Home » लंडनमध्ये तेव्हा इंदिरा आणि आता राहुल…अमित शाह यांनी जुना किस्सा सांगत साधला निशाणा

लंडनमध्ये तेव्हा इंदिरा आणि आता राहुल…अमित शाह यांनी जुना किस्सा सांगत साधला निशाणा

by Team Gajawaja
0 comment
Amit Shah
Share

लंडनमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वाद सुरु आहे. संसदेत सुद्धा या बद्दल गदारोळ सुरु आहे. भाजपकडून त्यांनी यावर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटेनमध्ये जे काही म्हटले ते ऐवढे खरंच वादग्रस्त होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना जेव्हा या संदर्भातील प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असे म्हटले की, जो पर्यंत माझ्या पक्षाच्या प्रतिक्रियेचा प्रश्न आहे तर राहुल गांधी यांच्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी आहे. अमित शाह यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत इंदिरा गांधी संदर्भातील एक जुना किस्सा सु्द्धा सांगितला.

एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी इंदिरा गांधींनी जेव्हा इमरेंजी लागू केली त्यानंतर त्यांचे इंग्लंडला जाणे झाले. त्यावेळी शाह हे कमीशन झाले होते आणि इंदिरा गांधी यांना काही दिवसांसाठी तुरुगांत नेण्याचा ही प्रयत्न झाला. तेथे एका पत्रकाराने प्रश्न विचारला की काय चालू आहे, तुमचा देश कसा सुरु आहे? त्यांनी असे म्हटले की, काही गोष्टी आहेत परंतु हे सांगणार नाही की माझा देश उत्तम सुरु आहे. विदेशात येऊन देशआच्या विरोधात काहीच बोलणार नाही.

अमित शाह (Amit Shah) यांनी दुसरा किस्सा सुनावला. त्यांनी असे म्हटले की, अटल जी जेव्हा विरोधात होते आणि युएनमध्ये कश्मीरवर चर्चा होणार होती. त्यावेळी भारतीय दलाचे नेतृत्व एखाद्या सरकारच्या मंत्र्याने नव्हे तर विरोधी नेत्याने केले. अमित शाह यांनी असे म्हटले की, जो गोष्ट परदेशात बोलली जात आहे त्याचे उत्तर कधी ना कधी तरी द्यावेच लागेल.

संसदेत जेव्हा राहुल गांधी आले तेव्हा त्यांना सिंह आला सिंह आला असे काँग्रेसकडून बोलले जात होते. कधी असे ही म्हटले की, राहुल गांधी यांच्या तपस्वी व्यक्तीमत्वामुळे मोदी सरकार घाबरले आहे. यावर अमित शाह यांनी असे म्हटले की, जनता सर्वकाही पाहत आहे. नॉर्थ ईस्टच्या निवडणूकीत काय झआले तिन्ही त्यांचीच राज्य होती तपस्येची काय स्थिती आहे.

हे देखील वाचा- राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यता रद्द होणार? अॅक्शन मोडमध्ये आहे BJP

गौतम अदानी यांच्यावर जेपीसीची मागणी करत अमित शाह यांनी असे म्हटले की, देशाच्या सुप्रीम कोर्टाने निवृत्त दोन न्यायाधीशांची कमेटी बनवली. या प्रकरणी आढावा घेण्यात आला आहे. जे काही तथ्य आहे ते समोर ठेवले पाहिजे. दिशाभूल करण्याची काहीही गरज नाही. चुक असेल तर सोडू नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.