जगात सुपरपॉवर म्हणून ओळखल्या जाणा-या अमेरिकेच्या सर्वसामान्य नागरिकांवर सध्या महागाईचे संकट ओढावले आहे. अमेरिकन नागरिकांना अंड्यांचे भावही परवडत नसल्यामुळे अंड्यांसाठी कोंबड्या पाळण्याची वेळ आली आहे. अमेरिकन नागरिकांच्या आहारात अंडी हा सर्वाधिक आवडता आहार आहे. मात्र याच अंड्यांच्या चढत्या किंमतींनी नागरिकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे काही नागरिक कोंबड्या घरी पाळत आहेत, आणि ज्यांना कोंबड्या विकत घेणे शक्य नाही, ते नागरिक दर महिन्याचे ठराविक मुल्य देऊन चक्क कोंबड्या भाड्यावर घेत आहेत. बर्ड फ्लूमुळे अमेरिकन बाजारपेठेत अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि कमी पुरवठ्यामुळे किंमती सतत वाढत आहेत. (America)
अमेरिकेतील अनेक पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या या बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे येथे आता अंड्यांचा दुष्काळ पडला आहे. नागरिकांकडून होणा-या मागणीमुळे आता अमेरिकन सरकारनं अंडी तुर्कीकडून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंही अंड्यांच्या किंमती कमी झाल्या नसून पुढचे दोन महिने तरी अंडी चढ्याच दरानं विकली जातील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत अंड्यांची मागणी ही वर्षभर असते. येथील नागरिकांच्या आहारात कोंबड्यांची अंडी हा प्रमुख घटक आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये अंड्यांचा समावेश असतो. त्यामुळे एका घरात दिवसाला किमान पाच ते दहा अंडी लागतात. मात्र आता हिच अंडी तिप्पट किंवा चौपट किंमतीला मिळू लागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. (International News)
भारतीय चलनाप्रमाणे अमेरिकेत सध्या एका डझन अंड्यांसाठी 860 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चक्क कोंबड्या पाळण्यास सुरुवात केली आहे. घरात कोंबड्या पाळून त्यांच्या अंड्यावर आता अमेरिकन नागरिक ताव मारत आहेत. पण या कोंबड्यांचीही किंमत वाढली आहे, आणि ही किंमत ज्यांना परवडत नाही, त्यांनी चक्क कोंबड्या भाड्यानं घ्यायला सुरुवात केली आहे. काही पोल्ट्री फार्मनी घरात पाळण्यासाठी भाड्यानं कोंबड्या द्यायला सुरुवात केली आहे. या फार्ममध्ये महिन्याचे सुमारे 600 डॉलर्स मुल्य आकारुन कोंबड्या घरी पाळण्यासाठी दिल्या जातात. अंड्यांचे भाव पूर्वपदावर येईपर्यंत घरी कोंबड्या पाळून अंडी मिळवण्याचा या नागरिकांचा प्रयत्न आहे. मात्र हे उपाय ज्यांना शक्य नाहीत, त्यांना अंडी चढ्या दरानं खरेदीच करावी लागत आहेत. (America)
या अमेरिकन नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकेने तुर्कीकडून अंडी खरेदी केली आहेत. तुर्कीने अमेरिकेला 15000 टन अंडी पाठवली आहेत. एकूण 700 कंटेनर अंडी तुर्कीहून आली तरी ही अंडी कमीच पडणार, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. या करारातून तुर्कीला सुमारे 26 दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. तुर्की देश हा जगातील पहिल्या 10 अंडी निर्यातदार देशांमध्ये एक आहे.
अमेरिकेत अंड्यांच्या किंमती अचानक वाढल्या आहेत, कारण तिथे बर्ड फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मोठ्या पोल्ट्री फार्मपासून घरगुती कोंबड्या पालन करणा-यांमध्येही या रोगाचा फैलाव झाला. 2022 पासून अमेरिकेत बर्ड फ्लूचा जोमानं फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले. (International News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16.2 कोटी कोंबड्या, टर्की आणि इतर पक्ष्यांना नष्ट करण्यात आले आहे. याचा फटका अंड्यांनाही बसला. अंड्यांची कमतरता वाढल्यामुळे त्याच्या किंमती वाढल्या आहेत. बर्ड फ्लू रोखण्यासाठी पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना अधिक महागडे खाद्य आणि अन्य साहित्य खरेदी करावे लागले. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अन्यही उपाय कऱण्यात आले. या सर्वांच्या किंमतीचा परिणामही अंड्यांच्या किंमतीवर झाला. विक्रेंत्यांच्या सांगण्यानुसार अंड्यांचे दर हे पुढच्या काही महिन्यात जैसे थे रहाणार आहेत. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने अंड्यांच्या किंमती आणखी 20% वाढू शकतात असे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक ग्राहकांनी अंडी खरेदी करणे बंद केले आहे, तर अनेकांनी अगदी नाममात्र अंडी विकत घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. परिणामी सरकार अन्य देशाकडून अंडी आयात करण्याचा विचार करीत आहे. (America)
सई बने