ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कुठल्या राशींना कुठल्या राशीला लाभदायक ठरणार, कुठल्या राशीला त्रासदायक? पाहूया या आठवड्याचे राशिभविष्य (August Weekly Horoscope)

मेष – आपल्या राशीतून राहू, हर्षल, द्वितीय स्थानात मंगळ, सुखस्थानातून रवि आणि शुक्र, पंचमस्थानातून बुधाचे, तर सप्तमस्थानातून केतूचे आणि दशमस्थानातून शनी, प्लूटो व मीन राशीतून म्हणजेच व्ययस्थानातून गुरूने भ्रमण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानातून म्हणजेच मीन राशीतील गुरुवरून होणार्या चंद्राच्या भ्रमणामुळे धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. तसेच ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीची अनुभूती येईल. आपण केलेल्या इच्छेची पुर्तता झाल्यामुळे मनस्वी आनंद होईल. कामानिमित्त प्रवास घडतील. उत्तरार्धात धनस्थानातील लग्नेश मंगळावरून होणार्या चंद्राच्या भ्रमणामुळे अचानक धनप्राप्ती होईल. कुटुंबासाठी खर्च कराल. बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील. कौटुंबिक जबाबदार्या स्वीकाराल.
शुभ दिनांक – 15, 16

वृषभ – व्ययेश मंगळाने 10 ऑगस्ट रोजी आपल्या राशीत प्रवेश केला आहे, तर आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशीतील गुरू – नेपचून वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अनोळखी व्यक्तींचे सहकार्य लाभेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा अनुभव येईल. व्यापार व्यवसायात अनेकांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा खेळेल. व्ययस्थानातील राहू हर्षल वरून चंद्राचे होणारे भ्रमण कामामुळे परदेश प्रवास घडवणारे राहील. नवीन व्यावसायिक करार होतील. उत्तरार्धात आपल्या राशीतील मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धाडसी निर्णय घेतले जातील. दिनांक 17 रोजी सुखस्थानाचा अधिपती रवी सुखस्थानात प्रवेश करत आहे, तर पंचमेश बुध सुखस्थानातून दिनांक 20 रोजी पंचम स्थानात प्रवेश करत आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक – 20, 21

मिथुन – आपल्या राशीच्या दशमस्थानातून दशमेश गुरु वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी-व्यवसायात सुसंधी चालून येतील. आजवर केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल. बढती बदलीचे योग येतील. आपण केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली जाईल. सामाजिक कार्यात पत प्रतिष्ठा लाभेल. आपल्या राशीच्या लाभस्थानातील राहू हर्षल वरून चंद्राचे होणारे भ्रमण व्यवसाय उद्योगातील नवीन योजनांना आकार देणारी राहील. अनपेक्षित लाभ होतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. क्रोध आणि आपली वाणी यावर संयम ठेवा. आपली कामे पूर्ण करण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. एखादी जुनी व्याधी डोके वर काढण्याची शक्यता संभवते. व्ययस्थानातील मंगळामुळे उष्णतेच्या विकारांचा त्रास होऊ शकतो.
शुभ दिनांक 15, 16

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीत रवि शुक्र आहेत, तर दिनांक 17 रोजी राशीतील रवी सिंह या त्याच्या स्वराशीत धनस्थानात प्रवेश करत आहे. तर राशीस्वामी चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातील गुरु नेपच्यून वरून होत आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दशम स्थानात असणाऱ्या राहू हर्षल वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे व्यवसाय वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपली आर्थिक आवक वाढणार आहे. जुनी येणी वसूल होतील. उत्तरार्धात मित्र परिवाराबरोबर सहलीचे बेत आखले जातील. धाडसी निर्णय घेतले जातील. थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने आपल्या कामांना गती मिळेल. दिनांक 20 रोजी धनस्थानातून तृतीयेश बुधाचा तृतीय स्थानात प्रवेश होत आहे. तेव्हा महत्त्वाचे करार होतील.(August Weekly Horoscope)
शुभ दिनांक – 17, 18

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून रवी आणि शुक्राचे भ्रमण होत आहे. दिनांक 17 रोजी रवी आपल्या स्वराशीत प्रवेश करत आहे. उंची वस्त्रालंकाराची खरेदी केली जाईल. सामाजिक पत प्रतिष्ठा उंचावेल. अष्टमस्थानातील गुरु नेपच्यून वरून चंद्राचे होणारे भ्रमण अध्यात्मिक प्रगती करणारे राहील. अचानक धनप्राप्ती होण्याचे योग दिसत आहेत. भागीदारी व्यवसायातून नवीन संधी प्राप्त होतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. प्रवासात आपले खिसा, पाकीट सांभाळावे. उत्तरार्धात व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली करताना सतर्क राहून निर्णय घ्यावेत कारण फसवणूक होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाई गडबडीनेे घेऊ नयेत.
दिनांक 19, 20

