उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने पुन्हा एका क्षेपणस्र चाचणी केली आहे. तमाम देशांनी इशारा दिल्यानंतर ही किम जोंगने न घाबरता क्षेपणस्रची चाचणी केली. आता नॉर्थन कोरियाद्वारे बॅलिस्टिक क्षेपणस्राची (Ballistic Missile) चाचणी करण्यात आली आहे. जापानचे संरक्षण मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली आहे. मंत्रालयाचे अधिकारी यांनी असे सांगितले की, क्षेपणस्राच्या चाचणीसंबंधित आणखी माहिती मिळवली जात आहे.
जापानचे एनएचके राष्ट्रीय टेलिव्हिजनवरील बातमीनुसार असे मानले जात आहे की, उत्तर कोरियाकडून उडवण्यात आलेले क्षेपणस्र हे जापान सागर आणि जापानच्या स्पेशल इकोनॉमिक झोनच्या बाहेर पडले. उत्तर कोरियाने अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा दक्षिण कोरियाचा दौरा तसेच अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जापान मधील पाच वर्षांपूर्वी पाणबुडीविरोधी प्रशिक्षणानंतर क्षेपणास्र चाचण्या तीव्र केल्या आहेत.
यंदाच्या वर्षी उत्तर कोरियाने २० हून अधिक क्षेपणस्र चाचण्या केल्या आहेत त्यांनी अमेरिकेसोबत दीर्घकाळापासून रखलेली आण्विक चर्चा पुन्हा सुरु करण्यास ही नकार दिला आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच असे म्हटले की, असे संकेत मिळत आहेत की, उत्तर कोरिया एका पाणबुडीमधून क्षेपणस्र उडवण्याची चाचणी करण्यासंदर्भात तयारी करत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काही क्षेपणस्र चाचण्या केल्या
अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरियातून मायदेशी परतल्यानंतरच्या काही तासांनी उत्तर कोरियाने एका लहानश्या अंतरावर दोन बॅलिस्टिक क्षेपणस्रांची समुद्रात चाचणी केली होती. हॅरिस यांनी दक्षिण कोरियाच्या आपल्या दौऱ्यावेळी उत्तर कोरियाकडून वाढणारा धोका पाहता आपल्या एशियाई सहयोगी देशांचे रक्षण करण्याच्या अमेरिकेच्या प्रतिबद्धतेवर जोर दिला होता. नुकत्याच उत्तर कोरियाद्वारे करण्यात आलेला ही तिसरे क्षेपणस्र चाचणी होती. उत्तर कोरियाने हॅरिस यांच्या दक्षिण कोरियाचा यात्रेवर पोहचण्याच्या एक दिवस आधीच सुद्धा चाचणी केली होती आणि एक चाचणी त्यानंतर ही केली होती. (Ballistic Missile)
हे देखील वाचा- ईराण मधील हिजाब वादानंतर पाकिस्तानात एअर होस्टेसच्या कपड्यांसाठी काढलाय विचित्र नियम
दरम्यान, कमला हॅरिस यांनी उत्तर कोरियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणस्र चाचण्यांना चिथावणी देणारे कृत्य असल्याचे म्हटले आहे. याचा उद्देश फक्त प्रदेश अस्थिर करणे आहे. त्यांनी असे म्हटले की, अमेरिका आणि दक्षिण कोरिया उत्तरेचे पूर्ण आण्विक निरस्त्रीकरण करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. जापानचे संरक्षण मंत्री यासुकाजु हमदा यांनी सुद्धा चिंता व्यक्त करत म्हटले की, उत्तर कोरिया आपल्या चाचण्यांच्या माध्यमातून आपल्या शस्रांच्या टेक्नॉलॉजी मध्ये सुधारणा करत आहे.