गेल्या काही वर्षांत “बलिदान मास” ही एक प्रथा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी महाराष्ट्रभर पाळली जात आहे. आजवर हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनीसुद्धा स्वराज्यासाठी आणि धर्मासाठीच बलिदान दिलं होतं. त्यांचं बलिदान आजच्या पिढीला समजावं आणि ते व्यर्थ जाऊ नये, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो.
थोडक्यात, छत्रपती संभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल व्यक्त केलेला सामूहिक दुखवटा म्हणजेच हा बलिदान मास. यावर्षी हा बलिदान मास 28 फेब्रुवारीला सुरु झाला असून, तो 29 मार्चपर्यंत पाळला जाणार आहे. पण या बलिदान मासात नक्की काय केलं जातं? याला पाळण्याची मुख्य कारणं कोणती ? या प्रथेमागील हेतू काय आहे? बलिदान मासाच्या प्रेरणेतून काय संदेश दिला जातो? हा कालावधी नक्की किती दिवस पाळायचा, कोणत्या दिवशी सुरू करायचा आणि कधी संपवायचा? हे सर्व जाणून घेऊ. (Balidan Mas)
आता सध्याच्या काळात, जरी ही प्रथा लोकांना माहीत असली तरी, साधारण 1985-86 सालापासून हा बलिदान मास पाळला जातोय. सुरुवातीला याचं स्वरूप एका दिवसापुरतंच मर्यादित होतं. पण आता हे संपूर्ण महिनाभर पाळलं जातं. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत अनेक यातना दिल्या. याचवेळी त्यांना धर्मपरिवर्तनाचाही पर्याय दिला गेला होता, पण संभाजीराजांनी हा पर्याय नाकारला आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जपला. (Update)
अशा परिस्थितीत त्यांनी असंख्य यातना भोगून आपला प्राण सोडला. हीच गोष्ट किंवा हीच भावना केवळ त्यांच्यापुरती वैयक्तिक न ठेवता सामूहिकरित्या त्याचं स्मरण केलं जावं , तर ती छत्रपती संभाजी राजांना मानवंदना ठरेल, अशी भावना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानची आहे. म्हणूनच, हा “बलिदान मास” त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पाळला जातो. मुकरब खानाने जेव्हा छत्रपती संभाजी राजांना पकडलं, तेव्हापासून पुढे 40 दिवस त्यांनी महाराजांना जो त्रास दिला, तो काळ म्हणजेच बलिदान मास, अस शिवप्रतिष्ठानचं म्हणणं आहे.
आता हे ४० दिवस कोणते? तर हा बलिदान मास मार्च महिन्यात येणाऱ्या फाल्गुन शुद्ध अमावस्येच्या आधी 30 दिवस चालतो. हा मास कसा पाळला जातो? तर या महिन्यात शिवप्रेमी अनेक गोष्टी करतात. उदाहरणार्थ, काहीजण पूर्ण टक्कल करतात, काहीजण व्यसन सोडतात, काही जण चप्पल घालत नाहीत, शिवाय आवडत्या वस्तूंचा त्याग करतात आणि बरंच काही.(Balidan Mas)
महत्वाचं म्हणजे अनेकजण या काळात शुभ कार्य टाळतात. या सर्व गोष्टींमागे एकच हेतू आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजी राजांना त्या ४० दिवसात जो काही त्रास झाला असेल, त्याची आपल्याला जाणीव व्हावी. आता हेच बघा ना, जर आपण चप्पल घातली नाही तर आपल्याला चालताना काटा लागेल खडा टोचेल किंवा आणखी काही. त्यावेळी आपल्याला संभाजीराजांना झालेल्या त्रासाची जाणीव होईल. किंवा आपण एखादी आवडती गोष्ट सोडली, तिचा त्याग केला, तर आपल्याला संभाजीराजांच्या त्यागाचं महत्व कळेल. या बलिदान मासात रक्तदानही केलं जातं. (Update)
=============
हे देखील वाचा : Myanmar : म्यानमारच्या सायबर जाळ्यात भारतीय, पाकिस्तानी तरुण !
=============
यामागचा हेतू असा आहे की, छत्रपती संभाजी राजांच तब्बल 40 दिवस रक्त वाहत होत, त्याची जाणीव होण्यासाठी या काळात रक्तदान करून सामाजिक कार्य केलं जातं. सध्या हा बलिदान मास महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील अनेक अमराठी लोकही पाळतात. दरम्यान, या मासाचा शेवट फाल्गुन शुद्ध अमावस्येला, मूक पदयात्रा काढून केला जातो. (Balidan Mas)
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपल्या वडिलांप्रमाणे धाडसी होते, हे तर आपण जाणतोच ! पण छत्रपती संभाजी राजांना ज्या यातना झाल्या, त्यांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी ज्या यातना सहन केल्या त्याचं भान ठेऊन त्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो. आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेऊन म्हणा किंवा आपणही एखादा चांगला बदल करून बघायला काय हरकत आहे, म्हणून तुम्ही हा बलिदान मास पाळणार का ? आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा !