Home » शासन आग्र्यामध्ये केले पण औरंगजेबाची कबर मात्र महाराष्ट्रात बांधली… असं का?

शासन आग्र्यामध्ये केले पण औरंगजेबाची कबर मात्र महाराष्ट्रात बांधली… असं का?

by Team Gajawaja
0 comment
Aurangzeb Grave
Share

सत्तारुढ शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी नुकतीच अशी मागणी केली की, महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून मुघल बादशाह औरंगजेबाची कबर ही हैदाराबादला स्थलांतरित करावी. शिरसाट यांनी हे विधान अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अनिश्चितकालीन आंदोलन सुरु झाल्यानंतर केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, जर औरंगजेबाची ऐवढीच आत्मियता असेल तर त्याची कबर ही हैदराबादला घेऊन जा. तेथे स्मारक उभारा पण आंदोलन थांबवा. (Aurangzeb Grave)

AIMIM आमदार शारिक नक्शबंदी यांनी शिवसेना नेत्याला उत्तर देत असे म्हटले की, जर त्यांना औरंगजेबाचा ऐवढाच तिस्कार वाटतो तर जी-२० प्रतिनिधींना त्यांची पत्नी रबिया-उल-दौरानीची कबर, बीबी का मकबरा दाखवण्यासाठी का नेले गेले, जो १६६८ मध्ये त्याचा मुलगा मुहम्मद आजम शाह याने बनवला होता.

मुघलांच्या काळातील सर्वाधिक क्रुर बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेबाची कबर ही संभाजीनगरात आहे. गेल्याच वर्षात औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर केले गेले होते. हे पहिलेच प्रकरण नाही की, जेव्हा अशा प्रकारचा वाद निर्माण झाला आहे. गेल्या वर्षात मे महिन्यात एमआयएमआयएम आमदार अकबरउद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या येथे भेट दिली असता तेव्हा वाद निर्माण झाला होता. तर जाणून घेऊयात औरंगजेबाच्या कबरीचा किस्सा.

आग्रात शासन पण माहाराष्ट्रात कबर?
औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातील औरंगाबाद पासून २५ किमी दूर स्थित असलेल्या खुल्दाबाद मध्ये आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, अखेर आगरा आणि दिल्लीतून हिंदूस्तानावर शासन करणारा बादशाहाची कबर ही औरंगाबाद मध्ये का बांधली गेली? याचे उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात दिले आहे.

कबर कशी आणि कुठे असावी या बद्दल औरंगजेबाने मृत्यूपूर्वीच आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात औरंगजेबाला आपण जे काही केले त्याचा त्याला पश्चाताप झाला, आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल त्याला वाईट वाटू लागल्याने त्याने आपले मृत्यूपत्र आधीच तयार केले. त्यामध्ये असे लिहिले की, माझ्या मृत्यूचा पश्चाताप करु नये. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करु नये. कबर अशा ठिकाणी तयार करावी जेथे सावली सुद्धा पडणार नाही. तसेच मृत्यूनंतर माझा चेहरा संपूर्ण झाकावा जेणेकरुन अल्लाहाची माझी थेट भेट होईल. (Aurangzeb Grave)

औरंगजेब हा सुफी संत सैयद जैनुद्दीन यांना आपले गुरु मानत होता. इतिहासकार डॉ. कुरैशी असे लिहितात की, बादशाहच्या मृत्यूपूर्वी खुप आधी सुफी संत सैयद जैनुद्दीन यांचा मृत्यू झाला. त्यांची कबर औरंगाबाद मध्ये बांधली गेली. हेच कारण होते की, औरंगजेबाला वाटत होते की, मला सुद्धा तेथेच दफन केले पाहिजे.

मुघलांचे मकबरे फार मोठे असायचे. मात्र औरंगजेबाचा मकबरा अगदी साध्या पद्धतीचा बनवला गेला. इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, १९०४ मध्ये जेव्हा लॉर्ड कर्जन भारतात आले तेव्हा त्यांनी लाकडाच्या मकबऱ्यात संगमरवराचे काही बांधकाम केले.

हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक मोठी स्मशानभूमी

औरंगाबादशी असलेली आत्मियतेची कथा बादशाहच्या शासनकाळाशी संबंधित आहे. शहाजहांने पहिल्यांदा आपला तिसरा मुलगा औरंगजेबाला दौलताबादला पाठवले होते. १६३६ ते १६४४ पर्यंत त्याला तेथील सुभेदार बनवले गेले. काही महिन्यानंतर औरंगजेबाच्या शासनाचे केंद्र दौलताबाद बदलून औरंगाबाद केले गेले. कारण हे शहर त्याला अगदी जवळ होते. औरंजेबाने दौलताबाद ते एलुरु पर्यंत संपूर्ण दख्खनचा दौरा केला. येथे शासन करत काही बांधकामे केली. हिमायत बाग आणि किल्ल्यांसह काही गार्डन्स तयार केले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.