता दिली आहे. अशातच आता दाते याला अधिकाधिक शेतकऱ्यांमध्ये बांबूच्या शेती संदर्भात जागृकता निर्माण करायची आहे. त्यासंबंधित त्याने काम ही सुरु केले आहे.
सर्वसामान्यपणे बांबूच्या शेतीसाठी ३-४ वर्षांच्या कालावधीत होते. चौथ्या वर्षात त्याची कापणी सुरु होते. यामध्ये जेव्हा बांबूचे एक झाड लावल्यानंतर दुसऱ्या झाडामध्ये ३-४ मीटरचे अंतर ठेवावे लागते. एखादा व्यक्ती या अंतरादरम्यान आणखी एखादी शेती ही करु शकतो. बांबूची पान ही पशूंना चारा म्हणून ही दिली जातात. ऐवढेच नव्हे तर या शेतीमुळे पर्यावरणाला कोणताही धोका उद्भवत नाही. (Bamboo Farming Business)
किती खर्च येतो आणि कमाई?
बाजारात बांबू पासून फर्निचरचे सामान बनवण्याची मागणी खुप आहे. त्यामुळेच बांबूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला उत्तम नफा मिळू शकतो. बांबूची शेती करणारा व्यक्ती एक हेक्टरच्या जमिनित जवळजवळ १५०० ते २५०० झाडं लावू शकतो.
तसेच ही शेती करण्यासाठी प्रत्येक झाडासाठी २४० रुपये असा खर्च येतो ऐवढेच नव्हे तर शासनाच्या मदतीने तुम्हाला त्यामधील १२० रुपये ही दिले जातात. म्हणजेच बांबूची शेती करणाऱ्या व्यक्तीला केवळ ५० टक्के रक्कमच खर्च करावी लागते. उर्वरित रक्कमेचा खर्च हा सरकार उचलते. सरकारकडून मिळाऱ्या पैशांमधील ६० टक्के पैसे केंद्र सरकार आणि ४० टक्के हा राज्य सरकारकडून दिला जातो. या शेतीची संपूर्ण माहिती नोडल अधिकाऱ्यांकडून मिळते.
हे देखील वाचा- लाल गाजर तुम्ही खाल्लेच असेल पण काळ्या रंगाचा गाजर कधी खालंय का?
अशातच ही शेती करुन तुम्ही फार मोठा नफा कमवू शकता. असे समजा की, एका शेतकऱ्याने ३ पट २.५ मीटरचे झाड लावले. अशी त्याने एकूण १५०० झाडं लावली आहेत. असे करुन त्याला ४ वर्षानंतर ३ ते ३.५ लाखांचा नफा होऊ शकतो.