Home » अरबाजसोबत लग्न केलेली Shura Khan नक्की आहे तरी कोण?

अरबाजसोबत लग्न केलेली Shura Khan नक्की आहे तरी कोण?

मलाइका आणि जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप केल्यानंतर वयाच्या 56व्या वर्षी अरबाज खानने नुकतेच लग्न केले. सध्या सोशल मीडियामध्ये अरबाजच्या लग्नाची चर्चा केली जात आहे.

by Team Gajawaja
0 comment
Arbaaz Khan Marriage
Share

Arbaaz Khan Marriage : अरबाज खानने अखेर रविवारी (24 डिसेंबर, 2023) संध्याकाळी मुंबईत आपली बहिण अर्पिता खान शर्मा हिच्या घरी खासगी निकाह समारोहाचे आयोजन केले होते. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खान (Shura Khan) हिच्यासोबत लग्न केले आहे. रविवारी दुपारपासूनच अरबाजच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली होती. अभिनेता अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान, भाऊ सलमान, आई-वडील सलीम-सलमा, रवीना टंडनसह काही मंडळींनी उपस्थिती लावली होती.

अरबाज खान याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. अरबाजच्या चाहत्यांकडून त्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. पण अरबाजने लग्न केलेल्या शूरा खान बद्दल तुम्हाला माहितेय का?

कोण आहे शूरा खान?
शूरा खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध आर्टिस्ट आहे. तिचे इंस्टाग्रामवर 13.2K फॉलोअर्स आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी हिची मेकअप आर्टिस्ट आहे. दोघे एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

अरबाज आणि शूराची भेट ही ‘पटना शुल्का’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. हा सिनेमा पुढील वर्षात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, शूरा खान ही 41 वर्षाची आहे. तिचा जन्म लंडन येथे झाला आहे. शूराने आपले शिक्षण जानकीदेवी पब्लिक स्कूल आणि दुबई अमेरिकन साइंटिफिकल स्कूल येथून पूर्ण केले आहे. यानंतर शूरा आपल्या आईकडून शास्रीय संगीत शिकली. वयाच्या 16 व्या वर्षापासून तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. (Arbaaz Khan Marriage)

शूरा खान हिने अर्जुन कपूरचा सिनेमा ‘औरंगजेब’ मधून पदार्पण केले होते. हा सिनेमा वर्ष 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर शूरा ‘देसी कट्टे’ सिनेमात दिसून आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

मलाइका अरोरा सोबत पहिले लग्न
अरबाज खान याचे याआधी मलाइका अरोरा सोबत लग्न झाले होते. त्या दोघांनी 2016 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तर वर्ष 2017 मध्ये त्या दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला होता. या दोघांना 21 वर्षांचा अरहान नावाचा मुलगा आहे. अरबाज खान याने जियोर्जिया अँड्रियानी हिला देखील डेट केले होते. पण गेल्याच वर्षात या दोघांचे ब्रेकअप झाले.


आणखी वाचा:
जॉन अब्राहमची ‘ही’ चुक ठरली बिपाशासोबतच्या ब्रेकअपचे कारण
सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा
‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.