आज २०२६ वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला मोठे महत्त्व आहे. त्यातही अंगारकीला तर अधिकच महत्त्व आहे. चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाच्या उपासनेचा दिवस. प्रत्येक महिन्यात गणेशाच्या दोन चतुर्थीचा योग येतो. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला श्री संकष्टी चतुर्थी असे म्हणतात, तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने श्रीगणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण तसेच शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीचा स्वामी गणेश आहे. बुद्धीदेवता गणेश रिद्धी-सिद्धी प्रदान करतो. (Angarki Chaturthi)
गणपती बाप्पा आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनानेच केली जाते. गणेश पूजेशिवाय सुरु होणारे कोणतेही शुभ काम कायम अपूर्णच समजले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. “अंगारक” म्हणजे मंगळ ग्रहाचा एक नाव. म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना आपण जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि काय करावे काय करू नये हे पळाले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. शिवाय आजच्या दिवशी काही छोटे उपाय केल्याने आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात अशी मान्यता आहे. (Ganpati Bappa)
आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गणपतीला लाल फुले, जास्वंदीची फुले आणि २१ दुर्वा अर्पण कराव्या. सोबतच गणपती मंत्रांचा जप करून, अथर्वशीर्ष पठण करावे. पूजा झाल्यानंतर बाप्पाला २१ मोदक किंवा लाडूंचा किंवा आवडेल तो नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्राला अर्घ्य द्यावे त्याची पूजा करून मगच उपवास सोडावा. आजच्या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. (Marathi News)
अंगारकी चतुर्थीला दिवसभर उपवास करावा, फलाहार घेतलेला चालतो. या दिवशी राग, लोभ, मत्सर, चुकीची कामे आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये. कुटुंबातील सदस्य किंवा बाहेरच्या कोणाचाही अनादर करू नये, अपमान करू नये. गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करू नये. त्याऐवजी तुम्ही शमीची पाने वापरू शकता. शिवाय आजच्या दिवशी स्वयंपाक करताना लसूण आणि कांदा घालणे टाळावे. सोबतच कोणतेही तामसिक अन्न खाणे टाळावे. गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी जाड धान्ये उपवासात वर्ज्य मानली जातात. ताजे आणि सात्विक अन्न खाणेच महत्त्वाचे असते, शिळे अन्न खाऊ नये. आज मद्य आणि मांसाहार या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करावे. (Todays Marathi Headline)

आजच्या अंगारकी चतुर्थीच्या शुभ दिवशी काही छोटे आणि लाभदायक उपाय केल्यास नक्कीच त्याचा सकारातमक फायदा तुम्हाला मिळेल. मग आजच्या दिवशी कोणते उपाय करावे चला जाणून घेऊया.
– विवाहाच्या काही समस्या असतील तर अक्षता बनवून त्यात थोडी हळद घालावी व त्या अक्षता तुम्ही आपली मनोकामना बोलून बाप्पाच्या डोक्यावर वहाव्यात. या उपायाने विवाह कामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.
– घरातील विघ्न, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही दररोज श्री गणेशाचे विधीवत पूजा करत ‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा’ या मंत्राचा ११ वेळा जप करा. (Social Updates)
– तुमच्यावर असलेले आर्थिक संकट निवारणासाठी पाच दुर्वा घेऊन दोऱ्याला ११ गाठी घालून छोटा हार तयार करा आणि हा हार बाप्पाला अर्पण करावा. यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट निवळेल. (Top Marathi News)
– चतुर्थीला गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवा आणि योग्य विधींनी त्यांची पूजा करावी. मान्यता आहे की, या उपायामुळे गणेशाचे आशीर्वाद मिळतात आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. (Latest Marathi Headline)
– चतुर्थीला पूजा करताना, लाल कापड पसरा आणि त्यावर श्रीयंत्र ठेवा. नंतर, मध्यभागी एक सुपारी ठेवा. पूजा झाल्यानंतर, श्रीयंत्र आणि सुपारी तुमच्या तिजोरीत ठेवा. असं केल्यानं तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते. (Top Trending News)
– अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारची दुःखं आणि संकटं दूर होतात. यासोबतच मंगळ दोषाचा प्रभावही संपतो.
========
Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
========
– मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थी तिथीला मसूर डाळ, मूग, मध, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या इत्यादी गोष्टींचे दान करा. हा उपाय केल्यानेही श्रीगणेश प्रसन्न होतात. बाप्पाला सिंदूर अर्पण करावा. श्रीगणेशाला सिंदूर अर्पण केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते. (Top Stories)
– घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा. जर तूप गायीचे असेल तर ते अधिक चांगले आहे. या नैवेद्याचं गूळ गायीला खाऊ घाला. हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा. काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
