Home » जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल भाजपावर भारी पडणार का?

जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल भाजपावर भारी पडणार का?

अरविंद केजरीवाल जामीनावर सुटल्याने निवडणुकांवर काय होणार परिणाम?

by Team Gajawaja
0 comment
arvind-kejriwal-bail
Share

निवडणूका तोंडावर असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे साऱ्या देशभरात चर्चा सुरू झाली.

कित्येकांनी या घोटाळ्यावर टीका केली तर कित्येकांनी सत्तेत असलेल्या भाजपाच्या रणनितीवर ताशेरे ओढले. काहींनी या अटकेनंतर तर हा देश हुकुमशाहीच्या वाटेवर चालला असल्याची टिप्पणीही केली.

तिहार जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांना नुकताच याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला, पण त्यांना २ जूनपर्यंत पुन्हा स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. (Arvind Kejriwal Bail)

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळायला इतका वेळ का लागला? यामागे नेमकं काय राजकारण होतं? केजरीवाल यांना नेमक्या कोणत्या अटींवर हा जामीन मंजूर करून देण्यात आला आहे? याचा येत्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न आपण या लेखातून  करणार आहोत. (Arvind Kejriwal Bail)

arvind-kejriwal

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांचा जामीन १० मे रोजीच मंजूर केला असून त्यांना १ जून पर्यंत बाहेर राहायची परवानगी देण्यात आली आहे. हा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर काही बंधनं किंवा अटी घातल्या आहेत.

यापैकी पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांनी २ जूनला स्वतःला पुन्हा सरेंडर करावे लागणार आहे आणि यासाठी त्यांनी तब्बल ५० हजार रुपये जामीनाची रक्कम भरणे अनिवार्य आहे.

दुसरी अट म्हणजे दिल्लीच्या उपराज्यपाल यांच्या परवानगीशिवाय केजरीवाल हे कोणत्याही महत्त्वाच्या आणि अधिकारीक फाइल्सवर सह्या करू शकणार नाही आहेत. याबरोबरच तिसरी अट म्हणजे केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना सध्या ज्या प्रकरणात अटक झाली आहे त्याविषयी किंवा त्याच्याशी निगडीत कोणत्याही विषयावर भाष्य त्यांना करता येणार नाहीये.

अद्याप या प्रकरणावर कोर्टाकडून निकाल येणे बाकी असल्याने केजरीवाल यांच्यावर ही अट घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या केसशी निगडीत कोणत्याही साक्षीदाराशी केजरीवाल यांना संपर्क करण्याची मनाई आहे. (Arvind Kejriwal Bail)

===

हेदेखील वाचा : तब्बल ११ वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मिळाला न्याय

===

दिल्लीतील कथित मद्य घोटळ्याप्रकरणी २१ मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी ईडीकडून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना याप्रकरणी समन्स धाडले होते. परंतु केजरीवाल यांनी यापैकी कोणत्याही समन्सल उत्तर दिले नाही किंवा ते हजरही राहिले नाहीत. यामुळेच त्यांना अटक केली गेली.

अरविंद केजरीवाल हेच या संपूर्ण घोटाळ्याचे म्होरके असून मद्य व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणांनी केला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्याने भाजपा विरोधातील विरोधकांचा प्रचार आणखी धारदार आणि रंगतदार होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इंडिया‘ आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी हे प्रमुख ६ नेते सध्या भाजपा आणि मोदींच्या विरोधात प्रचारासाठी कंबर कसून उभे आहेत आणि आता यातच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांचीही भर पडली आहे.

India-alliance

दिल्लीमध्ये २५ मे रोजी मतदान होणार आहे आणि या १३ दिवसांत भाजपा विरोधात अरविंद केजरीवाल यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळायची शक्यता वर्तवली जात आहे. केजरीवाल यांना मिळालेला जामीन हा ‘इंडिया‘ आघाडीसाठी वरदानच ठरणार आहे असं मत कित्येक राजकीय विश्लेषक करताना दिसत आहे. (Arvind Kejriwal Bail)

केजरीवाल यांच्या अटकेमुळे ‘आप‘च्या प्रचाराला मोठा ब्रेक लागला. आता केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) बाहेर आल्याने पुन्हा प्रचार जोरदार सुरू होऊन त्यांच्या ताकदिवर अवलंबून असलेल्या कॉंग्रेसचेही मनोबल वाढले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

निवडणुकांच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बऱ्याच लोकांच्या मनात होती. लोकांच्या याच सहानुभूतिचा वापर करून ‘आप’ने त्यांच्या प्रचारासाठी फायदा करून घेतला. आता लोकसभेची निवडणूक उत्तरेकडे सरकू लागली असून उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या प्रमुख राज्यांमध्ये केजरीवालांचे दौरे होण्याची शक्यता आहे.

केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) थेट प्रचारात सहभागी होणार असल्याने प्रामुख्याने दिल्ली व पंजाबमध्येआप’ला मोठा फायदा होऊ शकतो.

एकूणच केजरीवाल यांची निवडणुकीच्या तोंडावर झालेली अटक आणि आता दिल्लीतील निवडणूका जवळ आल्यावर त्यांना मिळालेला जामीन ही रणनिती भाजपासाठी फायदेशीर ठरणार की यातून केजरीवाल यांचा ‘आम आदमी पक्ष’ आणि ‘इंडिया आघाडी’ आणखी मजबूत होणार हे येत्या काही दिवसांत समोर येईल! (Arvind Kejriwal Bail)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.