Back Pain Home Remedies : दिवसभर बसून काम केल्याने बहुतांशजणांची पाठ दुखण्यास सुरूवात होते. याशिवाय मानेच्या येथेही दुखू लागते. काहीवेळेस एखादी दुखापत किंवा अपघाताच्या कारणास्तवही पाठ दुखू शकते. या सर्वांपैकी एक सामान्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने बसणे. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
पाठ दुखीपासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय
तीळाचे तेल आणि हळद
हळद घेऊन त्यामध्ये करक्यूमिन असण्यासह अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्मही असतात. मसल्सचे दुखणे दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. पाठ दुखीच्या समस्येवर तुम्ही तीळाच्या तेलात हळद मिक्स करुन त्याची पेस्ट दुखत असलेल्या ठिकाणी लावा. जेणेकरुन पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.
आल्याचे तेल
पाठ आणि मानेच्या आसपासचे दुखणे दूर करण्यासाठी आल्याच्या तेलाचा वापर करू शकता. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेंमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे स्नायूमध्ये दुखणे आणि सूजेची समस्या कमी होण्यास मदत होते. आल्याच्या रस काढून ज्या ठिकाणी दुखते आहे तेथे लावा. अन्यथा मार्केटमध्ये तुम्ही आल्याच्या तेलाचा वापर करू शकता.
लसूण
तीळ आणि लसूणचे तेल मिक्स करून पाठ दुखीच्या समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता. लसूणच्या काही पाकळ्या घेऊन त्या तीळाच्या तेलात गरम करा. आता हे तेल दुखत असलेल्या ठिकाणी लावा. जेणेकरुन पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळेल. (Back Pain Home Remedies)
बर्फ
पाठीच्या दुखण्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. याशिवाय सूजेची समस्या बर्फामुळेही कमी होऊ शकते. पाठीचे दुखणे कमी करण्यासाठी एका कापडात बर्फ टाकून त्याने दुखणे कमी करू शकता. यामुळे पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.