Home » अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलला आदित्य रॉय कपूर, म्हणाला…

अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलला आदित्य रॉय कपूर, म्हणाला…

अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे नाते मोडल्याची सध्या चर्चा आहे. यावर आदित्यने पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे.

by Team Gajawaja
0 comment
B-Town Celebrity
Share

B-Town Celebrity : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दोघे एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत आहेत. पण अलीकडल्या काळात अनन्या आणि आदित्यचे ब्रेकअप झाल्याच्या अफवा उडल्या. यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला. यावरच आदित्यने एका मुलाखतीत म्हटले की, आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी खासगीच ठेवल्या पाहिजेत. खरंतर, सोशल मीडियावर नेहमीच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींबद्दल बोलले जाते असेही आदित्यने म्हटले.

आदित्यने म्हटले की, मला असे वाटते माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी नेहमीच शांत बसलोय. हीच माझी पद्धत आहे. मला कधीच कोणाला माझ्या खासगी आयुष्याबद्दल सांगणे गरजेचे वाटले नाही. हेच कारण आहे की, सर्वकाही मी माझ्यापर्यंत ठेवतो. मला असे वाटते एखाद्याला आपल्या खासगी आयुष्यात एण्ट्री करू देऊ नये. नको त्या गोष्टींवर बोलून वेळ कशाला घालवायचा असेही आदित्यने म्हटले.

काहीही फरक पडत नाही
आदित्यने म्हटले की, माझ्या इमेजबल्ल कोण काय म्हणते याबद्दल मला काहीही फरक पडत नाही. खरंतर सोशल मीडियावर अभिनेता फारसा सक्रिय नसतो. (B-Town Celebrity)

कमेंट्सही वाचत नाही
अभिनेत्याने करण जौहरचा शो कॉफी विथ करणच्या एका एपिसोडचा मुलाखतीवेळी उल्लेख केला. यावेळी म्हटले की, सोशल मीडियावर माझ्याबद्दल लोक काय म्हणतात हे मला माहितेय. पण मी कधीच कमेंट्स वाचत नाही. मला खोलवर काही गोष्टींमध्ये जाण्याची गरज नाही. कारण काहीजण तुम्हाला पसंत करतात तर काहीजण तिरस्कार करतात. भले आदित्यने ब्रेकअपच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले नाही. पण आदित्यला आपले खासगी आयुष्य खासगीच ठेवणे महत्त्वाचे वाटते.


आणखी वाचा :
‘मसान’ सह विक्की कौशलचे हे सिनेमे तुम्ही पाहिलेयत का?
माधुरी दीक्षितचे ‘हे’ गाणे अडकले होते वादाच्या भोवऱ्यात, बंदी घातल्यानंतरही विक्री झाल्या एक कोटी कॅसेट्स

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.