गुगलकडून अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक खास सुविधा सुरु केली जाणार आहे. त्यानुसार Auto Archive नावाचे फिचर गुगलकडून आले असून या संदर्भात एका ब्लॉद पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली गेली आहे. हे फिचर स्मार्टफोन युजर्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या अॅपच्या डेटाला हटवण्यास मदत करणार आहे. याच्या मदतीने डिवाइसमधील स्टोरेज स्पेस अधिक वाढला जाणार आहे.
परंतु युजर्सचा डेटा या फिचरच्या माध्यमातून हटवला जाणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. हे केवळ कमी वापर केल्या जाणाऱ्या अॅपच्या डेटाला आर्काइव करणार आहे. त्याचसोबत हे डिवाइसवर क्लाउड आयकॉनसोबत अॅपच्या उपस्थितीला मार्क करणार आहे.
ऑटो-आर्काइव एक नवे फिचर आहे. ज्यामुळे युजर्सला अॅपला पूर्णपणे अनस्टॉल केल्याशिवाय डिवाइसवर स्पेस रिकामा करण्याची परवानगी देणार आहे. गुगलचे असे म्हणणे आहे की, एकदा जेव्हा युजर्स ऑप्ट इन केल्यास तर स्पेसचा बचाव करण्यासाठी कमी वापर केल्या जाणाऱ्या अॅप्सला डिवाइसच्या माध्यमातून हटवले जाणार आहे. तसेच अॅप आयकॉन आणि युजरचा अॅप डेचा सुरक्षित ठेवला जाईल.
पण जेव्हा युजर याचा पुन्हा एकदा वापर सुरु करतील तेव्हा ते पुन्हा डाउनलोड करण्यासाठी केवळ एक टॅप करावे लागणार आहे. तेथून ते पुन्हा वापरु शकतात.
Auto Archive काय आहे?
ऑटो आर्काइव युजर्ससाठी आपल्या डिवाइस स्टोरेजला मॅनेज करण्याची एक सोप्पी पद्धत आहे. हे डेवलपर्ससाठी आपल्या अॅप्सला अनइस्टॉल होण्याची संभावना कमी करण्याचा एक बेस्ट पर्याय आहे. जेव्हा एखादा अॅन्ड्रॉइड युजर प्ले स्टोरच्यामाध्यमातून अॅप इंस्टॉल करेल आणि त्याचे डिवाइसमध्ये स्टोरेज पूर्ण भरला जाईळ तेव्हा त्याला ऑटो आर्काइव फिचरचा वापर करण्याच संकेत मिळेल.
अशातच तुम्ही अॅप डाउनलोड करु शकणार नाहीत आणि तुम्हाला तुमचा स्टोरेज पू्र्ण भरल्याचे दाखवले जाईल.त्याचसोबत या फिचरच्या माध्यमातून तुमच्याकडे कधीपर्यंत पुरेसा स्टोरेज नाही हे सुद्धा शोधून काढेल.
हे देखील वाचा- Truecaller च्या युजर्ससाठी लाइव कॉलर आयडी फिचर लॉन्च, असा करा वापर
या व्यतिरिक्त गुगलने नुकत्याच त्यांच्या मॅपसाठी नवे फिचर आणले आहे. खरंतर गुगल नेहमीच आपल्या युजर्सच्या उत्तम अनुभवासाठी वेळोवेळी नवे फिचर्स आणि अपडेट आणत असतो. अशातच त्यांनी मॅपमधी या फिचरमध्ये एखाद्या ठिकाणी न जाता तेथील काही गोष्टी अनुभवता येणार आहेत. सोप्प्या शब्दांत बोलायचे झाल्यास तर वर्च्युअली कोणतेही ठिकाण तुम्हाला एक्सप्लोर करता येणार आहे.