भारतात हा सगळा आठवडा हा गोडधोडाचा आणि फटाक्यांचा असणार आहे. दिवाळीसाठी देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे. मात्र भारतापाठोपाठ आणखी एका देशात दिवाळी साजरी होणार आहे, हा देश म्हणजे, अमेरिका. अमेरिकेत निवडणुका होत आहेत. 5 नोव्हेंबर रोजी तिथे मतदान होणार असून नव्य वर्षात अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भारतातपाठोपाठ अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होणार आहे. अमेरिकेतील या निवडणुकीकडे जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. कारण, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची धोरणे यांचा जगातील प्रमुख निर्णयांवर प्रभाव पडतो. त्यामुळे अमेरिकेतील दिवाळी कुठल्या पक्षाचा उमेदावर साजरी करणार याकडे लक्ष लागले आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. (America Election)
मात्र त्यापूर्वीच तीन कोटी मतदारांनी मतदान केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेत गेल्या 180 वर्षांपासून मतदानाचा दिवस बदललेला नाही. या आणि अशा अनेक वेगळ्या गोष्टी अमेरिकेतील अध्यक्षांच्या निवडणुकीत असतात. मुळात अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सर्व 435 जागांसाठीच या नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. यातूनच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प येणार की कमला हॅरिस येणार हे ठरणार आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते त्यातील प्रमुख राज्ये जिंकणे. ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना या सात राज्यांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक निर्णायक ठरते. यात एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, अमेरिकेतील मतदान भारतापेक्षा वेगळे आहे. (International News)
भारतातील लोकसभेच्या निवडणुका प्रत्येक राज्यात एकाच वेळी होतात. पण अमेरिकेत सहा टाइम झोन आहेत. त्यानुसार मतदानाच्या वेळांमध्ये बदल होतात. शिवाय तेथील प्रत्येक राज्यत काही आठवडे अगोदरच मेलद्वारे मतदान करण्याची सूट असते. शिवाय बेटेल पेपरवरील मदतानही आधी करता येते. इंडियाना आणि केंटकी मधील काही काउन्टींमध्ये मतदान सामान्यत: संध्याकाळी 6 वाजता बंद होते आणि अलास्का सारख्या राज्यांमध्ये शेवटचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 1 वाजता बंद होते. अमेरिकेच्या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट म्हणजे निवडणूक संपताच लगेच मतमोजणी सुरु होते. तरीही नवा अध्यक्ष निवडण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो. (America Election)
कारण निवडणूक कर्मचारी वैयक्तिकरित्या मेल-इन आणि लवकर केलेल्या मतांची मोजणी सुरु करतात. या सर्व मतांची गणना झाल्यानंतर, राज्य अधिकारी निकाल जाहीर करतात. अमेरिकेत भारतीय वेळेनुसार 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अर्थातच याआधी अमेरिकेतील अनेक भागात लवकर मतदान सुरू झाले आहे. शिवाय 47 हून अधिक राज्यांमध्ये मेलद्वारेही मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या सर्वात इलेक्टोरल मतांचा मोठा प्रभाव असतो. अध्यक्षपद जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 पैकी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्टोरल मतांची संख्या दिलेली असते. हे इलेक्टोरल मतधारक 12 डिसेंबर नंतरच्या पहिल्या सोमवारी त्यांच्या राज्याच्या राजधानीत मतदान करणार आहेत. त्यानंतर ही मते सिनेटच्या अध्यक्षांकडे पाठवली जातील. 6 जानेवारी, 2025 रोजी, मतदान प्रक्रियेची औपचारिक समाप्ती होऊन इलेक्टोरल मतांची मोजणी करण्यात येईल. अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक मतांची मोजणी करण्यासाठीही राज्यांचे स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येक राज्यात मतमोजणीसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित केल्या जातात. (International News)
======
हे देखील वाचा : फटाके म्हणजे चायना ?
====
अमेरिकेतील अनेक राज्ये मतदानाच्या दिवशीच निवडणूक निकाल जाहीर करतात. तर उत्तर कॅरोलिना, ऍरिझोना, जॉर्जिया, नेवाडा आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यात मतमोजणी आठवडाभर चालते. ही सगळी प्रक्रिया झाल्यावर नव्या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकन काँग्रेस निवडणूक मतांची मोजणी करण्यासाठी संयुक्त सत्र भरवते. याच्या अध्यक्षस्थानी उपराष्ट्रपती असतात. आणि तेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे याची घोषणा करतात. त्यामुळे यावेळी होणा-या मतमोजणीच्या अध्यक्षस्थानी कमला हॅरीस असतील, आणि त्याच आपण विजयी झालो, की पराभूत झालो आहोत, याची घोषणा करतील. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा शपथविधी जानेवारीमध्ये होईल, आणि पुढच्या चार वर्षासाठी त्यांची सत्ता अमेरिकेवर आणि दबदबा जगभर रहाणार आहे. (America Election)
सई बने