जगावर तिस-या महायुद्धाचे ढग जमा आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. मात्र या युद्धाचे स्वरुप कसे असेल, हे कोणीही सांगू शकत नाही. काही वर्षापूर्वी युद्ध ही आमने-सामने व्हायची. दोन्ही देशातील सैनिक हाती तलवारी घेऊन आपापसात भिडायचे. मग बंदुका आल्या, रणगाडे आले, विमानं आली, बॉम्ब आले आणि तंत्रज्ञान आले. या सर्वात युद्धाची पद्धतही बदलली आहे. काल-परवा रशियासारख्या देशातील अरबो रुपयांची विमानं युक्रेननं काही हजारात मिळणा-या ड्रोननं नष्ट केली आहेत. एआय तंत्रज्ञानानं तर एका जागेवर बसून हजारो मिटर दूर असणा-या शत्रूवर अचूक वार करता येऊ लागले आहेत. (Fusarium graminearum)
या सर्वात आणखी एक शस्त्र आलं आहे, जे संपूर्ण मानवजातीलाच घातक ठरु शकणार आहे. हे आहे, जैविक शस्त्र. या जैविक शस्त्राच्या माध्यमातून एकाच वेळी लाखो, करोडो नागरिक मारले जाऊ शकतात, किंवा त्यांना एखाद्या जीवघेण्या आजाराच्या खाईत लोटले जाऊ शकते. अशी अनेक प्राणघातक जैविक शस्त्र सध्या चीनमध्ये तयार होत असल्याची माहिती आहे. काही वर्षापूर्वी जगावर कोरोना महामारीचे जे संकट आले होते, तेही चीनचे जैविक शस्त्रच असल्याची माहिती आहे. चीनच्या अशाच घातक जैविक शस्त्राला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. हे शस्त्र म्हणजे, लॅबमध्ये तयार केलेली अत्यंत घातक अशी बुरशी आहे. ही बुरशी ज्या शेतजमिनीवर पसरते, तेथील जमीन शेतीसाठी नापिक होते. या बुरशीचा फैलाव इतका झपाट्यानं होतो, की त्यावर आळाही घातला जाऊ शकत नाही. (International News)
एकूण सर्वच पिकांना नष्ट करणारी ही बुरशी चीनकडून एखाद्या जैविक शस्त्रासारखी वापरली जात होती. नुकतीच अमेरिकेत ही बुरशी जप्त कऱण्यात आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची बुरशी जप्त केली असून चीनी नागरिकांनाही अटक केली आहे. या बुरशीची भयानकता जाणल्यावर अमेरिकन शेतक-यांची झोपच उडाली आहे. अमेरिकेत एफबीआयने नुकतीच चिनी नागरिकांना अटक केली. जुन्योंग लिऊला या नागरिकाकडे फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाच्या बुरशीचा मोठा साठा आढळून आला आहे. वरवर ही बातमी साधी वाटली तरी फ्युझेरियम ग्रॅमिनेरम या बुरशीचे अतीघातक परिणाम समजल्यावर हा चिनी नागरिक किती घातक कामगिरीवर होता, याची कल्पना येते. (Fusarium graminearum)
ही फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची बुरशी म्हणजे एक प्रकारचे जैविक शस्त्रच आहे. त्यामुळेच जुन्योंग लिऊ याला कृषी दहशतवाद पसरवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक झाली आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या. मुळात कृषी दहशतवाद हा शब्दच नवीन आहे. मात्र त्यामागची दाहकता स्पष्ट झाल्यावर अनेक अमेरिकन शेतक-यांची झोप उडाली आहे. फ्युझेरियम ग्रॅमिनेरम ही बुरशी पिकांमध्ये रोग निर्माण करते आणि त्यांचा नाश करते. पुढे जिथे जिथे या बुरशीचा फैलाव होतो, तेथील सगळी जमीन नापिक होऊन जाते. जुन्योंग लिऊ याची मैत्रिण जियान ही मिशीगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत काम करते. तिच्या माध्यमातून या बुरशीचा फैलाव करण्याची योजना तो आखत होता. (International News)
फ्युझेरियममुळे झाडांची पाने पिवळी पडतात आणि कोमेजतात. मग पानांचे देठ कमकुवत होतात आणि तुटतात. तशाच प्रकारे झाडाची मुळेही देखील कुजू लागतात. या बुरशीमुळे हेड ब्लाइट नावाचा आजार होऊ शकतो. शिवाय गहू, बार्ली, मका आणि तांदूळ पिकात या रोगाचा फैलाव होतो. हे अन्य पोटात गेल्यावर मनुष्यावरही त्याचे गंभीर परिणाम होतात. बुरशीमुळे दरवर्षी जगभरात अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान होते. ज्या जिआन नावाच्या तरुणीला या प्रकरणी एफबीआयनं अटक केली आहे, त्या तरुणीला फ्युझेरियम बुरशीवर संशोधन करण्यासाठी चीन सरकारनं निधी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. जियान आणि जुन्योंग हे दोघंही चिनी कम्युनिस्ट पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी हा अमेरिकवर झालेला जैविक हल्लाच असल्याचे सांगितले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष हा अमेरिकेतील अन्न पुरवठ्याची साखळी तोडण्याचे काम करत असल्याचा आरोपही काश पटेल यांनी केला आहे. (Fusarium graminearum)
===========
हे देखील वाचा : Elizabeth Gogoi : कोण आहेत, एलिझाबेथ गोगोई !
IPL : विजेता बनल्यानंतर आरसीबीला मिळाली कोट्यवधींची बक्षिसे, अंबानी देखील मालामाल
===========
जुन्योंग लिऊ हा काही महिन्यापूर्वी अमेरिकेत आपल्या युनकिंग जियान या मैत्रिणीला भेटण्यासाठी दाखल झाला होता. त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. त्याच्यावर काही छोटी रोपं होती. आपल्या मैत्रिणीला ही रोपं भेट द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. या रोपांची तपासणी केल्यावर त्यात फ्युझेरियम ग्रॅमिनेरम बुरशी आढळून आली. ही बुरशी फैलावली तर ती गहू, बार्ली, मका आणि तांदळाचे पीक नष्ट करू शकते मन्युष्यासोबत प्राण्यांचेही जीव घेऊ शकते, हे स्पष्ट झाल्यावर एफबीआयनं जुन्योंग आणि त्याच्या मैत्रिणीवर कृषी दहशतवादाचा गुन्हा दाखल केला आहे. आता याआधी ही घातक बुरशी अमेरिकेत आणली होती का, याचा तपास करण्यात येत आहे. (International News)
सई बने