रशियन गुप्तचर संघटनांचा दबदबा जगभर आहे. रशियाची मुख्य गुप्तचर संस्था फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस आहे. सोबत फॉरेन इंटेलिजेंस सर्व्हिस आणि मेन डायरेक्टरेट ऑफ द जनरल स्टाफ याद्वारे सुद्धा रशियाच्या अंतर्गत, परदेशी आणि लष्करी गुप्तचर माहिती मिळवली जाते. रशियाच्या या सर्व गुप्तचर संघटनांचा पाया म्हणजे केबीजी ही संघटना होती. आता याच केबीजीच्या ऐवजी अन्य तीन संघटना स्थापन करण्यात आल्या असून त्यातून रशिया जगभरातील आपल्या शत्रूंवर लक्ष ठेऊन असतो. आता रशियाच्या याच गुप्तचर संघटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत, त्याला कारण ठरली आहे, ती अँना चॅपमन ही महिला. अँना चॅपमन हे नाव ऐकल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण अँना चॅपमन ही रशियाची सर्वात घातक गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अँना सर्वात विश्वासू गुप्तहेर मानली जाते. काही वर्षापूर्वी अँनाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. अमेरिकेनं अँनाची चौकशी करुन तिला हद्दपार केले, त्यानंतर रशियामध्ये परतलेली अँना जणू गायब झाल्यासारखी झाली. (Anna Chapman)

मात्र या अँना चॅपमनची नव्याने स्थापन झालेल्या रशियन गुप्तचर संग्रहालयाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या बातमीनं जगभरातील गुप्तचर संघटनांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण अँना चॅपमनच्या नावावर अनेक घातक कामगिरींची नोंद आहे. पुतिन यांनी तिची एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे, म्हणजे, तिच्यावर नक्कीच मोठी कामगिरी सोपवली असणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे. ब्लॅक विडो या नावानं अँना चॅपमन ही गुप्तचर जगात ओळखली जाते. तिची कामगिरी अशी आहे की, एक गुप्तहेर म्हणून आपली कारकिर्द सुरु करणारे व्लादिमीर पुतिनही तिचे फॅन आहेत. युक्रेनशी रशियाचे युद्ध आणि युरोपीय देशांसोबतच्या तणावादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जगभरातील गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कारण रशियातील सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर असलेल्या अँना चॅपमनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन गुप्तहेर संग्रहालयाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. (International News)
हा विभाग रशियाच्या प्रमुख गुप्तहेर संस्थेशी संलग्न आहे, अँना चॅपमन चा धाक एवढा आहे की, तिचे नाव या पदासाठी निश्चित झाल्यावर रशियामध्ये असलेल्या अन्य देशातील गुप्तहेरांना काढता पाय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. अँना चॅपमनच्या नियुक्तीने पश्चिमेकडील देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. लाल रंगाचे केस आणि अलौकीक सौंदर्यवान असलेली अँना २०१० मध्ये प्रकाश झोतात आली. अँना चॅपमनचे खरे नाव अँना रोमानोवा आहे. २०१० मध्ये अमेरिकेत विशेष कामगिरीवर असलेल्या अँना चॅपमनला अटक करण्यात आली. तेव्हा ती रशियन स्लीपर सेलचा भाग होती. नंतर अमेरिकेने तिची चौकशी करुन तिला रशियाला पाठवले. तेव्हापासून अँना चॅपमन रशियामध्येच अत्यंत गुप्त जागी रहात होती. आता तिची नियुक्ती झाल्यानंतर जगाच्या नजरेतून गायब झालेली अँना पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. (Anna Chapman)

माजी ब्रिटिश नागरिक असलेली अँना चॅपमन ही ४० वर्षाची आहे. चॅपमनने प्रथम लंडनमधील प्रभावशाली व्यापारी, राजकारणी वर्गात स्थान मिळवले. यासाठी तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने तिला खूप मदत केली. लंडनमधील एका रशियन एजंटने, तिच्या नेटवर्किंग क्षमतेने प्रभावित होऊन तिला भरती केले. तिने अॅलेक्स चॅपमनशी लग्न केले, परंतु हे नाते टिकले नाही. त्याने तिला पॉवर ड्रिलने मारण्याचा प्रयत्नही केला. याच सर्व जीवनाचा प्रवास अॅना चॅपमनने २०२४ मध्ये “बोंडियाना: टू रशिया विथ लव्ह” नावाच्या पुस्तकातून जगासमोर ठेवला आहे. या पुस्तकात चॅपमनने रशियन गुप्तचर एजंट म्हणून तिच्या अनुभवांचे वर्णन केलेच आहे, शिवाय पाश्चात्य देशांशी असलेल्या रशियाच्या राजनैतिक संबंधांबद्दल माहिती सांगितली आहे. (International News)
=======
हे देखील वाचा :
Iran : इराणमध्ये सर्वसामान्य महिलांना हिजाबसक्ती !
=======
या पुस्तकानंतर अँना चॅपमनला महिला जेम्स बाँड म्हणूनही प्रसिद्धी मिळाली. आता हिच महिला जेम्स बॉंड २०१० नंतर जगासमोर आली आहे. गेली १५ वर्ष अँना चॅपमन कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. ती एवढ्या वर्ष कुठे होती, याबाबत गुढ आहे. मात्र तिच्या नावानं सोशल मिडियावर अकाऊंट सक्रिय होतं. आता अँना पुन्हा एकदा रशियाच्या गुप्तचर विभागात सक्रीय झाली आहे. ज्या विभागावर तिला प्रमुख करण्यात आले आहे, त्याचे सर्वोच्च प्रमुख सर्गेई नारिश्किन आहेत. सर्गेई हे पुतिन यांचे सर्वात जवळचे सहकारी आहेत. त्यामुळेच पुतिन अँनाच्या रुपानं युरोपमध्ये आपले गुप्तचर जाळे पुन्हा सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. (Anna Chapman)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
