Home » आयआयटी कानपूरने तयार केले कृत्रिम हृदय, लवकरच जनावरांवर परिक्षण करणार

आयआयटी कानपूरने तयार केले कृत्रिम हृदय, लवकरच जनावरांवर परिक्षण करणार

by Team Gajawaja
0 comment
Artificial Heart
Share

धावपळीच्या आयुष्यात आणि कोरोना सारख्या संक्रमण आजारानंतर हृदय रोगांमध्ये फार वाढ झाली आहे. अचानक हृदय विकराचा झटका येण्याने मृत्यू होत आहेत. अशातच हृदय रोगांच्या रुग्णांसाठी आयआयटी कानपुरच्या वैज्ञानिकांनी आणि हृदय रोग विशेतज्ञांनी मिळून कृत्रिम हृदय तयार केले आहे. जेणेकरुन हृदयाचे प्रत्योरोपण केले जाऊ शकते. केजीएमयूच्या ११८ व्या स्थापना दिनानिमित्तर आयआयटी कानपुरचे निर्देशक प्रो. अभय करंदीकर यांनी असे सांगितले की, २०२३ मध्ये ट्रायल झाल्यानंतर येणाऱ्या दोन वर्षांमध्ये कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण व्यक्तींमध्ये केले जाणार आहे. (Artificial Heart)

केजीएमयूच्य सेल्बी हॉलमध्ये नुकत्याच एक कार्यक्रम पार पडला. याच वेळी केजीएमयूच्या ५२ व्या मेधावी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडलसह काही पुरस्कारांनी गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रो. अभय यांच्यासह विशिष्ट अतिथी म्हणून केजीएमयूचे मानसिक चिकित्सक आरोग्य विभागाचे माजी विभागाध्यक्ष डॉ. प्रभाव सिथोले यांच्या अन्य मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थितीत होते.

आयआयटी कानपुर आणि हृदय रोग तज्ञांच्या टीमचे काम
-प्रो. अभय करंदीकर यांनी असे म्हटले की संस्थेच्या १० वैज्ञाानिक आणि चिकित्सकांच्या टीमने कृत्रिम हृदय तयार केले आहे. येणाऱ्या फेब्रुवारी पूर्वी याच्या पहिल्या फेजचे ट्रायल सुरु होईल.
-कृत्रिम हृदय तयार करण्यामागील उद्देश असा की, शरिरातील रक्तपुरवठा योग्य रुपात संपूर्ण अवयवांना पोहचवले जाईल. जर याला यश मिळाले तर त्याचे प्रत्यारोपण ही केले जाईल.
-सध्या आता यावर काम सुरु आहे. प्रो अभय यांनी असे म्हटले की, आम्ही याला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
-भारतात चिकित्सक आणि वैज्ञानिकांनी मिळून उपचाराचे काही नवे तंत्रज्ञान तयार केले आहे आणि संक्रमितांचा जीव वाचवला आहे.
-परदेशातील १० ते १२ लाख रुपयांत येणारे वेंटिलेटर केवळ ९० दिवसात तयार करण्यात आले असून त्यासाठी केवळ दीड लाखांचा खर्च आला आहे.
-आता सुद्धा उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांवर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. देशात केवळ २० टक्के उपकरणे तयार होतात. ८० टक्के इंप्लांट परदेशातून आणले जातात. (Artificial Heart)
-यामध्ये सर्वाधिक उपकरणे ही हृदय रोगासंबंधित रुग्णांसाठी असतात.

हे देखील वाचा- किडनी स्टोन झाल्यास कधीच करु नका ‘या’ गोष्टींचे सेवन

देशात चिकित्सक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता
-प्रो. अभय यांनी देशात चिकित्सक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी असे म्हटले की, एक हजार व्यक्तींसाठी केवळ ०.८ टक्के चिकित्सक आहेत.
-या कमतरतेला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकते. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, टेलीमेडिसिन, ईसंजीवनी आणि ई-फार्मेसी सारख्या तंत्रज्ञानांना वाढवून ५जी शी जोडले पाहिजे. जेणेकरुन अधिकाधिक रुग्णांवर योग्य उपचार केले जातील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.