Home » Anneliese Michel : तिच्या अंगात सहा भूत होती आणि मग जे झालं…

Anneliese Michel : तिच्या अंगात सहा भूत होती आणि मग जे झालं…

by Team Gajawaja
0 comment
Anneliese Michel
Share

“माझ्या छातीवर कोणी तरी बसलंय… तुम्ही काहीच करू शकत नाही, ते मला नरकात घेऊन जायला आलेत, मला वेगवेगळे चेहरे दिसत राहतात, माझ्या अंगात हिटलरची आत्मा आहे… हे सगळं ती एकटी बडबडायची, सुरुवातीला अशी दिसणारी एनालीज़ माइकल काही काळात अशी दिसू लागली होती, तिच्या अंगातून आत्मा काढण्यासाठी ६७ वेळा प्रयत्न करण्यात आले. तिच्यासोबत असं काय झालं होतं की ती अशी वागत होती, एनालीज़ माइकलच्या या रहस्यमयी केसबद्दल जाणून घेऊ. (Anneliese Michel)

एनालीज़ माइकल जर्मनीतल्या एका छोट्या गावात राहणारी १६ वर्षांची सामान्य मूलगी, तिचं आयुष्य अगदी साधं होतं. तिचे आई-वडील खूप धार्मिक होते. दर रविवारी चर्च, बायबलचं वाचन, प्रार्थना, हे तिच्या आयुष्याचा भाग होतं. एनालीझ इतकी धार्मिक होती की तिने बायबलच्या मूळ सूत्रांसाठी लॅटिन भाषा शिकली. स्कूल, कॉलेज, सगळं सुरळीत चाललं होतं. पण एका रात्री तिच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे तिचं आयुष्यचं बद्दललं… (Top Stories)

ती रात्री झोपली असताना तिला अचानक जाणवायला लागलं की कोणीतरी तिच्या छातीवर बसलंय. ती इतकी घाबरली की, तिचा श्वास अडकला. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता, तरीही ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती. तिने कसंबसं आई-वडिलांना आवाज दिला, त्यांना सगळं सांगितलं पण त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. म्हणाले, “कदाचित स्वप्न पडलं असेल.” पण बरोबर एका वर्षानंतर, पुन्हा तेच झालं. यावेळी तिच्या आई वडिलांनी हे स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं आणि ते तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या, पण काहीच सापडलं नाही. ती अगदी नॉर्मल होती. डॉक्टरांनी सांगितलं की ती कदाचित खूप घाबरल्यामुळे असं घडलं असेल चिंता करायची काही गोष्ट नाही. (Anneliese Michel)

Anneliese Michel

पण हळू हळू या अशा घटना वाढू लागल्या, यामुळे डॉक्टरांनी औषधं सुरू केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट आता ती आणखीच विचित्र वागू लागली ती सांगायची की, झोपेत तिला तिच्या बेड खालून वेगवेगळे आवाज येतात.

ती आईला सांगायची, “कोणीतरी मला सांगतंय की मी नरकात जाणार आहे.” एकदा रात्रीच्यावेळी तिच्या खोलीतून भयंकर आवाज येत होते. तेव्हा तिची आई तिच्या रूममध्ये गेली तेव्हा ती एका मूर्तीकडे टक लावून बघत बसली होती. जेव्हा तिने मान फिरवली तेव्हा तिचे डोळे पूर्ण काळे होते.(Top Stories)

ती डॉक्टरांना सांगायची की तिला शैतानी चेहरे दिसतात… तिला वाटायचं की तिच्या आत कोणीतरी आहे. डॉक्टरांनी तिला अजून स्ट्रॉंग औषध द्यायला सुरुवात केली पण काहीच फरक पडला नाही. (Anneliese Michel)

१९७५ पर्यंत तिने खाणं-पिणं पूर्णपणे बंद केलं. ती रात्रभर जागी राहायची आणि एखादी माशी किंवा स्पायडर दिसला की ते पकडून ती तोंडात टाकायची. सुरुवातीला धार्मिक असणारी ती आता तिला येशू ख्रिस्ताचं चित्र, क्रॉस किंवा ख्रिश्चन धर्माशी जोडलेली कोणतीही गोष्ट दिसली की, ती लगेच तोडून टाकायची. ती म्हणायची, “चर्चची जमीन माझे पाय जाळते.” त्यामुळे तिने चर्चला जाणंही बंद केलं. तिचं वजन अर्ध्यावर आलं होतं आणि ती दिवसेंदिवस कमजोर होत होती. शेवटी तिच्या आई-वडिलांनी ठरवलं की, तिच्यावर एक्सॉर्सिझम करावं ज्यामुळे तिच्यावर असलेली भूतबाधा निघून जाईल. (Top Stories)

पण इथून तिच्या आयुष्यातला खरा नर्क सुरू झाला. एनालीझवर तब्बल ६७ वेळा एक्सॉर्सिझम केलं गेलं. हे होतं असताना ती विचित्र आवाजात गुरगुरत लॅटिनमध्ये बोलायची. त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या. त्या रेकॉर्डिंगमध्ये ती स्वतःला हिटलरची आत्मा, रोमन सम्राट नीरोची आत्मा आणि शैतानाची आत्मा सांगायची. ती म्हणायची, “ह्या आत्मा मला नरकात घेऊन जाणार आहेत.” आत्मांचं खरं-खोटं माहीत नाही, पण या सगळ्याने एनालीझचं आयुष्य बरबाद होत होतं. तिच्यावर एक्सॉर्सिझम सुरू झाल्यानंतर तिने औषधं घेणं पूर्णपणे सोडलं, ज्यामुळे तिची तब्येत आणखी खराब झाली. (Anneliese Michel)

जून १९७६ पर्यंत ती इतकी कमजोर झाली की, तिचा चेहरा खोल गेला, तिचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सांगाडा दिसायचा. तरीही तिने डॉक्टरकडे जाण्यास नकार दिला. ३० जून १९७६ ला तिच्यावर शेवटचं एक्सॉर्सिझम झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आई-वडिलांनी तिच्या खोलीत पाहिलं, तेव्हा ती मृत पडली होती. तिचं वजन फक्त ३० किलो होतं. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण उपासमार आणि कमजोरी सांगितलं. पण ही गोष्ट इथे संपली नाही.

==============

हे देखील वाचा : Nepal : नेपाळमध्ये या छोट्या जिवंत देवीची पूजा का होतेय ?

==============

एनालीझच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांवर आणि पाद्रींवर हत्येचा खटला दाखल केला. केस कोर्टात गेली. बचाव पक्षाने सांगितलं की, सगळं एनालीझच्या इच्छेने झालं. एक्सॉर्सिझमवर कायद्याने बंदी नव्हती. पण सरकारी वकिलाने मेडिकल रीपोर्ट सादर केले ज्यात सांगितलं होतं की, जर एक आठवड्या आधी तरी तिला वैद्यकीय मदत मिळाली असती, तर ती वाचली असती. शेवटी कोर्टाने सगळ्यांना दोषी ठरवलं आणि सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, पण नंतर ती प्रोबेशनमध्ये बदलली गेली. (Anneliese Michel)

पण या केसमधला ड्रामा इथेच थांबला नाही. काही महिन्यांनी एनालीझच्या आईने तिची कबर उघडण्याची मागणी केली. का? कारण एका ननने तिला स्वप्नात सांगितलं की, एनालीझचा मृतदेह अजूनही सहीसलामत आहे आणि हे शैतानी सावल्यांचं काम आहे. शेवटी कबर उघडली गेली, पण मृतदेह सामान्य मृतदेहाप्रमाणे सडलेलाच होता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.