सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाची वर्षातली सर्वात मोठी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने सर्व वारकरी त्यांच्या विठ्ठल भेटण्यासाठी शेकडो मैलांचा पायी प्रवास करत आहे. सावळ्या विठ्ठलाचे साजिरे रूप डोळ्यात साठवण्यासाठी सर्वच अधीर असतात. (Marathi NEws)
कटेवर हात, भाळी चंदनाचा टिळा, पितांबर, माथ्यावर मुकुट, कानात मासोळ्या, उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी, कमरेला वस्त्र असे सुंदर रुपडे आपल्या विठू रायाचे पाहून सर्वच मोहून जातात. (Marathi Latest News)
मात्र जर तुम्ही कधी विचार केला आहे की, विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत? खरंतर ते मासे नाही तर माश्यांच्या आकाराच्या मासोळ्या आहेत. पण या मासोळ्या विठ्ठल का परिधान करतात? काय आहे याच्या मागचे कारण? या माशांना विठ्ठलाच्या कानी स्थान कसे मिळाले? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. विठ्ठलाच्या कानी मासे नसून ती माशांच्या आकाराची कवचकुंडले आहेत. एका विठ्ठलभक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते. चला आज याबद्दलच जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
विठ्ठलाच्या कानात मकर असण्यामागे देखील एक आख्यायिका आहे. ही कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला आणि त्यांना भेट द्यायला त्यांच्याकडे गेला होता. मात्र इतर लोकं त्याला मंदिराच्या आतमध्ये जाऊ देत नव्हते, कारण एकच की तो एक मच्छिमार आहे आणि तो विठुरायाला जी भेट देणार होता ते त्याने स्वतः पकडलेले दोन मासे होते. त्या कोळ्याची ही भेट पाहून अनेकांनी त्याला नावे ठेवली. पांडुरंग हा देव आहे आणि असे असूनही तू त्यांना मासे देतोय भेट म्हणून? अशी भेट दिली तर तू नक्कीच पापाचा भागीदार होशील. (Social Updates)
===========
हे ही वाचा : Chaturmas : चातुर्मास म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम?
===========
हे सर्व संभाषण विठ्ठल ऐकत होते. यावर विठ्ठल म्हणतात , “तो काय देतोय ते तुम्ही का पाहताय. त्याच्याकडे काही नसूनही तो मला काहीतरी देतोय या गोष्टीकडे पहा ना आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकारतो, मग ते काहीही असू दे. कारण मी ही सृष्टी मी चालवतो त्यामुळे यात तुम्ही एकटे नसून इतर अनेक विविध प्रकारचे प्राणी देखील आहेत. मी तुम्हा सर्वांवर सामान प्रेम करतो आणि कोणतंही भेदभाव करत नाही. असे म्हणत विठ्ठल कोळ्याने दिलेले ते दोन मासे कानात कुंडलांप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण परमेश्वरासमोर एकसामान आहेत असा लाखमोलाचा संदेश देतात. (Top Stories)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics