Home » अमेरिका झाली मोदीमय

अमेरिका झाली मोदीमय

by Team Gajawaja
0 comment
America
Share

तमाम भारतीयांसाठी अभिमान वाटावा अशी तयारी सध्या अमेरिकेत (America) चालू आहे. ही तयारी आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची. खुद्द अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये आठवडाभर आधीच भारताच तिरंगा मानानं फडकत आहे. 21 ते 24 जून दरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे (America) अध्यक्ष बायडेन यांच्या कुटुंबियांनी खास भोजन समारंभ ठेवला आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघात मोदी योगादिन साजरा करणार आहे.  याशिवाय अमेरिकेत (America) राहणारे हजारो भारतीय, मोदी यांची एक झलक बघण्यासाठी व्हाईट हाऊस परिसरात गर्दी करीत आहेत. अगदी दोन दिवस आधीपासून ही मंडळी व्हाईट हाऊस परिसरात गर्दी करुन राहिली आहे. मोदी यांच्या या अमेरिका दौ-यावर फक्त भारतीयांचीच नजर नाही. तर तमाम जगाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेनंही भारताचं जागतिक राजकारणात महत्त्व जाणलं आहे. त्यामुळे मोदी यांच्या स्वागतासाठी तमाम अमेरिका सज्ज झाली आहे. या अमेरिका (America) दौ-यानंतर अनेक समिकरणे बदलणार आहेत. मुळात ज्यांना अद्यापही भारताचं महत्त्व समजलं नाही किंवा भारताचे स्थान जे मान्य करीत नाहीत, त्या पाकिस्तान आणि चीन सारख्या देशांना या दौ-यातून चोख उत्तर मिळणार आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका (America) दौरा 21 जूनपासून सुरू होत आहे. या दौ-याकडे केवळ भारत-अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दौ-यातून भारताला काय मिळणार याकडे भारतापेक्षा चीन आणि पाकिस्तान यांचे अधिक लक्ष आहे. कारण अमेरिकेतील पंतप्रधान मोदी यांच्या सगळ्या दौ-याचा कार्यक्रमच मोदी यांची लोकप्रियता अमेरिकेत कशी आणि किती आहे, हे दर्शवणारा आहे. त्यामुळेच या दोन शेजारी राष्ट्रांना भारत, अमेरिकेतून काही शस्त्रास्त्रे मिळवणार का? या चिंतेत आहे.  

पंतप्रधान मोदी 21 जून रोजी, न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व करणार आहेत. 22 जून रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. 22 जूनच्या संध्याकाळी, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. याशिवाय 23 जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे. याशिवाय मोदी अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ आणि व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. या सर्व बैठकांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक धोरणात्मक भागीदारीही होणार आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, अंतराळ मोहीम, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार होणार आहेत. संरक्षण उत्पादनांच्या खरेदीबाबतही दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो.  अमेरिकेकडून (America) भारताला 30 MQ 9B रीपर ड्रोन मिळणार आहेत. यामुळे भारताच्या सैन्याची ताकद दुप्पटीनं वाढणार आहे. याशिवाय मोदी यांच्याबरोबर होणा-या चर्चांमध्ये मोठ्या गुंतवणुकी भारतात येण्याची शक्यता आहे. मायक्रोन टेक्नॉलॉजी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करेल अशी शक्यता आहे.  

पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन (America) काँग्रेसला संबोधित करणार आहेत. यावरुन या दोन देशांचे संबंध किती दृढ होत आहेत, हे लक्षात येते.  मोदी पंतप्रधान झाल्यापासून अमेरिकेत दोन राष्ट्राध्यक्ष बदलले आणि तिसर्‍याचा कार्यकाळ चालू आहे, पण जे काही बदलले नाही. पण या सर्वात भारतासोबतचे अमेरिकेचे संबध अधिक दृढ झाले. हे मोदी सरकारच्या परराष्ट्रनितीचे फळ असल्याचे तज्ञांचे मत आहे. भारताची वाढती बाजारपेठ हा सुद्धा प्रमुख मुद्दा आहे. यामुळे अमेरिका भारतापुढे आता पायघड्या घालत आहे. मोदी यांचे 21 जून रोजी शाही थाटात स्वागत करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आधीच आपण मोदी यांचे फॅन असल्याचे विधान केले आहे. 

=========

हे देखील वाचा : चीन देश बेरोजगारीच्या दिशेने…

=========

ते स्वतः या सर्व स्वागत समारंभावर नजर ठेऊन आहेत. अमेरिकेत (America) सुमारे 45 लाख भारतीय अमेरिकन आहेत. हे भारतीयही मोदी यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी 2014 मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि 2019 मध्ये ह्यूस्टन येथे भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळीही असा समारंभ होणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी 22 जून रोजी मोदींच्या अधिकृत स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकन वॉशिंग्टनला पोहचत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक स्वागत यात्राही काढण्यात आली आहे. एकून जागतिक महासत्ता असलेली अमेरिका भारताचे जागतिक स्तरावरील महत्त्व जाणत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिकाही अमेरिका जाणत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.