कन्या – आपल्या राशीतील सप्तम स्थानातील गुरु वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाह इच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायातून सुसंधी चालून येतील. कामाचा व्याप वाढेल, त्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम केले जातील. जुनी येणी वसूल होतील. अष्टमस्थ राहू हर्षल वरून होणारे चंद्राचे भ्रमण काहीसे त्रासदायक राहील. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे म्हणजे पुढील धोके टळतील. उत्तरार्धात आपल्या राशीत येणारा बुध आपल्या वाक्चातुर्यामुळे आपली कामे मार्गी लावणारा ठरेल. भाग्यस्थानातील मंगळावरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे भावंडांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत सहलीचे बेत आखून पार पाडले जातील. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.
शुभ दिनांक – 15, 16
====
हे देखील वाचा – ५५० वर्षांपूर्वीचा ममी, बसल्या जागीच भिक्षुने त्यागले होते प्राण
====

तूळ – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील गुरु आणि नेपच्यून वरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम केल्यामुळे आपला फायदा होईल. चांगल्या संधी चालून येतील कौटुंबिक शुभ समारंभाच्या निमित्ताने मातुल घराण्याच्या गाठीभेटी होतील. आठवड्याची सुरुवात मोठ्या आनंदाने उत्साहाने होईल. फक्त सप्तम स्थानातील राहू हर्षल वरून होणारे चंद्रभ्रमण कामानिमित्त प्रवास योग घडवणारे असेल. नवीन व्यावसायिक करार होतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. सासुरवाडीहून अनपेक्षित लाभ होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कामांना गती मिळेल. गुप्त वार्ता कानी येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रकृतीची काळजी घेऊनच कामाची आखणी करावी. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालवताना वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवावे.
शुभ दिनांक – 18, 19.

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातील वक्री गुरु वरून भाग्येश चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. लेखकांच्या हातून धार्मिक विषयावर लिखाण होईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाडली करण्यात यश लाभेल. कामाचा व्याप वाढला, तरी प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. रोगस्थानातील राहू व हर्षल वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. व्यवसाय उद्योगात कोणावर अवलंबून राहू नये, प्रत्येक कामात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे. सप्तमातील मंगळामुळे योग्य निर्णय घेतले जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाह इच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक -20, 21.

धनु – राशी स्वामी गुरूवरून सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे, तर पंचमातून राहू, हर्षल आणि श्रेष्ठ स्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. आपल्याला अतिशय अनुकूल असे या आठवड्यातील ग्रहण आहे. हे ग्रहमान आपला वैयक्तिक उत्कर्ष घडवणारे ठरेल. या आठवड्यात सतत घरगुती उत्सव समारंभात आपण सहभागी व्हाल. धार्मिक शुभकार्य घडतील. नवीन वस्तू , वास्तूचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. हीतशत्रूंच्या कारवायांना बळी पडू नका. प्रशासन नोकरीत भरती, बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा झाल्यामुळे उत्साहाने काम कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
शुभ दिनांक – 17, 18
====
हे देखील वाचा – तिरंगा फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावे?
====

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून व नंतर पराक्रम भ्रमण होत आहे. उधारी उसनवारी वसूल होईल. तृतीयस्थानातील गुरु वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे धार्मिक शुभ सोमवार कार्यात सहभागी व्हाल. लेखकांच्या हातून अध्यात्मिक विषयावर लिखाण होईल. सुखस्थानातील राहू, हर्षल वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे आपण हाती घेतलेल्या उपक्रमांना विरोध होण्याची शक्यता आहे तेव्हा वादंग टाळावेत. घरातील वातावरण शांत कसे राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे. उत्तरार्धात पंचमस्त मंगळावरून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे संततीच्या प्रगतीची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून यशप्राप्ती होईल. धाडसी निर्णय घेतले जातील महत्त्वाचे व्यवहार करताना सतर्क रहावे. या आठवड्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार टाळावेत. वादग्रस्त विधाने टाळावीत. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
शुभ दिनांक – 15, 16

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. धनस्थानातील गुरु आपली आर्थिक आवक वाढवणारा राहील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. बड्या व्यक्तींचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला भविष्यात उपयोग करून देणारा ठरेल. पराक्रम स्थानातील राहू, हर्षल वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे अनपेक्षित सहलीचे आयोजन केले जाईल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्यामुळे रेंगाळलेले कामे मार्गी लागण्यास मदत होईल. उत्तरार्धात गृह सुशोभी करण्यासाठी खरेदीली जाईल. कौटुंबिक कलह टाळावेत कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला जरूर सल्ला घ्यावा. नवीन गृह उद्योग सुरू करण्यात यश लाभेल. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक – 20, 21

मीन – राशीतील शनि दृष्ट गुरु वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. गुरुच्या प्रचंड पाठबळामुळे हाती घेतलेली कामे सहजरीत्या पूर्ण होतील. नवीन व्यावसायिक सुसंधी लाभतील. रेंगाळलेली सरकारी कामे योग्य व्यक्तीच्या सहकार्याने मार्गी लागण्यास मदत होईल. धनस्थानात राहू हर्षल असल्यामुळे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. धाडसी निर्णय घेतले जातील. मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जाईल. भावा बहिणींबद्दल काळजी वाटेल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कम्प्युटर तसेच टेक्निकल व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा शुभ फले देणारा राहील. (August Weekly Horoscope)
शुभ दिनांक 14 15
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.